
Ahmedabad : सर्वसाधारणपणे दोनशे धावांचे आव्हान पार करणे कठीणच असते, पण पंजाब संघाने गुरुवारी झालेल्या गुजरातविरुद्धच्या सामन्यात ते शशांक सिंगच्या जोरावर शक्य केले. २९ चेंडूंत नाबाद ६१ धावांची खेळी साकार करणारा शशांक खरे तर पंजाब संघासाठी लिलावात ‘नकोसा’ होता; परंतु आता तो त्यांच्यासाठी मॅचविनर झाला. आयपीएल चाहत्यांना शशांक सिंग हा कदाचित नवा चेहरा वाटत असेल, पण हा मुंबईचा खेळाडू देशांतर्गत असो वा आयपीएल सर्वत्र संचार असलेला खेळाडू आहे. पाच वर्षांपासून तो आयपीएलमध्ये आहे.
गुजरातविरुद्धच्या सामन्यात शशांक सिंग फलंदाजीस उतरला तेव्हा पंजाबची अवस्था ४ बाद ७० अशी होती आणि आवश्यक धावांची सरासरी ११.४७ इतकी झाली होती. पंजाबच्या विजयाची शक्यता त्यावेळी ४.७७ टक्के इतकी कमी झाली होती; परंतु शशांक सिंगने चमत्कार करावा अशी घणाघाती फलंदाजी करताना त्याने उमेश यादव, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद अशा आंतरराष्ट्रीय गोलंदाजांची यथेच्छ पिटाई केली. पण हाच शशांक पंजाबसाठी कदाचित जबरदस्तीने किंवा चुकीने संघात घ्यावा लागला होता.
|
|
लिलावात काय घडले होते...
१९ डिसेंबरला झालेल्या लिलावात शशांक सिंगचे नाव आले आणि पंजाबने त्याच्यासाठी हात वरती केला. हा खेळाडू आपल्याला नको आहे किंवा चुकीची आपण बोली सुरू केली याची जाणीव झाली, पण या दरम्यान लिलावकर्ती मलिका सागर यांनी हाताडो मारून बोली पूर्ण केली. आपल्याला या शशांकसाठी बोली लावायची नव्हती, असे पंजाब संघाच्या टेबलवरील व्यक्ती सांगत होत्या, पण बोली पूर्ण झाल्यामुळे काहीच करता आले नाही. त्यानंतर सारवासारव करताना आपण याच शशांकसाठी बोली लावल्याचे पंजाब संघ व्यवस्थानाकडून जाहीर करण्यात आले होते.या शशांकची ही पहिली आयपीएल नाही. तो २०१७ पासून कोणत्या ना कोणत्या संघाासोबत आहे. २०१७ मध्ये दिल्ली संघाने आपल्या संघात घेतले होते. त्यानंतर २०१९ आणि २०२० मध्ये तो राजस्थान रॉयल्स संघासोबत होता. २०२१ च्या लिलावात तो अनसोल्ड राहिला. २०२२ मध्ये हैदराबाद संघाने त्याला आपल्या संघात घेतले आणि आपल्या पदार्पणाच्या सामन्यात लॉकी फर्ग्युसनला सलग दोन षटकार ठोकत सहा चेंडूतं नाबाद २५ धावांचा झंझावात सादर केला होता. पण त्यानंतर विशेष कामगिरी न करू शकल्यामुळे हैदराबाद संघाने रिलीज केले होते.
मूळचा मुंबईकर खेळाडू
शशांक हा मूळचा मुंबईतील खेळाडू आहे. सलामीचा फलंदाज आणि ऑफस्पिनर अशी गुणवत्ता असलेला शशांक वयोगटातील स्पर्धेत त्याने मुंबईचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१५ मध्ये मुश्ताक अली राष्ट्रीय ट्वेन्टी-२० स्पर्धेत तो मुंबईकडून खेळला. एकूण १५ ट्वेन्टी-२० आणि तीन ‘अ’ श्रेणीचे सामने खेळल्यानंतर त्याला मुंबई संघात स्थान मिळणे कठीण झाले. त्यामुळे त्याने आपले जन्मगाव असलेल्या छत्तीसगडची वाट धरली.
मुंबईलाच हरविले
२०१९-२० मध्ये छत्तीसगडने विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धेत मुंबईचा धक्कादायक पराभव केला. त्यात छत्तीसगडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शशांकने निर्णायक कामगिरी केली होती.
कालिचरण, प्रॉक्टर यांच्या विक्रमाशी बरोबरी
प्रथम श्रेणीच्या एकाच सामन्यात १५० हून अधिक धावा आणि पाच विकेट अशी कामगिरी करणारा शशांक पहिला भारतीय ठरला आणि त्याने वेस्ट इंडीजच्या ऑल्विन कालिचरण, आफ्रिकेच्या माईक प्रॉक्टर यांच्याशी बरोबरी केली. ही कामगिरी त्याने २०२३ मध्ये मणिपूरविरुद्ध केली होती.
शहर
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६ हजार आदिवासी करणार भव्य गोदाआरती; सिंहस्थ कुंभमेळा तयारीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन!
महाराष्ट्र
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- कोल्हापूर: निधी मिळत नसल्याने महायुतीच्या सदस्यांना सत्तेत आल्याचा पश्चाताप; आमदार सतेज पाटील यांचा मोठा दावा!
- जळगाव: महाराष्ट्रात दिवाळीनंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार? आमदार बच्चू कडू यांचे मोठे भाकीत, जळगावमधून किशोर पाटलांना मंत्री करण्याची मागणी!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!




























Subscribe to my channel




