
जळगाव : जळगावमधील राजमल लखीचंद परिवाराची एकशे पासष्ट वर्षांची सोने व्यवसायाची परंपरा आहे. मात्र ईडीच्या (ED) कारवाईमुळे आरएल परिवार अडचणीत सापडला आहे, मात्र लवकरच यातून बाहेर पडेल, असा विश्वास आहे. सोन्याचा व्यवसाय करताना व्यापारी प्रामाणिकपणे काम करत असला तरी कधी कधी काम करताना चुका होतात, त्याचा फटका व्यापार करताना बसतो, अशी खंत जळगावच्या सोने व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
जळगाव येथील प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीने छापेमारी केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. तब्बल 45 तास चौकशी करण्यात आली. तीन दिवसांच्या छाप्यांमध्ये 24.7 कोटी रुपयांचे 39.33 किलो सोने आणि हिऱ्यांचे दागिने आणि 1.11 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. यानंतर जळगाव येथील सोने व्यावसायिकांनी या कारवाई आक्षेप घेत ही कारवाई अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केले आहे. राजमल लखीचंद परिवाराची एकशे पासष्ट वर्षांची सोने व्यवसायाची परंपरा आहे. त्यांनी संपूर्ण देशभर लोकांच्या विश्वास कमावला आहे. त्यांनी काही गैर कृत्य केले असे वाटत नाही, त्यांच्यासोबत झालेली कारवाई दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया सराफ असोसिएशनच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत.
जळगावमधील जळगाव जिल्हा सुवर्ण असोसिएशनचे सचिव स्वरूप लुंकड यांनी म्हटलं आहे की, आरएल गृपवर झालेली कारवाई कायद्याला धरुन असायला हवी. आरएल ग्रुपने बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात बँकेने चार टक्के ऐवजी सोळा टक्के व्याज आकारणी केली आणि त्यातून हा वाद निर्माण झाला. या वादातून ईडी किंवा सीबीआयसारख्या यंत्रणा लावण्याऐवजी हा वाद आपसात सोडवायला पाहिजे होता. राजमल लखीचंद परिवाराची एकशे पासष्ट वर्षांची सोने व्यवसायाची परंपरा आहे. मात्र ईडीच्या कारवाईमुळे आर एल परिवार अडचणीत सापडला आहे, मात्र लवकरच यातून बाहेर पडेल, असा विश्वास आहे. सोन्याचा व्यवसाय करताना व्यापारी प्रामाणिकपणे काम करत असला तरी कधी कधी काम करताना चुका होतात, त्याचा फटका व्यापार करताना बसतो, अशी खंत जळगावच्या सोने व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
![]() |
या घटनेत आरएल (R L Jwellers) ज्वेलर्सबाबत सीबीआय, इन्कम टॅक्स,ईडीसारख्या यंत्रणा वापरल्या गेल्या, हे व्हायला नको होते. त्यांच्या या कारवाईनंतर ज्वेलर्समधील सगळा माल घेऊन गेल्याने जळगाव सुवर्ण नगरीत एखाद्या दुकानातून संपूर्ण माल घेऊन जाणे ही कारवाई शंभर टक्के अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया स्वरूप लूंकड यांनी दिली आहे. व्यापारी म्हणून याकडे पाहिले की ईडीने केलेली कारवाईमध्ये संपूर्ण माल घेऊन जाणे. ज्या फर्मशी वाद आहे, ती फर्म सोडून दुसऱ्या फर्मचा माल जप्त करून घेऊन जाणे, त्यांचा व्यवसाय ठप्प करणे, हे दंडूकशाही आणि अन्यायकारक आहे. या कारवाईमुळे त्यांच्यावर अवलंबून असलेले अडीचशे कर्मचारी व्यवसायावर अवलंबून आहे. त्यांचा जगण्याचा प्रश्न या कारवाईने निर्माण झाला आहे. यामध्ये कायदेशीररित्या यांची चूक असेल तर कायद्याप्रमाणे कारवाई व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया सराफ असोसिएशनचे विजय वर्मा यांनी दिली.
1.11 कोटी रुपयांची रक्कम जप्त
ईडीने केलेल्या कारवाईत राजमल लखीचंद ग्रुपच्या 60 मालमत्तेचा तपशील हाती लागला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने जळगाव,नाशिक आणि ठाण्यात 13 ठिकाणी शोधमोहीम राबवली. अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या तीन दिवसात मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय ईश्वरलाल जैन आणि त्याचा साथीदारांच्या जवळपास 13 ठिकाणांची झडती घेतली. ईडीने गेल्या तीन दिवसांत टाकलेल्या छाप्यांमध्ये 24.7 कोटी रुपयांचे 39.33 किलो सोने आणि हिऱ्यांचे दागिने आणि 1.11 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. त्याशिवाय, ईडीला काही महत्त्वाच्या गोष्टी आढळून आल्या आहेत.
शहर
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
- नागपूर: "देशातील संविधान संपवून कम्युनिस्ट विचारसरणी लादण्याचा काँग्रेसचा डाव" राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर सत्ताधारी नेत्यांचा अत्यंत गंभीर व आक्रमक हल्लाबोल!
- मुंबई: पुन्हा भयानक दुर्घटना! उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका सफाई कामगाराचा जिवंत मृत्यू, दुसरा कामगार अतिरक्षक प्रकृतीत व्हेंटिलेटरवर
- छत्रपती संभाजीनगरः "मी मरेन, पण कधीही शरण जाणार नाही!"मनोज जरांगे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; दसऱ्यानंतर आंदोलनाची नवीन दिशा ठरवण्याचा इशारा
महाराष्ट्र
- सातारा: कृष्णा-कोयना काठच्या पिकांवर मोठे संकट; प्रशासनाकडून पीक पाहणीचा सविस्तर अहवाल सादर
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
- सातारा: वयाच्या पंच्याहत्तरीतही विशीसारखा उत्साह! वाईच्या जिद्दी आजीने सलग ९ वेळा वाचन करून स्वहस्ताक्षरात संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून काढली
- ठाणे: कोपरी पोलीस ठाण्यातच महिलांनी युट्युब भाई सिद्धू अभंगेला धुतले; पोलिसांसमोरच घडला राडा
गुन्हा
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल




























Subscribe to my channel




