बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा झालेला पराभव आणित्यानंतर अनेक पक्षांत झालेली पक्षांतरे यामुळे प्रादेशिकपक्षांच्या प्रासंगिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.सध्या प्रादेशिक पक्ष संकटाचा सामना करत आहेत हेखरे आहे. परंतु त्यांचे महत्त्व संपले असे मानणे घाईचेठरेल. बंगालमध्ये तृणमूल किंवा दिल्लीत‘आप''सारख्या पक्षांच्या पराभवाकडे प्रादेशिक पक्षांचाकायमचा अस्त म्हणून पाहिले जाऊ नये. गेल्या चारलोकसभा निवडणुकांसोबतच विविध राज्यांच्याविधानसभा निवडणुकांतही राष्ट्रीय आणि प्रादेशिकपक्षांच्या मतांच्या टक्क्यांत फारसा फरक पडला नाही. कोणत्याही पक्षाचा मूळ जनाधार ओळखण्यासाठीमतांची टक्केवारी हा सर्वात उत्तम निकष असतो. हेलक्षात घेणे महत्त्वाचे आहे. याशिवाय,लोकसभेच्यातुलनेत मतदार विधानसभा निवडणुकांत प्रादेशिकपक्षांना अधिक पसंती देतात. ही बाब स्थानिक राजकीय ओळखीचे महत्त्व अधोरेखित करते. बंगालमधील पराभवानंतर तृणमूलच्या अनेक आमदार,खासदारांना पक्षांतराला सामोरे जावे लागले. ‘आप''च्याराज्यसभा खासदारांमध्येही मोठ्या प्रमाणावर पक्षांतरझाले. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्रपवार) खासदारांनीही गट बदलला. या घडामोडीसंघटनात्मक कमकुवतपणा नक्कीच दाखवतात. पण हाजनसमर्थन घटल्याचा पुरावा मानला जाऊ शकत नाही.सध्या 11 राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे तरकाँग्रेसची सत्ता 3 राज्यांत आहे. प्रादेशिक पक्ष 4राज्यांमध्ये सत्ता चालवत आहेत. 10 इतर राज्ये आणिकेंद्रशासित प्रदेशांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालीलआघाडी सरकारे सत्तेत आहेत. यातील 4 राज्यांतप्रादेशिक पक्ष आघाडीचे प्रमुख भागीदार आहेत आणिभाजपची भूमिका घटक पक्षाची आहे. आंध्र प्रदेश,मेघालय, नागालँड व पुद्दुचेरी ही ती राज्ये आहेत. उर्वरित6 राज्यांत भाजप प्रादेशिक पक्षांशी युती करून सरकारचेनेतृत्व करत आहे. यात बिहार, उत्तर प्रदेश, आसाम,गोवा, महाराष्ट्र आणि त्रिपुराचा समावेश आहे. 3राज्यांमध्ये काँग्रेसही प्रादेशिक पक्षांसोबत आघाडीसरकारचा भाग आहे. झारखंडमध्ये काँग्रेस ही‘झामुमो''ची तर जम्मू-काश्मीरमध्ये ‘नॅशनलकॉन्फरन्स''ची लहान सहकारी पक्ष आहे. केरळमध्येकाँग्रेस इतर प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी सरकारचेनेतृत्व करत आहे. गेल्या चार लोकसभानिवडणुकांमधील विविध पक्षांच्या मतांचे विश्लेषणकेले असता या काळात राष्ट्रीय पक्षांची एकूण मते60.04% ते 68.15% दरम्यान राहिल्याचे दिसते.म्हणजेच त्यांचे एकूण राजकीय समर्थन साधारण स्थिरराहिले आहे. सर्वाधिक 68.15% मते त्यांना 2019 च्यालोकसभा निवडणुकीत मिळाली होती. महत्त्वाची बाबम्हणजे 2014 ची निवडणूक हे दाखवते की भारताच्या‘फर्स्ट-पास्ट-द-पोस्ट '' निवडणूक पद्धतीत मतांचीटक्केवारी, निवडणुकीचा निकाल नेहमी एकमेकांनुसारनसतो. गेल्या चार लोकसभा निवडणुकांमध्ये 2014मध्ये राष्ट्रीय पक्षांची एकूण मते सर्वात कमी असूनही,भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए''ने स्पष्ट बहुमतमिळवून केंद्रात सरकार स्थापन केले होते. 2009 च्यालोकसभा निवडणुकीत सर्व राष्ट्रीय पक्षांना मिळून63.59% मते मिळाली होती तर 2024 च्या निवडणुकीतहा आकडा 62.72% होता. दुसरीकडे, प्रादेशिक पक्षांनी लोकसभा निवडणुकांमध्येसातत्याने सुमारे एक-तृतीयांश मते मिळवली. 2009 च्यालोकसभा निवडणुकीत सर्व प्रादेशिक पक्षांना मिळून31.22% मते मिळाली होती, तर 2014 मध्ये हे प्रमाण35.86% होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतहीसर्व प्रादेशिक पक्षांची एकूण मते 33.52% होती. केवळ2019 ची निवडणूक याला अपवाद ठरली. तेव्हाप्रादेशिक पक्षांची मते 28.1% पर्यंत खाली आली होती. हेआकडे स्पष्ट करते की काही राज्यांत पराभव होऊनहीप्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पातळीवर व अनेक राज्यांतआपला जनाधार मजबूत ठेवला आहे. परंतु,तमिळनाडूमध्ये ‘द्रमुक''चे नुकसान झाले तेव्हा त्यांचीजागा कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने नाही, तर ‘टीव्हीके'' यादुसऱ्या प्रादेशिक पक्षाने घेतली हे आपण विसरता कामानये. यावरून अनेक राज्यांतील राजकीय स्पर्धेचे स्वरूपअजूनही प्रामुख्याने प्रादेशिक ताकदींवरच अवलंबूनअसल्याचे दिसून येते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) गेल्या चार लोकसभानिवडणुकांसोबतच विविध राज्यांच्याविधानसभा निवडणुकांमध्येही प्रादेशिकपक्षांच्या मतांच्या टक्क्यांमध्ये फारसाबदल झालेला नाही. मतांची टक्केवारीहा पक्षाचा मूळ जनाधार दर्शवणारा उत्तमनिकष असतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुणे पदवीधरमध्ये भाजपला धक्का; शरद लाडांचा अचानक अर्ज!
पुण्यात ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत दुचाकी रॅली; मुरलीधर मोहोळ हेल्मेट घालून सहभागी
भारतीय हवाई दलाची ऐतिहासिक कार पुन्हा चर्चेत; १९६० ची फोर्ड गॅलॅक्सी!
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



