पुणे: आळंदी, इंद्रायणी नदीची पाणीपातळी वाढल्याने चार पूल बंद; नदीपात्रात जाण्यास सक्त मनाई!

पुणे: इंद्रायणी नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंदमावळ आणि धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आळंदीतील इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि पाणीपातळीत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे, आळंदी शहरातील नदीवरील चारही महत्त्वाचे पूल तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.

नदीपात्राची स्थिती: इंद्रायणी नदीचे दोन्ही घाट पाण्याखाली गेले असून शनिमंदिराकडील भाग, सिद्धबेट आणि माऊली बाग परिसरातही पाणी शिरले आहे.

 

गोशाळेची काळजी: माऊली बागातील गोशाळेतील गाई-वासरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

प्रशासनाचे आवाहन: नदीपात्रात आणि नदीकाठी जाण्यास भाविकांना आणि नागरिकांना सक्त मनाई करण्यात आली आहे. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी भाविकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे,
असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.

इतर नुकसान: इंद्रायणी घाटावरील भाविकांसाठी उभारलेली चेंजिंग मंडप व्यवस्था पुरामुळे वाहून गेली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *