बच्चन कुटुंबाबद्दल मोठा खुलासाImage Credit source: social media
बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे फक्त मोठ्या पडद्यावर नाही तर छोट्या पडद्यावरही गाजत असतात. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेला त्यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा गेम शो घराघरांत पोहोचला असून त्याचे लोखा चाहेत, आजही हा क्विझ गेमशो आवडीने पाहिला जातो. दरवर्षी येणआऱ्या नव्या सीझनमध्ये अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी, त्यांचं अँकरिंग, बोलण, अदब हे सगळं अनुभवण्यासाठ प्रेक्षक हजेरी लावत असतात. टीव्हीवरही अनेक जण हा शो न चुकता पहात असतात. सामान्य जनता, स्पर्धकांसोबतच या शोमध्ये काही सेलिब्रिटी अधे-मधे हजेरी लावत असतात. त्यात काही मजेशीर गोष्टी, किस्सेही पुढे येतात.
लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने पाहणाऱ्या या शोमध्ये बच्चन कुटुंबातले सदस्यही कधीकधी येतात. अमिताभ बच्चन यांचा नातू, श्वेता नंदा हिचा मुलगा अगस्त्य हादेखील घरच्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन बॉलिवूडमध्ये आला. ‘इक्कीस’ हा त्याच्या चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला होता. यामध्ये दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचीही प्रमुख भूमिका होती. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रिलीज झालेल्या या पिक्चरला बॉस्क ऑफीसवर संमिश्र प्रतिसाद मिळाला. याच चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पिक्चरची संपूर्ण टीम केबीसीच्या सेटवर आली होती. अगस्त्य नंदा याच्यासोबत जयदीप अहलावत, सिमर भाटिया तसेच अगस्त्यची आई श्वेता नंदा, आणि नव्या नंदांही आले होते. यावेळी अगस्त्य आणि जयदीप अहलावत हे हॉटसीटवर बसलेले होते. मात्र त्याचदरम्यान जयदीप अहलावत यांनी बिग बींना असा प्रश्न विचारला की ते ऐकून त्यांची बोलतीच बंद झाली. आणि त्यावर श्वेताने दिलेलं उत्तर ऐकून तर सगळेच थक्क झाले. शोमधली ही क्लिप, हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला होता.
जया बच्चन सगळ्यात जास्त कोणाला ओरडतात ?
अभिनेते जयदीप अहलावत यांनी अमिताभ यांच्यासमोर एक प्रश्व विचारला. घरी जया बच्चन या सर्वात जास्त कोणाला ओरडतात ? ते ऐकून अमिताभ यांनी अगस्त्यला उद्देशून काही इशारा केला, पण तो थेट हसायलाच लागला. तेवढ्यातच ऑडियन्समध्ये बसलेल्या श्वेता बच्चन हिने हात वर केला आणि ते पाहून अमिताभ यांनी श्वेताचं नाव घेत काय म्हणायचं आहे, असं विचारला. त्यावर श्वेताने अहलावत यांच्या प्रश्नाचं उत्तर देत सांगितलं की आई ( जया बच्चन) सर्वात जास्त मला आणि बाबांना ( अमिताभ यांना) ओरडते. तिचं हे बोलणं ऐकून सगळेच हसायला लागले. आणि तिचं उत्तर ऐकल्यावर बिग बी तर हैराण झाले, तू घरी ये मग दाखवतो तुला .. असं ते म्हणताच हास्याची कारंजी उडालीच. कौन बनेगा करोडपतीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय
अगस्त्य नंदा याच्या “इक्कीस” चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, तो 1 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी 7 कोटी रुपयांची कमाई करून त्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. हा चित्रपट सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांचा बायोपिक आहे. हा धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट देखील होता. त्यांचं गेल्या वर्षी 24 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत निधन झालं. त्यामुळे चाहत्यांसाठी हा चित्रपट खूपच खास ठरला.’इक्कीस’ने पट बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ला जोरदार टक्कर दिली होती.
शहर
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
महाराष्ट्र
- बीड: परळीत मोकाट कुत्र्यांचा थरार! अवघ्या ४८ तासांत २३ जणांना लचके तोडले, नागरिकांत दहशत!
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




