सोलापूर: आयटी कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन परीक्षांमध्ये फेरफार करून बोगस प्रमाणपत्रे मिळवून देणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा सोलापूर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अश्पाक अत्तार (रा. राजस्वनगर, सोलापूर) याला अटक केली असून, त्याने आतापर्यंत सुमारे ४ हजार तरुणांकडून २ कोटी रुपये उकळल्याचे तपासात समोर आले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या तरुणांना पगारवाढ किंवा प्रमोशनसाठी ठराविक काळाचे कोर्सेस आणि जागतिक स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. आरोपी अश्पाक अत्तार याने संगणक प्रशिक्षण संस्थेचा परवाना घेऊन या तरुणांना परीक्षा न देताच पास करून देण्याचे आमिष दाखवले होते. तो 'रिमोट ॲक्सेस'द्वारे (Remote Access) उमेदवारांच्या वतीने स्वतः परीक्षा द्यायचा आणि त्यांना उत्तीर्ण करून द्यायचा.
४ हजार तरुणांची फसवणूक:
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात असे दिसून आले की, गेल्या वर्षभरात आरोपीने प्रति विद्यार्थी सरासरी ५ हजार रुपये याप्रमाणे एकूण ४ हजार विद्यार्थ्यांकडून २ कोटी रुपये जमवले. या रॅकेटचे जाळे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून भारतातील विविध राज्यांसह परदेशातील विद्यार्थीही या फसवणुकीच्या जाळ्यात अडकले आहेत.
अशी झाली कारवाई:
अनेक तरुणांना दिलेल्या प्रमाणपत्रांबाबत शंका आल्यानंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू केला. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अश्पाक अत्तारला जेरबंद केले. त्याच्याकडून अनेक संगणक, लॅपटॉप आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सोलापूर सायबर पोलीस या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत का, याचा सखोल तपास करत आहेत.
पोलिसांचे आवाहन:
अशा प्रकारे बेकायदेशीर मार्गाने मिळवलेली प्रमाणपत्रे आयटी कंपन्यांच्या पडताळणीत (Background Verification) बाद ठरतात, ज्यामुळे तरुणांची कारकीर्द धोक्यात येऊ शकते. त्यामुळे कोणत्याही शॉर्टकटचा अवलंब न करता अधिकृत मार्गानेच परीक्षा द्याव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




