- Marathi News
- Opinion
- N Raghuraman Column: Toys For Children With Diabetes & Autism Can Build Business
3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

ते दिवस आठवा जेव्हा मुले स्वयंपाकघरातील वस्तूंशी खेळायची. कारण पेला, प्लेट आणि शेगडी यांसारख्या छोट्या वस्तू त्यांना खऱ्या आयुष्यातील अशा परिस्थितींशी ओळख करून द्यायच्या - ज्यांचा सामना त्यांना भविष्यात करायचा होता. परंतु दुर्दैवाने, आजच्या मुलांना काही आजार आहेत आणि खेळणी बनवणाऱ्या कंपन्या त्यांना त्या आजारासह जगण्यासाठी तयार करत आहेत. टाइप १ मधुमेह (टी1डी) असलेल्या खेळण्यांचेच उदाहरण घ्या. जेव्हा जुलै २०२५ मध्ये टी1डी असलेल्या बार्बी डॉल्स बाजारात आल्या, तेव्हा त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. माहीत आहे का? कारण यामध्ये आजाराला सामान्य बनवण्याची, त्याबद्दलचे गैरसमज दूर करण्याची आणि डायबिटीस असलेल्या मुलांना योग्य प्रतिनिधित्व देण्याची ताकद होती. या बार्बीसोबत इन्सुलिन पंप आणि ग्लुकोज मॉनिटर यांसारख्या ॲक्सेसरीज होत्या. ही वास्तववादी माहिती मुलांसाठी शैक्षणिक होती. यामुळे त्यांना स्वतःची स्थिती समजून घेण्यास आणि इतर मुलांनाही त्याबद्दल सांगण्यास मदत झाली.
आता जानेवारी २०२६ बद्दल बोलूया. टी1डी बार्बीच्या यशानंतर, १९४५ मध्ये स्थापन झालेल्या अमेरिकन खेळणी कंपनी ‘मॅटेल’ने ऑटिस्टिक बार्बी लाँच केली आहे. ९ मार्च १९५९ रोजी पहिल्यांदा लाँच झालेल्या बार्बीने मोठा पल्ला गाठला आहे. नवीन ऑटिस्टिक बार्बीमध्ये ‘स्टिमिंग’साठी मुद्दाम कोपर आणि हातांचे लवचिक सांधे यांसारखे डिझाइन दिले गेले आहेत. स्टिमिंग म्हणजे एखादी संवेदनशील माहिती समजून घेण्यासाठी ऑटिस्टिक लोकांच्या शरीरात वारंवार होणारी हालचाल. हे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेले लोक जग कसे अनुभवतात, हे दाखवण्याचा एक प्रयत्न आहे. नवीन बार्बीच्या ॲक्सेसरीजमध्ये नॉइज कॅन्सलिंग हेडफोन, सैल कपडे आणि ऑगमेंटेटिव्ह अँड अल्टरनेटिव्ह कम्युनिकेशन ॲप्स असलेले टॉय टॅब्लेट आहे, जे काही ऑटिस्टिक लोक वापरतात. ही बाहुली गेल्या १८ महिन्यांत ‘ऑटिस्टिक सेल्फ ॲडव्होकेसी नेटवर्क’च्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. ही एक बिगर नफा संस्था (एनजीओ) असून तिचे उद्दिष्ट ऑटिस्टिक समुदायाला सशक्त करणे आहे. या संघटनेचे कार्यकारी संचालक कॉलिन किलिक यांनी नुकतेच म्हटले की, “तरुण ऑटिस्टिक लोकांसाठी त्यांचे खरे आणि आनंदी प्रतिनिधित्व असणे महत्त्वाचे आहे आणि ही बाहुली तशीच आहे.” या संघटनेने केवळ खेळणी कंपनीशी भागीदारीच केली नाही, तर साधने ठरवण्यासह संपूर्ण डिझाइन प्रक्रियेत मार्गदर्शनही केले. मॅटेलच्या एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, ऑटिझम हा बाहेरून दिसणारा आजार नसल्यामुळे बार्बीचे डोळे थोडे बाजूला पाहताना बनवले आहेत. हे दर्शवते की ऑटिस्टिक समुदायातील काही लोक कधीकधी थेट डोळ्याला डोळा मिळवून बोलणे टाळतात. बार्बीने सैल पिनस्ट्राइप ए-लाइन ड्रेस आणि पर्पल मेरी जेन स्टाईलचे फ्लॅट शूज घातले आहेत. ड्रेस सैल आहे जेणेकरून त्वचा आणि कापडाचा संपर्क कमी होईल आणि शूज स्थिरता वाढवण्यासाठी आहेत. कंपनीला आशा आहे की, जेव्हा इतर कुटुंबे ही बार्बी पाहतील तेव्हा ती समाजातील दरी कमी करण्यास मदत होईल. प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून सहानुभूती आणि समावेशकता वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. अशा खेळण्यांना वाढती स्वीकृती मिळण्याचे एक कारण म्हणजे ती अनेक मुलांसाठी त्यांच्या ओळखीचा ‘आरसा’ बनतात. खेळण्यांच्या अनुभवातून मुले हे वास्तव समजून घेतात. ऑटिझम आणि मधूमेह सहसा बाहेरून दिसत नसल्यामुळे, या बाहुल्या सामान्य किंवा निरोगी मुलांसाठी जग पाहण्याच्या पद्धती समजून घेण्याचे माध्यम बनतात. समर्थकांचे असे मत आहे की, अशा पावलांमुळे केवळ सहानुभूतीच वाढत नाही - ज्यामुळे विविधता समजून घेण्यास आणि स्वीकारण्यास मदत होते - तर ते गैरसमज दूर करण्यासही उपयुक्त ठरतात. असे वाटते की, अशी खेळणी विशेषतः पालक आणि शिक्षकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यास मदत करतात.
फंडा असा आहे की, आतापर्यंत खेळणी केवळ मनोरंजनासाठी बनवली जात होती. पण तीच इंडस्ट्री आता मधुमेह आणि ऑटिझमग्रस्तांसाठी उपाय देणारी बनत आहे, लोकांमध्ये जागरूकता पसरवत आहे आणि त्याचबरोबर व्यवसायाच्या उत्तम संधीही निर्माण करत आहे.

तुमच्या मोबाइलवर हा कॉलम ऐकण्यासाठी QR कोड स्कॅन करा.
This post was originally published on this site.
शहर
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
महाराष्ट्र
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- नाशिक: साक्षी चांडक देशात पहिली सीए इंटरमीडिएट परीक्षेत ५०२ गुणांसह ऑल इंडिया रँक १ मिळवत घडवला ऐतिहासिक इतिहास
- रत्नागिरी: जिल्ह्याला दुष्काळाचा भीषण फटका १२ हजार ८५० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, ४३ हजारांहून अधिक शेतकरी संकटात
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!



























Subscribe to my channel




