कोल्हापूर: जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, म्हणजेच लोकप्रिय 'गोकुळ' दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी निवडणुकीच्या रिंगणात मोठी चुरस पाहायला मिळाली असून, गोकुळचे माजी चेअरमन नवीद मुश्रीफ, बाळासाहेब खाडे आणि माजी संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहेत. रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय सभागृहात असणाऱ्या निवडणूक कार्यालयात हे अर्ज दाखल करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मोसमी चौगले या कामकाज पाहत आहेत.
दिग्गजांची उपस्थिती आणि राजकीय समीकरणे: माजी चेअरमन नवीद मुश्रीफ आणि बाळासाहेब खाडे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे अनेक प्रमुख नेते व माजी संचालक उपस्थित होते. यामध्ये गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण डोंगळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, अजित नरके, एस. आर. पाटील, रणजितसिंह पाटील, प्रा. किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, अमरसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड, युवराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, भोगावती कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील यांसह अनेक दिग्गजांचा समावेश होता.
दुसरीकडे, काँग्रेसप्रणित समविचारी आघाडीचे उमेदवार तथा गोकुळचे माजी संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांच्या समर्थकांच्या उपस्थितीत आपला अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत गोकुळचे माजी संचालक बाबासाहेब चौगुले, अभिजित तायशेटे, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, अंजना रेडेकर आणि रामराजे कुपेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अर्जांची खरेदी आणि प्रशासकीय निर्देश: निवडणुकीच्या पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज खरेदी करण्यासाठी इच्छूक उमेदवारांची आणि त्यांच्या समर्थकांची प्रचंड झुंबड उडाली होती. पहिल्या दिवशी ३५ हून अधिक मतदार याद्यांची विक्री झाली असून प्रति मतदार यादी एक हजार रुपये मूल्य ठेवण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी अर्जांची झालेली मोठी विक्री आणि उमेदवारांची वर्दळ पाहता आगामी गोकुळ दूध संघाची निवडणूक अतिशय चुरशीची आणि अटीतटीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दरम्यान, काही समर्थकांची वाहने थेट शासकीय सभागृहाच्या दारापर्यंत आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेत शिस्त पाळण्याचे आणि वाहने योग्य ठिकाणी पार्क करण्याचे निर्देश दिले आहेत, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान




















Subscribe to my channel


