कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) संदर्भातील जागतिक चर्चासध्या प्रामुख्याने संशोधन संस्थांमधील स्पर्धा किंवातंत्रज्ञानाच्या क्षमतांपुरती मर्यादित आहे. मात्र एआयचाउपयोग नेमका कोणत्या उद्देशासाठी व्हावा किंवाविद्यमान संस्था व नियामक यंत्रणा हे तंत्रज्ञानमानवकल्याणाच्या दिशेने नेऊ शकतील का, हा मूलभूतप्रश्न फारसा विचारला जात नाही. अलीकडे पोप लियो यांनी एआय मानवी प्रतिष्ठेसाठीगंभीर धोका असल्याचे म्हटले. अनेक वर्षांपासूनतंत्रज्ञानाचे परिणाम हे आपले नशीब नसून आपल्यानिवडींवर अवलंबून असतात, असा युक्तिवाद करणाराअर्थतज्ज्ञ म्हणून मी पोप यांच्या हस्तक्षेपाचे स्वागतकरतो. बहुतांश विश्लेषक हे लक्षात घेत नाहीत कीतंत्रज्ञान कधीही तटस्थ नसते. ते निर्माण करणारे, निधी पुरवणारे आणि नियंत्रण ठेवणारे लोक त्यावर आपलाठसा उमटवत असतात. त्यामुळे आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, एआयला नेमके कोणते काम करण्यासाठी तयार केले पाहिजे? एआयसारखे तंत्रज्ञान अनेक मार्गांनी विकसित होऊ शकते आणि प्रत्येक मार्गाचे समाजावर दूरगामी परिणाम होतात. काही वर्षांपूर्वी अयोग्य मानल्याजाणाऱ्या गोष्टी आज सामान्य झाल्या आहेत. एआयच्या मदतीने व्यापक पाळत ठेवणे किंवा लक्ष्य निश्चित करून हल्ले करणारी अल्गोरिदम प्रणाली याची उदाहरणे आहेत. सिलिकॉन व्हॅलीतील अनेक जण अमेरिकेने नव्यालष्करी-अल्गोरिदम व्यवस्थेद्वारे आपली सामरिकताकद वाढवावी, असा आग्रह धरत आहेत. परंतुतंत्रज्ञानामुळे प्रत्यक्ष मानवी संपर्काशिवाय हल्ले करणेसोपे होते. ते संघर्षांच्या नैतिक मर्यादा कमकुवत करते.त्यामुळे एआयचे लष्करीकरण रोखणे आवश्यक आहे.हा विषय केवळ संरक्षण क्षेत्रापुरता मर्यादित नसूनआर्थिक आणि बौद्धिक पातळीवरही महत्त्वाचा आहे.तांत्रिक प्रगती म्हणजे नैतिक प्रगती असे नसते, हे लक्षात घेतले पाहिजे. एखादी गोष्ट तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे म्हणजे तीमानवतेसाठी उपयुक्तच असेल, असे नाही. कोणतेतंत्रज्ञान स्वीकारार्ह आहे, हे त्यावर नियंत्रण कोणाचेआहे आणि त्यामागील विचारसरणी व हितसंबंधकोणते आहेत, यावर अवलंबून असते. एआय रोजच्या अनेक जबाबदाऱ्या स्वीकारूनउत्पादकता वाढवतो. पण त्याचवेळी कामगारांना यंत्रांच्यागतीशी आणि अपेक्षांशी जुळवून घेण्यास भाग पाडतो.प्रत्यक्षात यंत्रांची रचना कामगारांना पूरक ठरेल, अशीअसायला हवी. आज संपूर्ण एआय उद्योग मानवी क्षमतांची नक्कलकरण्यावर आणि मनुष्य करत असलेल्या कामांचेस्वयंचलन करण्यावर भर देत आहे. त्यातून अशी कृत्रिमसर्वसाधारण बुद्धिमत्ता (एजीआय) विकसितकरण्याचा प्रयत्न सुरू आहे, जी माणूस करू शकतो तेसर्व काही करू शकेल. मात्र हा दृष्टिकोन एका चुकीच्या गृहितकावर आधारितआहे. तो म्हणजे यांत्रिक बुद्धिमत्ता आणि मानवीबुद्धिमत्ता मूलतः सारख्याच आहेत. प्रत्यक्षात माणूसकाही मोजक्या अनुभवांतून शिकतो. तो गृहितके तयारकरतो. मनात विविध शक्यतांचा विचार करतो आणिप्रयत्न-चुकांच्या सामाजिक प्रक्रियेतून आपले आकलनअधिक परिपक्व करतो. मुले भाषा शिकतात, तीही याचपद्धतीने. याउलट एआय प्रणाली प्रचंड प्रमाणातीलप्रशिक्षण डेटावर अवलंबून असतात. मोठ्या प्रमाणावरनमुने ओळखण्यात त्या कुशल असतात. मात्र त्यांनीअद्याप खरी सर्जनशीलता दाखवलेली नाही. त्यांनावास्तविक जगाचा प्रत्यक्ष अनुभव नाही. तसेच भौतिकआणि सामाजिक जगाशी संवाद साधून शिकण्याचीमानवी क्षमता त्यांच्यात दिसून आलेली नाही. दोन गोष्टी इतक्या मूलभूतपणे वेगळ्या असतात, तेव्हाएका गोष्टीचा वापर दुसऱ्याची नक्कल करण्यासाठीकरू नये. उलट माणूस करू शकत नाही अशी कामेएआयकडे सोपवणे अधिक उपयुक्त ठरेल. त्यामुळेमानवी क्षमतांचा विस्तार होईल. विशेषतः विकसनशीलदेशांतील अब्जावधी लोकांसाठी, जिथे चांगली नोकरी हेगरिबीतून बाहेर पडण्याचे सर्वात विश्वासार्ह साधनआहे, तिथे स्वयंचलन-केंद्रित एआय धोरण विनाशकारीठरू शकते. (प्रोजेक्ट सिंडिकेट) एआयचा वापर माणसांच्या जागीकरण्याऐवजी त्यांच्या क्षमतांना पूरकठरणाऱ्या कामांसाठी केला तरच तंत्रज्ञानआणि मानव यांच्यात संतुलितसहअस्तित्व निर्माण होऊ शकते. अन्यथारोजगार, सामाजिक स्थैर्य आणि आर्थिकसंधींवर गंभीर परिणाम होण्याचा धोकाआहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




