
Fake Currency : भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा छापल्याची धक्कादायक घटनापिंपरी चिंचवड शहरातून समोर आली आहे. नोटा छापणाऱ्या या टोळीचा देहू रोड पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केलाय. तसेच या प्रकरणी संशितांना पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या आहेत.
बनावट नोटा कशा सापडल्या?
एक इसम दुचाकी गाडीवर परिसरातील हॉटेल रत्ना येथे चहा पिण्यासाठी आला होता. सदर इसमाच्या हालचालीवर पोलिसांना संशय आला. त्यांनी लगेचच त्याची चौकशी सुरू केली. तेव्हा त्याने आपले नाव ऋतिक चंद्रमणी खडसे असे सांगितले. पुढे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्या खिशात भारतीय चलनाच्या बनावट असलेल्या 500 रुपयांच्या एकूण 140 नोटा असलेला बंडल आढळून आला.
|
|
त्यानंतर सदर इसमाने पोलिसांना असे सांगितले की, या नोटांच्या बदल्यात त्याला भारतीय चलनाच्या खऱ्या 60नोटा म्हणजेच तीस हजार रुपये रोख मिळणार होते. पोलिसांनी आपल्या खाक्या त्याला दाखवताच त्याने या गुन्ह्यामागे असलेले खरे सूत्रधार आणि भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या या बनावट नोटा कोठे छापल्या जात आहेत याची माहिती सांगितली. मिळालेल्या माहितीच्या आधारे देहूरोड पोलिसांनी सरळ ते ठिकाण गाठले ज्या ठिकाणी हा काळा कारभार सुरू होता.
प्राप्त माहितीनुसार, मुकाई चौक किवळे या ठिकाणी एक इसम भारतीय चलनाच्या बनावट नोटा घेऊन येणार आहे अशी माहिती देहूरोड पोलीस ठाण्यातील कर्मचारी किशोर परदेशी यांना खबऱ्या मार्फत मिळाली होती. त्यानंतर परदेशी यांनी आपल्या इतर पोलीस सहकाऱ्यांसह सदर ठिकाणी सापळा रचला होता. देहूरोड पोलिसांनी भोसरी परिसरात छापा टाकत एका घरात या बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेली प्रिंटिंग मशीन तसेच नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेला कागद, सदर ठिकाणावरून जप्त केला.
त्याचबरोबर या गुन्ह्याशी संबंधित असलेले सूरज श्रीराम यादव(41)राहणार चरोली बुद्रुक ग्लोबल हाईट फ्लॅट नंबर 104 ,आकाश युवराज दंगेकर (22) राहणार विठ्ठल मंदिराच्या मागे आकुर्डी, सुयोग दिनकर साळुंखे (33) राहणार आकुर्डी, तेजस वासुदेव बल्लाळ (19) राहणार रामनगर चंद्रकांत वसाहत भोसरी, प्रणव सुनील गव्हाणे (30) राहणार आळंदी रोड मुक्ताई हाइट्स प्लॉट नंबर 201 भोसरी यांना ताब्यात घेतलं.
अशा पद्धतीने भारतीय चलनाच्या बनावट नोटा या पोरांनी छापण्याचा धंदा कधीपासून सुरू केला आहे व ते या नोटा बाजारात वितरित करण्यासाठी कोणाकडे देत होते? तसेच अटक करण्यात आलेल्या संशयीतांच्या व्यतिरिक्त आणखी इतर कोणचा या कळ्या कारभाराशी संबंध आहे का? याचा तपास देखील पुढे आता देहुरोड पोलीस करत आहेत.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



