
Pune : शहरात दिवसेंदिवस बिकट होत चाललेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता जमिनीच्या खालून मार्ग काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शहरात रस्ते रुंदीकरणाला मर्यादा आहेत आणि नवीन उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग बांधण्यासाठी मोकळी जागा शिल्लक नाही. यावर उपाय म्हणून शहरात तब्बल 54 किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गांचं (टनल) जाळं निर्माण केलं जाणार आहे. विशेष म्हणजे, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 'पीएमआरडीए' ऐवजी पुणे महापालिका स्वतः राबवणार असल्याचं महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केलं आहे.
आंतरराष्ट्रीय सल्लागाराची होणार नेमणूक
पूर्वी हा प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (PMRDA) राबवला जाईल आणि त्याचा आराखडाही तेच तयार करतील, अशी चर्चा होती. मात्र, हे भुयारी मार्ग शहराच्या हद्दीतून जाणार असल्याने महापालिकेनेच या कामाची जबाबदारी उचलली आहे. यासाठी अशा कामांचा दांडगा अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागाराची पुढील महिन्यात नियुक्ती केली जाणार आहे. सल्लागार नेमल्यानंतर पुढील चार महिन्यांत प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार केला जाईल, असं आयुक्तांनी सांगितलं.
|
|
नव्याने सर्वेक्षण होणार; जुन्या प्रस्तावात बदल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी शहरासाठी भुयारी मार्गांची घोषणा केली होती. या मार्गांमध्ये येरवडा ते कात्रज या बोगद्याचा समावेश होता. तसंच शनिवारवाडा ते स्वारगेट आणि बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता इथेही बोगदे असावेत, अशी मागणी होती. मात्र, महापालिका आयुक्तांच्या मते, सध्या प्रस्तावित असलेला येरवडा-कात्रज मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने फारसा उपयुक्त ठरणार नाही. त्याऐवजी, शहरात जिथे कमी अंतरात जास्त वाहतूक कोंडी होते, तिथे हे भुयारी मार्ग होणं गरजेचं आहे. त्यामुळे स्थानिक कंपनीने तयार केलेल्या जुन्या आराखड्यात अनेक त्रुटी असून, नव्याने वाहतुकीचा अभ्यास करूनच मार्गांची आखणी करणं योग्य ठरेल.
राज्य आणि केंद्र सरकारची आर्थिक मदत
या प्रकल्पासाठी महापालिकेच्या तिजोरीवर मोठा भार पडणार नाही. प्रकल्पासाठी लागणारा निधी राज्य आणि केंद्र सरकारकडून उपलब्ध करून घेतला जाणार आहे. दोन्ही सरकारांच्या आगामी अर्थसंकल्पात या प्रकल्पाचा समावेश करण्यासाठी महापालिका प्रस्ताव पाठवणार असून, त्याद्वारे शहराला मोठा निधी मिळण्याची शक्यता आयुक्त राम यांनी वर्तवली आहे.
पुणेकरांसाठी वाहतूक कोंडी ही सर्वात मोठी समस्या आहे. रस्ते वाढवता येत नसल्याने, 54 किमीचे हे भुयारी मार्ग वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी 'गेमचेंजर' ठरू शकतात.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel





1 thought on “Pune : पुण्यात 54 किमीचे भुयारी मार्ग; वाहतूक कोंडीसाठी ‘गेमचेंजर’, येरवडा–कात्रज, शनिवारवाडा–स्वारगेटसह कुठे-कसे असणार टनेल?”