
Mumbai : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांचा सामना झाला. आता महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही नेत्यांचे पक्ष आमनेसामने असतील. ही निवडणूक अनेकार्थांनी महत्त्वाची आहे. कारण उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येऊन महायुतीला अंगावर घेत आहेत. दोघांची मुंबईतील ताकद पाहता यंदा अटीतटीची लढाई होऊ शकते. शिवसेना उबाठा-मनसे विरुद्ध शिंदेसेना असा थेट सामना मुंबईतील ८७ प्रभागांमध्ये होईल. त्यातून मुंबई कोणाची, या प्रश्नाचं उत्तर मिळेल.
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना वरचढ ठरली. मुंबईत ठाकरेंच्या पक्षानं ९ जागा जिंकल्या. तर शिंदेसेनेला केवळ १ जागा जिंकता आली नाही. ठाकरेंनी ४ जागा लढवत ३ जागांवर विजय साकारला. चौथी जागा केवळ ४८ मतांनी हातून गेली. तर शिंदेसेनेला ३ जागा जिंकून केवळ १ जागा जिंकता आली. विधानसभा निवडणुकीतही ठाकरेसेनेनं मुंबईत शिंदेसेनेला मागे टाकलं.
|
|
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील आकडेवारी पाहता मुंबईत ठाकरे यांचं वर्चस्व कायम असल्याचं निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवतात. मुंबई महापालिकेच्या निवडणुका गेल्या २ निवडणुकांपेक्षा वेगळ्या असतील. खरी शिवसेना कोणाची, या प्रश्नाचं उत्तर या निवडणुकीच्या निकालातून मिळेल, असं राजकीय जाणकार सांगतात.
यंदा ठाकरे बंधू एकत्र लढत आहेत. त्यामुळे ठाकरे ब्रँड चर्चेत आहे. त्यांच्या 'मराठी माणूस' नरेटिव्हला कसा प्रतिसाद मिळतो, यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. त्यामुळे ही अनेकार्थांनी दोन्ही शिवसेनेसाठी अखेरची लढाई आहे. यातून मुंबईचं राजकीय भविष्य आणि ठाकरेचं महत्त्व याचा फैसला होईल, असा राजकीय विश्लेषकांचा सूर आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ठाकरेंना सोडून गेलेल्या अनेक नेत्यांचा पराभव झाला. त्यात आमदार यामिनी जाधव, सदा सरवणकर, खासदार राहुल शेवाळे यांचा समावेश आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्षात हे नेते पराभूत झाले. गेल्या तीन ते साडे तीन वर्षांमध्ये ठाकरेंचे ४० हून अधिक माजी नगरसेवक शिंदेसेनेत गेले आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीसमोर त्यांची कसोटी लागणार आहे.
मराठी माणूस कोणत्या विचारातून मदत करतो, याकडे सेना विरुद्ध सेना लढाईचा निकाल काय लागतो, ते ठरेल. यात शिंदेसेनेला फटका बसल्यास भाजपच्या महत्त्वाकांक्षी प्लानला धक्का बसू शकतो. कारण भाजपनं शिंदेसेनेसाठी ९० जागा सोडल्या आहेत. शिवडी, वरळी, दादर , माहीम, वडाळा, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर (पश्चिम), मागाठाणे, दिंडोशी, दहिसर, वांद्रे (पूर्व) आणि कलिनात सेना विरुद्ध सेना लढत रंगेल.
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!

























Subscribe to my channel




1 thought on “BMC Election : ठाकरे बंधू विरुद्ध शिंदे अनेक राजकीय कारकिर्दींना फटका, शिवसेना कोणाची? ‘त्या’ ८७ जागांवरच होणार निर्णय”