शिरूर, पिंपरखेड दि. १० (प्रफुल्ल बोंबे ): शिरूर तालुक्यातील फाकटे, चांडोह, टाकळी हाजी, वडनेर, म्हसे, सरदवाडी आणि माळवाडी गावांमध्ये सुरू असलेल्या वारंवार वीज कपातीविरोधात ग्रामस्थांनी एकत्र येत राज्य सरकारकडे धाव घेतली आहे. सामाजिक कार्यकर्ते शंकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन रात्रीचे लोडशेडिंग तात्काळ बंद करण्याची लेखी मागणी केली. यावेळी परिसरातील बिबट्यांचा वाढता वावर, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणारा परिणाम आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी यांची सविस्तर माहिती मंत्र्यांसमोर मांडण्यात आली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळेस वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतीसाठी आवश्यक पाणीपुरवठा, पिकांची देखभाल आणि दैनंदिन कामकाजावर गंभीर परिणाम होत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होत असून पालकांमध्ये नाराजी वाढत आहे. परिसरात बिबट्या व सर्पांचा वावर असल्याने रात्रीच्या अंधारात नागरिकांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वीज नसल्यामुळे रस्ते, शेतमळे आणि वस्ती परिसर अंधारात बुडत असून वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा तसेच अपघातांचा धोका वाढत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यापूर्वीही महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी आणि निवेदने देण्यात आली होती. मात्र परिस्थितीत सुधारणा न झाल्याने अखेर ग्रामस्थ, सरपंच, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांचे पदाधिकारी एकत्र येत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुढाकार घेतला. निवेदनात फाकटे व पंचक्रोशीतील गावांमधील रात्रीचे लोडशेडिंग तात्काळ बंद करणे, नियमित व अखंडित वीजपुरवठा करणे आणि नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, १० जून रोजी शिष्टमंडळाने बारामती येथील महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक लहामगे यांची भेट घेतली. ग्रामस्थांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून संबंधित विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्याचे सांगत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शंकर पिंगळे यांनी दिली. परिसरातील नागरिकांना लवकरच लोडशेडिंगच्या समस्येतून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
"बिबट्यांचा धोकाही वाढतोय, विद्यार्थ्यांचा अभ्यासही अंधारात जातोय आणि शेतकऱ्यांची शेतीही संकटात सापडतेय... आता तरी रात्रीचे लोडशेडिंग थांबणार का? बेट भागातील हजारो नागरिकांचा सवाल प्रशासनासमोर उभा ठाकला आहे!"
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



