
Jalgaon : महापालिकेच्या व्यापारी संकुलाच्या भाडे निश्चिती बाबत सरकार आणि महापालिका प्रशासन यांच्याकडून चालढकल करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे.
त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न शहरवासीय उपस्थित करत आहेत. सर्व गाळेधारकांकडे रेडीरेकनरच्या आठ टक्के म्हणजे, १२९ कोटी रुपये थकीत असल्याची माहिती महापालिकेच्या किरकोळ वसुली विभागातर्फे देण्यात आली.
|
|
त्यातील रेडीरेकनरच्या आठ टक्के दरानुसार फुले मार्केटमधील २९० गाळेधारकांनी पूर्ण भरलेली रक्कम त्यातून वजा करण्यात आली आहे.
जळगाव महापालिकेचे २५ व्यापारी संकुल आहेत. त्यात एकूण २ हजार ७०० गाळे आहेत. त्यातील तीन व्यापारी संकुल वगळल्यास इतर सर्व व्यापारी संकुलातील गाळेधारकांची गाळेकराराची मुदत २०१२ ला संपली आहे. मात्र या गाळेधारकांची अद्याप भाडे निश्चिती न झाल्याने महापालिकेचे आर्थिक उत्पन्न ठप्प झाले आहे.
भाडे निश्चितीचा जटिल तिढा
महापालिकेच्या संकुलाच्या भाडे निश्चितीचा प्रश्न गंभीर झाला आहे. महापालिकेने रेडीरेक्नर दराच्या आठ टक्केप्रमाणे भाडे आकारणी केली होती. त्याला विरोध करण्यात आला. त्याबाबत मंत्रालयात दावा दाखल करण्यात आला. त्यावर निकाल लागल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र प्रत्यक्षात महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे महापालिकेकडे आज शहराच्या विकासासाठी निधी नसल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारकडून येणाऱ्या निधीवर रस्ते व गटार आणि इतर कामे होत आहे. परंतु महापालिकेचे हक्काचे उत्पन्न मात्र मिळत नाही.
मंत्रालयातून दिरंगाई
महापालिकेच्या व्यापारी संकुलाचे भाडे ठरविण्याच्या दराच्या निश्चितीबाबत मंत्रालयातून दिरंगाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. रेडीरेक्नर आठ टक्के दर आकारून भाडे निश्चिती करण्याबाबत महापालिकेचा प्रस्ताव आहे. व्यापाऱ्यांनी रेडीरेक्नर दोन टक्के दराने आकारणी करण्याची मागणी केली आहे.
त्यामुळे हा वाद मंत्रालयात असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मंत्रालयात त्याबाबत निकाल देण्यात आला आहे. परंतु अद्याप त्याबाबतचा अध्यादेश महापालिकेत आला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत नक्की काय आहे? याचा शहरवासीयांमध्ये संभ्रम आहे.
प्रशासकडून अपेक्षा
महापालिकेत आता प्रशासकीय राज आहे. प्रशासक तथा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी महापालिकेच्या या शाश्वत उत्पन्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे, त्यांनी सरकारला पत्र पाठवून याबाबत तातडीने निर्णय देण्याची विनंती करण्याची गरज आहे, अशी शहरवासीयांची अपेक्षा आहे. गेल्या दहा वर्षापासून संकुलाचे गाळे भाडे निश्चितीकरणाचा तिढा कधी सुटणार हा प्रश्नच आहे.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!




























Subscribe to my channel




