अभिनेता राजपाल यादवला तुरुंगवासाची शिक्षा झाल्याने चेक बाऊन्स प्रकरण चर्चेत आलं आहे. 9 कोटी रुपयांचं कर्ज न फेडल्यामुळे राजपालला तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागलं आहे. पण जर एखादी व्यक्ती चेक बाऊन्सप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगून बाहेर आली तर त्या व्यक्तीला कर्जाच्या रकमेची परतफेड करावी लागत नाही का? चेक बाऊन्स प्रकरणात एखाद्याला किती वर्षांची किंवा महिन्यांची शिक्षा होऊ शकते? राजपालला तुरुंगवास भोगल्यानंतरही कर्जाची रक्कम भरावी लागेल का? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रश्नांबद्दल आणि कायदेशीर गोष्टींचा विचार केला तर राजपालकडे आता कोणकोणते पर्याय शिल्लक आहेत, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात..
नेमकं प्रकरण काय?
2010 मध्ये राजपाल यादवने ‘अता पता लापता’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी दिल्लीतील एका बिझनेसमनकडून 5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आणि त्यानंतर राजपालच्या डोक्यावर कर्जाचं मोठं डोंगर उभं राहिलं. कर्ज फेडण्यासाठी त्याने जे चेक्स दिले, ते बँकेत बाऊन्स झाले. अपेक्षित रक्कम बँक खात्यात नसल्यावर चेक बाऊन्स होतात. इथूनच कायदेशीर कारवाईची सुरुवात झाली. राजपालवर जे 5 कोटी रुपयांचं कर्ज होतं, ते आता व्याज आणि पेनल्टीमुळे 9 कोटी रुपये झालं आहे.
राजपाल यादवसोबत आता पुढे काय होणार?
राजपालला कनिष्ठ न्यायालयाने 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला कर्ज फेडण्यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली, परंतु प्रत्येक वेळी तो अपयशी ठरला. कायदेतज्ज्ञांच्या मते आता राजपालकडे कोणते पर्याय आहेत, त्याबद्दल जाणून घ्या.. पूर्ण शिक्षा भोगणे: 9 कोटी रुपये भरले नाहीत तर न्यायालयाच्या आदेशानुसार राजपालला 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल. तक्रारदाराकडून तोडगा: जर या कालावधीत त्याने तक्रारदाराला (मुरली प्रोजेक्ट्स) ठराविक रक्कम देऊन प्रकरण मिटवलं, तर ते त्याची शिक्षा कमी करण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अपील करू शकतात. चांगला वर्तनाचा फायदा: तुरुंगातील वर्तन चांगलं असल्यास तुरुंग प्रशासन कैद्याच्या शिक्षेत 15 ते 20 दिवसांची सवलत देऊ शकते. परंतु हे सर्व तुरुंगाच्या नियमांवर अवलंबून असतं.
चेक बाऊन्स प्रकरणातील शिक्षा किती असते?
चेक बाऊन्स झाल्यानंतर पैसे देणाऱ्याला 30 दिवसांच्या आत कायदेशीर नोटीस पाठवावी लागते. सूचना मिळाल्यानंतर, पैसे भरण्यासाठी 15 दिवसांचा अवधी दिला जातो. जर या 15 दिवसांत पैसे दिले नाही तर खटला होऊ शकतो. त्यात दोषी आढळल्यास दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास, चेकच्या रकमेच्या दुप्पट दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात.
तुरुंगवासानंतर कर्ज माफ होतं का?
तुरुंगवासाची शिक्षा ही गुन्ह्यासाठी सुनावली जाते, कर्जासाठी नाही. संपूर्ण शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही कर्जदाराकडे त्याचे पैसे वसूल करण्याचा अधिकार राहतो. जर आरोप तुरुंगवास भोगूनही पैसे भरत नसेल, तर न्यायालय त्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देऊ शकते.
राजपाल यादवला 9 कोटी रुपये द्यावे लागतील का?
दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की राजपाल यादवने त्याची जबाबदारी मान्य केली आहे. त्यामुळे जरी तो आता तुरुंगात शिक्षा भोगत असला तरी त्याला थकबाकीची संपूर्ण रक्कम परत करावी लागेल. तुरुंगवासाची शिक्षा ही केवळ न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन आणि चेक बाऊन्स करण्याच्या त्याच्या वारंवार गुन्ह्यांसाठी सुनावलेली शिक्षा आहे. त्यामुळे भविष्यात त्याच्या मालमत्तेतून किंवा कमाईतून पैसे वसू केले जाऊ शकतात.
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- नंदुरबार: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या दोन खासगी बसेसवर मोठी कारवाई; आरटीओच्या वायुवेग पथकाकडून दंड वसूल!
- जालना: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् हेक्टरी भरपाई द्या; मागण्या मान्य न झाल्यास पाटोद्यावरून मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!






























Subscribe to my channel




