पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आयुष्यात माया छळेल तेव्हा‎ देवाच्या लीलेशी जोडले जा

पूजा-पाठ करणारे लोकसुद्धा अनेकदा भ्रमात पडतात. ''आमच्याच‎बाबतीत असे का घडते? ईश्वर खरोखर आहे का? असेल तर तो‎आमचे का ऐकत नाही?'' अशा तक्रारी ते करतात. यावर संत‎तुलसीदासजी लिहितात— ''परबस जीव स्वबस भगवंता, जीव अनेक‎एक श्रीकंता.'' म्हणजेच माणूस परतंत्र आहे आणि भगवान पूर्णपणे‎स्वतंत्र आहेत. जीव अनेक आहेत, पण सर्वांचा स्वामी एकच आहे.‎ तुलसीदासजी स्पष्ट सांगतात की, ही माया भ्रम निर्माण करते. या‎मायेपासून वाचण्यासाठी भजन करावे. भजन करताच आपण देवाजवळ‎जातो किंवा देव आपल्याजवळ येतो. भागवत पुराणात कृष्णाने‎रासलीला केली, तेव्हा लोक भ्रमात पडले. कृष्ण आणि गोपिकांच्या‎रूपात लोक स्त्री-पुरुष शोधू लागले. हीच ती माया! पण मनापासून भजन‎केले तर ही माया दूर होते. ''कृष्ण'' या शब्दाचा अर्थच आकर्षित करणारा‎आणि भक्ताला स्वतःत सामावून घेणारा असा आहे. म्हणूनच,‎आयुष्यात जेव्हा माया सतावेल, तेव्हा ईश्वरलीलेत लीन व्हा.‎‎

This post was originally published on this site.



महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *