आपण अशा काळात जगत आहोत, जिथे ज्ञान केवळ एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकते. एखादा प्रेरित शिक्षक जगातील अशा उत्कृष्ट कल्पना, व्हिडिओ व उदाहरणे तात्काळ वर्गात दाखवू शकतो, जे पाहून विद्यार्थी थक्क होतील. म्हणूनच गेल्या एका दशकात शैक्षणिक संस्थांनी- बहुतांश खासगी शाळा आणि आता सरकारी शाळांनी स्मार्ट बोर्डवर मोठी गुंतवणूक केली आहे यात काही नवल नाही. तंत्रज्ञानामुळे शिकवण्याची पद्धत बदलेल अशी अपेक्षा होती. ब्लॅकबोर्डवर लिहिण्यात अमूल्य वेळ वाया घालवण्याऐवजी शिक्षक फक्त पुढच्या स्लाइडवर स्वाइप करून ॲनिमेशन किंवा व्हिडिओ दाखवू शकतील आणि संपूर्ण वर्गाला खिळून ठेवू शकतील. यामुळे शिस्तही सुधारली. शिक्षकांना बोर्डवर लिहिण्यासाठी वारंवार पाठ फिरवावी लागत नसल्यामुळे खोडकर विद्यार्थ्यांनाही खोड्या करण्याची कमी संधी मिळते. काही वर्षांपूर्वी मी केलेल्या एका छोट्या सर्वेक्षणात शिक्षकांनी सांगितले होते की, स्मार्ट बोर्डमुळे 50-60 मिनिटांच्या क्लासमध्ये 11 ते 15 मिनिटे वाचतात. शाळांना वाटले की आता वर्गातील संपूर्ण वेळ लिहिण्याऐवजी शिकवण्यात जाईल. पण दुर्दैवाने ही अपेक्षा अनेकदा फक्त एका धोरणात्मक दस्तऐवजापुरतीच मर्यादित राहते. गोव्याचेच उदाहरण घ्या. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टिम फॉर एज्युकेशन (युडायस) अहवाल 2025-26 नुसार, गोवा अशा निवडक राज्यांत व दिल्ली व चंदीगडसारख्या केंद्रशासित प्रदेशांत समाविष्ट आहे, जिथे कथितपणे सर्व 1473 शाळांत इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. परंतु मीडिया रिपोर्ट््सनुसार अनेक शाळांमधील शिक्षक स्मार्ट बोर्डचा वापर सामान्य ब्लॅकबोर्डसारखा करण्यास मजबूर आहेत. कारण इंटरनेट कनेक्टिव्हिटी बेभरवशाची आहे किंवा उपलब्धच नाही. शिक्षक सांगतात की सरकार तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देत आहे, परंतु बेभरवशाचे इंटरनेट व वारंवार जाणारी वीज यामुळे ते हतबल होतात. स्मार्ट बोर्डचे वर्ग त्याच तासांमध्ये ठेवावे लागतात, जेव्हा वीज आणि इंटरनेट उपलब्ध असते. पावसाळ्यात तर ही अडचण जास्त वाढते. परिणामी शैक्षणिक व्हिडिओ आणि इंटरॅक्टिव्ह कंटेंट दाखवणे अशक्य होते. याच गोष्टीवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 मध्ये भर दिला आहे. तरीही पायाभूत सुविधा हा समस्येचा केवळ एक भाग आहे. अनेक शाळा-महाविद्यालयांना दिलेल्या भेटीत मला आणखी एक आव्हान दिसले. बरेच शिक्षक स्मार्ट बोर्डच्या प्रभावी वापरासाठी प्रशिक्षित नाहीत. उदा. काही शिक्षक संपूर्ण पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनमधूनच बाहेर पडतात, जेणेकरून रिकाम्या पांढऱ्या स्क्रीनवर काही पॉइंट्स लिहू शकतील. त्यांना हे माहीतच नसते की ते थेट प्रेझेंटेशनवरच आपली नोंद जोडू शकतात. आधुनिक स्मार्ट बोर्ड््समध्ये डिजिटल ॲनोटेशन, इंटरॅक्टिव्ह क्विझ, लाइव्ह वेब ॲक्सेस आणि इन्स्टंट कंटेंट शेअरिंगसारखे शेकडो फीचर्स असतात. मात्र अनेक शिक्षक त्यांचा वापर तसाच करतात, जसा ते ब्लॅकबोर्डचा करायचे. परिणामी, एक महागडा डिजिटल क्लासरूम केवळ एका इलेक्ट्रॉनिक रायटिंग सरफेससारखा उरतो. शिक्षण केवळ तंत्रज्ञानानेच चांगले होत नाही. यासाठी विश्वासार्ह पायाभूत सुविधा, सातत्यपूर्ण शिक्षक प्रशिक्षण आणि शिकवण्याच्या नव्या पद्धती स्वीकारण्याची मानसिकतादेखील गरजेची आहे. अन्यथा सर्वाधिक स्मार्ट बोर्डदेखील ब्लॅकबोर्ड बनूनच राहतील. हे पाहूनही दुःख होते की अनेक शिक्षक स्मार्ट बोर्डवर लिहिण्यासाठी स्टायलस ऐवजी बॉल पेनचे झाकण वापरतात. महागड्या ॲक्सेसरीजबाबत शिक्षकांचा असा निष्काळजीपणाचा दृष्टिकोन अप्रत्यक्षपणे मुलांना घरात पालकांनी आणलेल्या उपकरणांबाबतही नकारात्मक वर्तनास प्रवृत्त करतो. शिक्षकांनी हे लक्षात ठेवावे की संस्थेने दिलेल्या पायाभूत सुविधांबद्दलचा त्यांचा आदर आणि देहबोली मुलांना हे शिकवते की सरकारी मालमत्तेचा आदर कसा करावा. फंडा असा की, स्मार्ट बोर्ड खरेदी करणे आणि इन्स्टॉल करणे हे तर पहिले पाऊल आहे. जोपर्यंत संस्था विश्वासार्ह इंटरनेट, अखंडित वीज आणि नियमित शिक्षक प्रशिक्षण सुनिश्चित करत नाहीत तोपर्यंत ही महागडी उपकरणे तो इंगेजिंग, वेळ वाचवणारा आणि व्हिज्युअली रिच लर्निंग अनुभव देऊ शकणार नाहीत, ज्यासाठी ते बनवले गेलेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




