बारामती: पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात एकाच कुटुंबातील तीन सख्या भावंडांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. निरा–मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा येथे शनिवारी (दि. ६ जून) सायंकाळी झालेल्या अपघातात दोन बहिणींचा जागीच मृत्यू झाला होता, तर सोमवारी रात्री उपचारादरम्यान त्यांच्या लहान भावाचीही मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या घटनेने मुरूम (ता. फलटण) येथील बोडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकी घटना काय?
मुरूम येथील रहिवासी सेजल ज्ञानेश्वर बोडरे (वय १७), अक्षरा ज्ञानेश्वर बोडरे (वय १५) आणि त्यांचा धाकटा भाऊ पवन ज्ञानेश्वर बोडरे (वय १२) हे तिघे शनिवारी इलेक्ट्रिक स्कुटीवरून बारामती तालुक्यातील मुर्टी येथे आपल्या मामाच्या गावाला निघाले होते. चौधरवाडी फाट्याजवळ पोहोचले असता, समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोची त्यांच्या स्कुटीला भीषण धडक झाली.
तीनही भावंडांचे निधन
या भीषण धडकेत सेजल आणि अक्षरा या दोन्ही बहिणींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांचा भाऊ पवन गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला पुण्याला हलविण्यात आले. मात्र, मंगळवारी (दि. ९ जून) मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान पवनचेही निधन झाले.
गावात शोककळा
रविवारी दुपारी सेजल आणि अक्षरा यांच्यावर मुरूम गावातील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर पवनच्याही निधनाची बातमी गावात पोहोचताच पुन्हा एकदा शोककळा पसरली. पवन अभ्यासात हुशार आणि सर्वांचा लाडका होता. या दुर्दैवी अपघाताने एकाच घरातील तीन तरुण जीव गेल्याने बोडरे कुटुंबाचे आयुष्य पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. तीन निष्पाप जीवांच्या निधनाने संपूर्ण बारामती आणि फलटण तालुके सुन्न झाले आहेत.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




