
Beed Ajit Pawar Sabha: अजित पवार गटाची उद्या राज्यातील पहिली जाहीर सभा बीडमध्ये होत आहे. अजित पवार तसेच पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल, प्रांताध्यक्ष खा. सुनील तटकरे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत राहणार आहे. उद्या बीड येथे दुपारी 3 नंतर जाहीर सभा संपन्न होणार आहे.
या सभेचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार नियोजन करण्यात येत आहे. अजित पवारांसह सर्वच मंत्र्यांच्या व मान्यवरांच्या स्वागतासाठी बीड नगरी सज्ज झाली आहे. जागोजागी स्वागतच्या कमानी व फलक उभारण्यात आले आहे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
असा आहे सभा मंडप?
परभणी येथील प्रसिद्ध संजेरी मंडप यांच्या माध्यमातून या सभेचे स्टेज व मंडपाची उभारणी करण्यात येत आहे. 80 बाय 40 फुटांचे भव्य स्टेज तयार करण्यात आले आहे. पावसाचे वातावरण लक्षात घेत भव्य वॉटर प्रूफ मंडप उभारण्यात आला आहे.
या मंडपाची 50 ते 55 हजार लोक बसण्याची क्षमता आहे, महिलांची बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त सभास्थळी एकूण 1 लाख पेक्षा अधिक लोक जमतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहित अजित पवार गटाचे सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व आमदार महोदय व मान्यवर हे एकत्रित दुपारी दीडच्या सुमारास बीड शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करतील. त्यानंतर मुख्य रस्त्यावरील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भव्य रॅलीस सुरुवात होईल.
परळी पॅटर्नची जिल्ह्यात चर्चा
दरम्यान, या सभेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार व मंत्रिमंडळातील सर्वच सदस्य प्रथमच बीड जिल्ह्यात येत आहेत. यामुळे बीड शहरात उंच कमानी, कट आऊट, यासह स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले आहेत.
बीड शहरात प्रथमच परळी प्रमाणे नियोजन करण्यात येत आहे. ज्येष्ठ नेते वाल्मिक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली हे सुरेख नियोजन करण्यात आले असल्याची चर्चा जिल्ह्यात होत
शहर
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
- मुंबई: लाडकी बहीण योजना अपडेट: ई-केवायसी न केलेल्या ८१ लाख महिलांना मिळणार १५०० रुपये? मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?"
महाराष्ट्र
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- सांगली: नदी प्रदूषित करणाऱ्या महापालिका, पालिकांसह कारखान्यांवर थेट गुन्हे दाखल करा; जलसंपदामंत्र्यांचे अत्यंत कडक आदेश
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय


























Subscribe to my channel




