अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशिया,ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा केलेला दौरा हाभारताच्या धोरणात्मक बदलाची सुरुवात मानली पाहिजे.या बदलाला ॲक्ट-ईस्ट 2.0 असे म्हणता येईल.हिंद-प्रशांत क्षेत्राच्या भवितव्याला आकार देण्यातअधिक सक्रिय भूमिका बजावण्यावर भर देणाऱ्या यानव्या दृष्टिकोनाचे हे संकेत आहेत. गेल्या काही वर्षांत भारताचे धोरणात्मक लक्ष स्वाभाविकपणे इतर भागांकडे केंद्रित राहिले.युक्रेनमधील संघर्ष, पश्चिम आशियातील अस्थिरता, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि उत्तरेकडील सीमांवरील सुरक्षा आव्हाने यामुळे भारताच्या राजनैतिक ऊर्जेचा मोठा भाग खर्च झाला. मात्र, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला आकार देण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या कोणत्याही देशाने संकटांना आपल्या धोरणात्मकविचारांवर कायमस्वरूपी वर्चस्व गाजवू देता कामा नये. उदयोन्मुख शक्तींना भविष्यातील संधींसाठीही तयारी करावी लागते. त्यामुळे पंतप्रधानांचा हा पूर्वेकडीलदेशांचा राजनैतिक दौरा हा धोरणात्मक संदेश देणारे पाऊलही आहे. संदेश स्पष्ट आहे— भारत पुन्हा एकदाठाम उद्देशाने पूर्वेकडे पाहत आहे. मूळ ॲक्ट-ईस्टधोरणाने संपर्क, व्यापार, संस्थात्मक भागीदारी आणिआसियान देशांशी संबंध मजबूत करून भारताचा पूर्वआणि आग्नेय आशियाशी असलेला संबंध अधिक दृढकेला. भारताची समृद्धी या प्रदेशाच्या गतिशीलतेपासूनवेगळी नाही, हे या धोरणाने मान्य केले होते. त्या दृष्टीने हेधोरण यशस्वी ठरले. हिंद-प्रशांत क्षेत्र आता जगातीलप्रमुख भू-राजकीय केंद्र म्हणून उदयास आले आहे.सागरी सुरक्षा, लवचिक पुरवठा साखळी, महत्त्वपूर्णतंत्रज्ञान, समुद्राखालील पायाभूत सुविधा आणि ऊर्जापुरवठा हे घटक आज जागतिक शक्तिसंतुलनावरलष्करी क्षमतेइतकाच प्रभाव टाकत आहेत.ॲक्ट-ईस्टच्या पहिल्या टप्प्याने भारताला पूर्वआशियाशी जोडले, तर दुसऱ्या टप्प्याचे उद्दिष्टहिंद-प्रशांतच्या धोरणात्मक रचनेला आकार देण्यातयोगदान देणे असावे. भारताचे पूर्वेकडील हितसंबंधआता केवळ क्वाडच्या गतीवर अवलंबून राहू नयेत.क्वाड हे सहकार्याचे महत्त्वाचे व्यासपीठ असले, तरी तेना लष्करी आघाडी आहे, ना हिंद-प्रशांतमधीलभारताच्या धोरणाचा एकमेव आधार. अमेरिका सध्याचीनबरोबरच्या द्विपक्षीय स्पर्धा आणि विशेषतः तैवानच्याप्रश्नावर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसते.अशा वेळी भारताने आपले पूर्वाभिमुख धोरण स्वतंत्रपणेपुढे नेले पाहिजे. यासाठी जपान आणि ऑस्ट्रेलियाशीद्विपक्षीय भागीदारी अधिक मजबूत करणे आणिआसियानला ॲक्ट-ईस्ट 2.0च्या केंद्रस्थानी ठेवणेआवश्यक आहे. बदलत्या प्रादेशिक परिस्थितीतभारताने अधिक सक्रिय भूमिका घेण्याची गरज आहे.हिंद-प्रशांतमध्ये अमेरिका अजूनही प्रमुख लष्करी शक्तीअसली, तरी आग्नेय आशियातील अनेक देशांना तिचेराजकीय लक्ष अधिक निवडक होत असल्याची भावनाआहे. चीनने आर्थिक एकात्मता, पायाभूत सुविधा,सागरी उपस्थिती आणि सातत्यपूर्ण राजनैतिक प्रयत्नांद्वारेआपला प्रभाव सातत्याने वाढवला आहे. हा विस्तारबहुतांश वेळा उघड संघर्षाच्या पातळीखालील‘ग्रे-झोन’मध्ये घडतो; मात्र त्याचे दीर्घकालीनधोरणात्मक परिणाम मोठे असतात. आता धोरणात्मक क्षमतेसोबत धोरणात्मकआत्मविश्वासाचीही सांगड घालण्याची वेळ आलीआहे. फिलिपिन्स आणि इंडोनेशियासोबत भारताच्यावाढत्या भागीदाऱ्या, ज्यात संरक्षण निर्यातीचाही समावेशआहे, या संरक्षण सहकार्याचे कूटनीतीतील वाढते महत्त्वअधोरेखित करतात. ग्रेट निकोबारसारख्या विकासप्रकल्पांकडेही याच दृष्टीने पाहिले पाहिजे. हे केवळपायाभूत सुविधा प्रकल्प नसून, भारताच्या उदयोन्मुखसागरी शक्तीचे प्रतीक आहेत. (लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.) 21व्या शतकातील धोरणात्मकशक्तिसंतुलन निश्चित करण्यातहिंद-प्रशांत क्षेत्र निर्णायक ठरणार आहे.या प्रदेशाच्या भवितव्याला आकारदेण्यासाठी भारत आता अधिक सक्रियभूमिका घेण्यास सज्ज आहे. ॲक्ट-ईस्ट2.0 धोरणातून भारताचे धोरणात्मकक्षितिज आता अधिक स्पष्टपणे पूर्वेकडेसरकत असल्याचे दिसून येते.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


