
श्रीनगर/नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज, २२ एप्रिल रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षी याच दिवशी दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांचे रक्त सांडून काश्मीर खोऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वर्षभरानंतर आज चित्र बदलले असून, दहशतवाद्यांच्या नापाक मनसुब्यांना चपराक देत पहलगामसह काश्मीरमधील सर्व पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांनी गजबजली आहेत.
पंतप्रधान मोदींचे 'एक्स'वरून प्रत्युत्तर:
या दुःखद स्मृतींना उजाळा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स'वर (ट्विटर) एक भावनिक आणि तितकीच आक्रमक पोस्ट केली आहे. "आम्ही त्या निष्पाप जिवांचे स्मरण करत आहोत ज्यांनी गेल्या वर्षी पहलगाममध्ये आपला जीव गमावला. भारत कोणत्याही स्वरूपाच्या दहशतवादासमोर कधीही झुकणार नाही. दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्यांचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत," अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी शत्रूंना संदेश दिला.
भारतीय लष्कराचा 'ऑपरेशन सिंदूर'चा इशारा:
पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला भारतीय लष्करानेही पाकिस्तानचे नाव न घेता कडक इशारा दिला आहे. "जेव्हा मानवतेच्या मर्यादा ओलांडल्या जातात, तेव्हा आमचे प्रत्युत्तर निर्णायक असते. न्याय झाला आहे आणि भारत एकजूट आहे," असे लष्कराने म्हटले आहे. गेल्या वर्षी या हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक करून १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
पर्यटनातून पाकिस्तानला चपराक:
अस्थिरता माजवून काश्मीरचे पर्यटन संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला पर्यटकांनी मोठी चपराक लगावली आहे. सध्या पहलगाममध्ये पर्यटकांची मोठी गर्दी असून 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागातील जनजीवन पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे. प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून क्यूआर कोड आधारित ओळख प्रणाली लागू केली आहे.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




