
Mumbai : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी अजित पवारांचा राजीनामा मागितला आहे. उद्याच त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. असं झालं नाही तर मी अमित शाहांना दिल्लीत भेटून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करेन असंही म्हटलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या पुण्यातल्या 40 एकर जमिनीच्या आर्थिक व्यवहारातील घोळामुळे अजित पवारांवर टीका होते आहे. त्यांनी आपल्या मुलाला पाठीशी घातलं आहे, सत्तेचा दुरुपयोग केला आहे, पार्थवर गुन्हा दाखल का नाही केला, असे अनेक प्रश्न विरोधकांसह अंजली दमानियांनीही उपस्थित केले आहेत. याच व्यवहाराचा पाठपुरावा करताना आज अंजली दमानियांनी पत्रकार परिहोणारी लूट थांबवावी, शेतकऱ्यांचा छळ थांबवा, महसूल विभागाने स्कॅम थांबवा,षदेत खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी सांगितलं की माझ्या हाती आलेला डेटा महाराष्ट्राला हादरवून टाकणारा डेटा आहे.
|
|
हे जे कोणी स्वयंघोषीत भाई- दादा आहेत. त्यांनी आत्ताच्या आत्ता जमिनींची होणारी लूट थांबवावी, शेतकऱ्यांचा छळ थांबवा, महसूल विभागाने स्कॅम थांबवा,असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
पार्थ पवारांची कंपनी अॅमेडियाने फ्रॉडवर फ्रॉड केले आहेत. या कंपनीने एक डेटा सेंटर सुरु करायचे आहे, असे सुरुवातीला एलओआय करताना सांगितले आहे. जमीन विकत घेण्याचा विषयही काढलेला नाही. आम्ही जमीन विकत घेतोय स्टॅम्प ड्युटीवर आम्हाला सूट द्या, अशी मागणी कुठेच नाही. कंपनीचे कागदपत्रे देताना त्यात आम्ही ९८ लाख रुपये गुंतवून डेटा सेंटर सुरु करतोय असं म्हटलं आहे, असं अंजली दमानियांनी यावेळी सांगितलं आहे.
ती ४० एकर जागा ही शितल तेजवानीच्या नावावर आहे. ती आम्ही डेटा सेंटर उभारण्यासाठी ५ वर्षांसाठी लीजवर घेत आहोत, असं दाखवून एलओआय घेतलं आणि जी मोठी स्टॅम्पड्युटी लागणार होती ती फक्त ५०० रुपये भरली, अशी पळवाट काढून यांनी मोठा फ्रॉड केला आहे, असे कित्येक व्यवहार झाले असतील आणि होऊ शकतात, असा खळबळजनक खुलासा अंजली दमानियांनी केला आहे.
हे सगळं घडल्यानंतर ते जागेचा ताबा घेण्याचाही व्यवहार केला गेला. तृप्ता ठाकुर या वकिलांनी ही मागणी केली. कलेक्टरांना केंद्रीय प्रशासनाकडून सांगण्यात आलं की जमिनीवर ताबा घेण्यासाठी कोणी येतंय, कलेक्टरांनी ही सगळी माहिती पालकमंत्री अजित पवारांनी दिली नव्हती का? कलेक्टरांना तहसीलदारांनी जमीनीची विक्री झालेली कळवलं होतं, असं असताना 1800 कोटींच्या जमिनीचा व्यवहार झाल्याचं जूनपासून नोव्हेंबरपर्यंत पालकमंत्र्यांना कलेक्टरांनी सांगितलं नाही, असं होऊ शकतं का? असा सवाल अंजली दमानियांनी उपस्थित केला आहे.
त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रीपद, पालकमंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, अशीही विनंती केली आहे. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करणारी समिती बरखास्त करा आणि नवी एसआयटी गठीत करा, अशीही मागणी केली आहे. २४ तासात अजित पवारांचा राजीनामा झाला नाही तर मी दिल्लीला जाणार आहे. गृहमंत्री अमित शाहांची भेट घेणार आहे. त्यांनी भेट नाही दिली तर तिथेही मी जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत ठाण मांडून बसणार आहे, असं म्हटलं आहे.
शहर
- पुणे: एनआयबीएम ॲनेक्समधील ७ हजारांहून अधिक कुटुंबांना हक्काच्या उद्यानाची प्रतीक्षा; मोकळ्या जागेवर गार्डन व वॉकिंग ट्रॅकची जोरदार मागणी
- पुणेः भरलेल्या सिलिंडरमधून पाइपद्वारे गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरण्याचा घातक प्रकार; कधीही घडू शकतो मोठा स्फोट!
- मुंबई: मुलुंडमधील लेबर कॅम्पमध्ये भीषण आग; एकापाठोपाठ आठ सिलिंडरचे स्फोट, ३०० हून अधिक कामगार सुखरूप!
- नाशिक: त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने भाविकांसाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव; सिंहस्थाच्या विकासकामांवर नागरिकांचा तीव्र संताप!
महाराष्ट्र
- पुणे: एनआयबीएम ॲनेक्समधील ७ हजारांहून अधिक कुटुंबांना हक्काच्या उद्यानाची प्रतीक्षा; मोकळ्या जागेवर गार्डन व वॉकिंग ट्रॅकची जोरदार मागणी
- पुणेः भरलेल्या सिलिंडरमधून पाइपद्वारे गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरण्याचा घातक प्रकार; कधीही घडू शकतो मोठा स्फोट!
- मुंबई: मुलुंडमधील लेबर कॅम्पमध्ये भीषण आग; एकापाठोपाठ आठ सिलिंडरचे स्फोट, ३०० हून अधिक कामगार सुखरूप!
- नाशिक: त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने भाविकांसाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव; सिंहस्थाच्या विकासकामांवर नागरिकांचा तीव्र संताप!
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!
- नवी दिल्ली: विरोधकांची मोट बांधण्यासाठी रणनीती; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून आज 'इंडिया' आघाडीच्या खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण!























Subscribe to my channel



