मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यामध्ये पावसाने दीर्घकालीन दडी मारल्यामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः औसा तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. सलग दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे ऐन फुलोऱ्यात आलेले आणि शेंगांमध्ये दाणा भरण्याच्या नाजूक अवस्थेतील सोयाबीन पूर्णपणे सुकून व करपून गेले आहे. हिरवेगार दिसणारे शिवार आता काळेकुट आणि ओस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले आहेत.
उभ्या पिकावर केलेला खर्च वाया, काढणीचा खर्चही निघणे अशक्य
औसा तालुक्यातील शिवली आणि परिसरातील शेतकऱ्यांनी अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करत बियाणे, रासायनिक खते, मशागत, पेरणी, फवारण्या आणि तणनियंत्रणासाठी हजारो रुपयांचा खर्च केला होता. पीक ऐन दाटीवाटीने उभे राहिल्याने बऱ्यापैकी उत्पादनाची आशा होती; मात्र पावसाने ऐन वेळी साथ सोडल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले आहे.
शिवली येथील शेतकरी इस्माईल तांबोळी यांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की, त्यांनी १२ एकर जमिनीवर सोयाबीनची पेरणी केली होती; परंतु दोन महिन्यांच्या पर्जन्यखंडामुळे संपूर्ण सोयाबीन करपले असून आता ज्वारीच्या दाण्याएवढेही सोयाबीन उत्पादित होत नाही. एकरी केवळ दोन कट्ट्यांपेक्षा कमी उतारा मिळेल अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे, करपून गेलेले सोयाबीन शेतातून काढण्यासाठी किंवा मळणी करण्यासाठी एकरी कमीत कमी ५ हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च येणार आहे, जो सध्याच्या स्थितीत भरून काढणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे. "पेरणीपूर्वीचा सगळा खर्च वाया गेला आहे, वर्षभर कुटुंबाचे भरणपोषण कसे करावे आणि जगायचे कसे?" असा मोठा प्रश्न हजारो शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
प्रशासनाकडे मदतीची व दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
लातूर जिल्हा आणि विशेषतः औसा तालुक्यात पावसाच्या अभावामुळे पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. शेतकरी नेते आणि स्थानिकांनी शासनाकडे औसा तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी तीव्र केली आहे. नुकत्याच झालेल्या महिलांच्या मोर्चांसह विविध शेतकरी संघटनांनी तहसील कार्यालयांवर धडक देत शासनाने तातडीने सरसकट आर्थिक मदत, पीकविमा आणि तात्काळ पंचनामे करून दिलासा द्यावा, अशी मागणी लावून धरली आहे. आता शेतकऱ्यांची नजर आभाळाकडे नसून राज्याच्या नेतृत्वाकडे आणि शासनाच्या ठोस निर्णयाकडे लागली आहे.
शहर
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
महाराष्ट्र
- कोल्हापूर: टेम्पोतून उतरताना बैल उधळला, पकडायला गेले अन् जीवाला मुकले! आजरा तालुक्यात तारेच्या कुंपणाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; मायलेकरांवर गुन्हा दाखल
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
गुन्हा
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
























Subscribe to my channel




