
Hindi Marathi row in Maharashtra : राज्यात मराठी आणि हिंदीचा वाद पुन्हा एकदा उफळला आहे. मराठी न बोलणाऱ्या परप्रांतीय दुकानदाराला मनसैनिकांनी चोप दिल्यानंतर देशभरात वाद पेटला आहे. मराठी आणि महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधू एकत्र आले अन् राज्यातील राजकारणाला वेगळे वळण मिळाले. आता परराज्यातील हिंदी भाषिक नेते आक्रमक (Marathi-Hindi language tension) झाले असून ठाकरे बंधू आणि मराठी माणासाला टार्गेट केले जातेय. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनीही यामध्ये उडी घेतली आहे. वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणारे निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय. आपल्या घरात कुत्रेही वाघ असतात, असा टोला लगावलाय. त्याशिवाय दुबे यांनी ठाकरे बंधूंची तुला दाऊत आणि मसूद अजहर यांच्यासोबत केली आहे. दुबे यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावर लागोपाठ तीन चार पोस्ट करत ठाकरे बंधू आणि मनसेला डिवचले आहे. दुबेने आपल्या एक्स खात्यावर मराठीमध्ये पोस्ट करत ठाकरेंची अप्रत्यक्ष तुलना कुत्र्यासोबत केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा."
हिंदी-मराठी वाद आणखी पेटणार ?
मराठी-हिंदी वादात दुबे यांनी कुत्रा आणि वाघ अशी तुलना केली आहे, त्यामुळे हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणाऱ्या ठाकरे बंधूंना दुबे यांनी डिवचलेय. दुबे यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर मनसैनिक आणि शिवसैनिकांनी आक्रमक पोस्ट करत दुबे यांच्यावर घणाघात केला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून या पोस्टनंतर काय भूमिका घेतली जातेय? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. मराठी-हिंदी भाषेवर आता पुन्हा एकदा राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठाकरेंची दाऊदसोबत तुलना -
निशिकांत दुबे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल करताना कुत्रा आणि वाघ यांची तुलना तर केलीच. पण ते यावरच थांबले नाहीत, दुबे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तुलना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि मसूद अजहर यांच्यासोबत केली आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये दुबे म्हणाले की, मुंबईत उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राज ठाकरे यांची मनसे, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आणि सलाउद्दीन, मौलाना मसूद अजहर आणि मुंबईत हिंदूंवर अत्याचार करणारा दाऊद इब्राहिम यांच्यात काय फरक आहे? एकाने हिंदू असल्यामुळे अत्याचार केला. दुसऱ्याने हिंदी असल्यामुळे अत्याचार केला. दुबे यांच्या एक्स पोस्टनंतर राज्यात पुन्हा एकदा हिंदी-मराठी वाद तीव्र होण्याची शक्यता आहे. दुबे यांच्या या वक्तव्यावर राज्यातील भाजप नेत्यांकडून काय प्रितक्रिया येते, काय भूमिका घेतली जाते? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मनसे आणि शिवसैनिकांनी सोशल मीडियावर आक्रमक भूमिका घेतली आहे
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




