
Pune : दीड वर्षांपूर्वी कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीत बालेकिल्ल्यात झालेला पराभव भाजपच्या फारच जिव्हारी लागला होता. तेव्हाच आगामी विधानसभा निवडणुकीत ही जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला. त्यातच लोकसभा निवडणुकीत कसब्यात भाजपला आघाडी मिळाली. यामुळेच काँग्रेसचे विद्यामान आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात दीड वर्षाने होणाऱ्या लढतीची दुसरी फेरी कोण जिंकणार याची उत्सुकता आहे.
‘बालेकिल्ला’ अशी ओळख असलेल्या कसबा मतदारसंघात पोटनिवडणुकीतील पराभवामुळे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवाराचा वैयक्तिक जनसंपर्क, महाविकास आघाडीतील शिवसेनेची ताकद ही काँग्रेस उमेदवाराची जमेची बाजू असली, तरी बंडखोरीचे दुखणे कायम राहिले आहे. भाजपच्या दृष्टीने बालेकिल्ल्यातील मजबूत संघटन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जाळे या भक्कम बाजू ठरणार आहेत. मात्र, उमेदवाराच्या निवडीवरून असलेली नाराजी भाजपसाठी अडचणीची ठरणार आहे.
कसबा मतदारसंघातील लढत भाजप-काँग्रेस-मनसे उमेदवारांत तिरंगी होणार असली, तरी खरी लढाई भाजप आणि काँग्रेसमध्येच आहे. पोटनिवडणुकीप्रमाणेच काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्यातील सामना अटीतटीचा आहे. पोटनिवडणुकीत रासने यांना बालेकिल्ल्यातच पराभूत व्हावे लागले होते. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्यानंतर दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे या मतदारसंघावर एकहाती वर्चस्व होते.
|
Jammu-Kashmir Encounter : दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद, तर तीन जवान जखमी |
पोटनिवडणुकीत मात्र ब्राह्मण-ब्राह्मणेतर हा मुद्दा चर्चेला आला. काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दांडगा वैयक्तिक जनसंपर्कही भाजपच्या पराभवाला कारणीभूत ठरला होता. या अनुभवानंतर भाजपने मतदारसंघात पुन्हा मजबूत बांधणी सुरू केली. त्यानंतरही महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे) पक्षाची ताकद, भाजप उमेदवाराबाबतची काही प्रमाणात कायम असलेली नाराजी अशी आव्हाने भाजपपुढे आहेत. भाजपमधील बंडखोरी दूर करण्यात नेते देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे, तरीही निवडून येण्याचे आव्हान भाजपपुढे आहे.
निर्णायक मुद्दे
● कसब्यात या वेळी तिरंगी लढत होणार आहे. धंगेकर आणि रासने यांच्याशिवाय मनसेचे गणेश भोकरे हे तिसरे उमेदवार आहेत. ते कोणाची मते घेणार, यावरही भाजप आणि काँग्रेस उमेदवाराच्या विजयाचे गणित अवलंबून असेल. महायुतीमधील शिवसेनेची (शिंदे) या मतदारसंघात ताकद नाही. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे या मतदारसंघात संघटन आहे. मात्र, कसबा हा शिवसेना (ठाकरे) पक्षाला हवा आहे. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी कोणती भूमिका घेतात, ही बाबही निर्णायक ठरणार आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



