माझ्या माहेरच्या घरातील शब्दसंपदा सत्संगातून आलेलीआहे. आमच्याकडे एखाद्याचे निधन झाले की, ‘त्यांचेशरीर शांत झाले,’ असे म्हटले जाते. फाळणीच्या वेदनासोसलेल्या विविध व्यवसायांत यश-अपयशअनुभवलेल्या सिंधी समाजाला मृत्यू किंवाआजारपणाची भीती सहज वाटत नाही. मला आठवते,वडील आईला म्हणायचे, ‘माझे कपडे फाटले आहेत,किती ठिकाणी ते शिवणार?’ प्रत्यक्षात ते आपल्याशरीराविषयी बोलत असत. आई-वडील एकमेकांनाविचारायचे, ‘आपल्यापैकी आधी कोणाचे स्टेशनयेणार?’ म्हणजेच आयुष्याच्या रेल्वेप्रवासातून आधीकोण उतरून जाणार? मृत्यूची ही स्वीकारार्हता आणि त्यामागची तत्त्वज्ञानाची दृष्टी होती का? याउलट माझ्या गुजराती सासरच्या घरात वेगळीच कथा दिसते. येथे ‘जीवनाचा दर्जा’ जपण्यावर भर दिला जातो. शरीराची काळजी घेतली जाते आणि मृत्यूनंतरही आठवणी जतन केल्या जातात. एक कुटुंब इतिहासातील चढ-उतारांतूनगेले आहे तर दुसऱ्याने शिक्षण आणि आधुनिकतेचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे मला अनेकदा असे वाटते कीमी दोन घरांत नव्हे, तर दोन वेगळ्या देशांत जगत आहे. आणि त्यांतील सर्वात मोठा फरक मृत्यूकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात दिसून येतो. भलेही मृत्यू सर्वांसाठी समानअसल्याचे म्हटले जाते. माझ्या स्मरणात सर्वप्रथम कवी जॉन डन यांच्या प्रसिद्धओळी उमटतात – ‘डेथ, बी नॉट प्राउड, दो सम हॅवकॉल्ड दी माइटी एंड ड्रेडफुल, फॉर दाउ आर्ट नॉट सो’. या कवितेत कवी मृत्यूला सांगतो की, तू आम्हालासंपवत नाहीस; आम्ही फक्त एका दीर्घ निद्रेत जातोआणि पुढे कुठेतरी नव्या जगात प्रवेश करतो. म्हणूनमृत्यूने आपल्या सामर्थ्याचा गर्व करू नये. त्यालाहीआपले कर्तव्य पार पाडावे लागते. प्रत्येकाच्या आयुष्यातकधीतरी यावेच लागते. शाळेत ही कविता शिकतानामृत्यूविषयी विचार करण्याची ना गरज होती, ना क्षमता.पण आता ती कविता वारंवार आठवते. ती निर्भयतेचासंदेश देते का? माझे आई-वडील त्यांच्या पद्धतीने हेचसमजून घेत होते का? माझ्या स्वतःच्या मृत्यूचा विचारमला फारसा भयावह वाटत नाही. पण जवळच्यामित्रांचा किंवा कुटुंबीयांचा मृत्यू पाहण्याची कल्पनाचअस्वस्थ करणारी आहे. स्वतःला दुःखाच्या अथांगसागरात पाहण्याचा विचारही मन हेलावून टाकतो. याभीतीला आपण कसे लहान करू शकतो? ‘शरीर शांतझाले’ असे म्हणणे आत्मा अमर असल्याची समजूतघालते का? की आपल्या माणसांविषयी अलिप्ततानिर्माण झाली तर दुःख सहन करणे सोपे होते? याप्रश्नांची उत्तरे शोधताना मी साहित्यातील मृत्यूच्या प्रतिमाशोधू लागले. मला साहित्य हे जीवनाच्या गूढतेचे सर्वातप्रभावी प्रतिबिंब वाटते. या शोधप्रवासातील एक विशेषअनुभव सांगावासा वाटतो. संधी मिळाली तर पुढेआणखी काही सांगीन. ही कथा ज्येष्ठ गुजराती लेखिकाधीरुबेन पटेल यांच्या ‘अंगत अनुभव’ या कथेतून आहे.रसिकभाई नावाचा एक कर्मचारी अतिशय बडबडाआणि अशुभ बातम्या सांगण्यात पटाईत असतो. तोकार्यालयात बसला की इतर कर्मचारी त्याच्यापासून दूरराहतात. त्याला चहा हवा का असे विचारले तर चर्चाचहापासून दूध, दुधापासून गाय आणि पुढे कुठल्यातरीविषयापर्यंत पोहोचते. पोळींचा विषय निघाला तरी तोनोकर किती पोळ्या खातात, स्वतः किती खातो,कोणत्या पिठाच्या पोळ्या मऊ होतात. कुठला गहूचांगला असतो, अशा अखंड गप्पा मारत राहतो. एकदा कार्यालयातील लोकांना समजते कीरसिकभाईंच्या तरुण मुलाचे अकस्मात निधन झालेआहे. काही दिवसांनी ते पुन्हा कार्यालयात येतात. सर्वांनावाटते आता तर ते आणखी बोलतील. पण आश्चर्यम्हणजे रसिकभाई पूर्णपणे शांत झालेले असतात. कोणीकाही विचारले तर फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ एवढेचउत्तर देतात. शब्दांच्या जंगलात रमणारा माणूस जणू त्याजंगलातून बाहेर पडलेला असतो. मृत्यूचा हा सर्वांतगुंतागुंतीचा रंग आहे. स्वतः जिवंत असताना आपल्यालेकराला गमावणे. अशा वेळी मृत्यू आयुष्याच्या कडेलाराहत नाही; तो थेट आयुष्याच्या मध्यभागी येऊन बसतो. (हे लेखिकेचे वैयक्तिक विचार आहेत.) मला आठवते, वडील आईला म्हणायचे,‘माझे कपडे फाटले आहेत, ते कितीठिकाणी शिवणार?’ प्रत्यक्षात तेआपल्या शरीराविषयी बोलत असत. तेएकमेकांना म्हणत- ‘आपल्यापैकी आधीकोणाचे स्टेशन येणार?’ म्हणजेआयुष्याच्या प्रवासातून आधी कोणउतरून जाणार, याविषयी ते सहज होते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




