नवीन कामगार कायदा सुधारणांनी महिलांना रात्रीच्याशिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी दिली आहे. पण खराप्रश्न हा नाही की महिला रात्री काम करू शकतात कीनाही. खरा प्रश्न हा आहे की, आता आपण त्यांना कामकरताना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घेण्यास तयारआहोत का? कारण सुरक्षा जर केवळ महिलांच्या धैर्यावरसोडली, तर या सुधारणा अपयशी ठरतील. सुरक्षेचे उपाय म्हणजे केवळ घोषणा किंवा कार्यालयीनपरिपत्रके असू शकत नाहीत. ते व्यावहारिक, अमलातआणण्यायोग्य आणि तडजोड न करणारे असावेत. खऱ्यासुरक्षेचा अर्थ म्हणजे अनिवार्य एस्कॉर्ट धोरणे- जी पर्यायीनसतील किंवा मागणी केल्यावर दिली जाणारी नसतील,तर ती अनिवार्य असावीत. याचा अर्थ असाही आहे की, घराच्या दरवाजापर्यंत सुरक्षित वाहतूक व्यवस्था. यामध्ये पडताळणी केलेले चालक, जीपीएसद्वारे मागोवा घेतायेणारी वाहने, बदलणारे मार्ग, प्रकाशमान पार्किंग क्षेत्रआणि बाहेर पडण्याचा मार्ग यांचा समावेश असावा. पॅनिक-बटण हे केवळ शोभेचे नसावेत. तर ते थेट पोलिस आणि अंतर्गत प्रतिसाद पथकांशी जोडलेले असावेत. आपत्कालीन ॲप्स केवळ महानगरांच्या सादरीकरणापुरते मर्यादित राहू नयेत; ते सर्वत्र काम करतील याची काळजीघेतली पाहिजे. तक्रार निवारण अधिकारी २४x७ उपलब्धअसावेत, सुरक्षा समित्यांत महिलांना स्थान असावे. सर्वात महत्त्वाची गोष्ट- जबाबदारी स्पष्ट असावी. जरएखाद्या महिला कर्मचाऱ्याला काही इजा झाली, तर कंपनीकिंवा संस्था केवळ ‘चिंता’ व्यक्त करून मोकळा होऊशकत नाही. त्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे.कारण वास्तव हेच आहे की, रात्रीच्या शिफ्टमध्ये कामकरणाऱ्या महिलेला एक्सेल शीटची भीती वाटत नाही,तिला भीती वाटते ती प्रवासाची. वाहनांच्या प्रतीक्षेची.मदतीसाठी साद घातल्यानंतर पसरणाऱ्या शांततेची. परंतु सुरक्षा हा चित्राचा फक्त एक भाग आहे. नोकरीकरणाऱ्या महिलांना परवडणाऱ्या बालसंगोपन केंद्रांचीहीगरज आहे, जेणेकरून मातृत्व ही त्यांच्या करिअरचा अंतकरणारी घटना ठरणार नाही. लवचिक कार्य-नमुने(वर्क-मॉडेल) हे अपराधीपणाने भरलेले अपवाद नसून,ती एक सामान्य व्यवस्था असायला हवी. महिलांसाठीनोकऱ्या हे केवळ उदरनिर्वाहाचे नाही, तर ते आर्थिकसुरक्षेचेही साधन आहे. निर्णय प्रक्रियेत महिलांचीउपस्थिती अनिवार्य आहे, कारण ज्या शहरांची, वाहतूकव्यवस्थांची आणि कार्यालयांची रचना महिलांशिवायकेली जाते, ती कधीही त्यांना सुरक्षित वाटू शकत नाहीत.हा महिलांना रात्री कामासाठी भाग पाडण्याचा प्रश्न नाही,तर महिलांना वास्तविक पर्याय देण्याचा प्रश्न आहे. असेपर्याय, ज्यांना चांगल्या पायाभूत सुविधा, कायद्यांची कडकअंमलबजावणी आणि मानवी प्रतिष्ठेचे पाठबळ असेल. महिलांची सुरक्षा हा एक आर्थिक मुद्दादेखील आहे.जेव्हा महिलांना असुरक्षित वाटते, तेव्हा त्या काम करणेथांबवतात किंवा त्यातून बाहेर पडतात. परिणामी कुटुंबाचेउत्पन्न घटते आणि जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न घटते, तेव्हाअर्थव्यवस्थेचे नुकसान होते. कार्यशक्तीचा अर्धा भागविकासात सहभागी करून घेतल्याशिवाय भारत ५ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकत नाही. हे २०२६ साल आहे आणि आजही भारतीय महिलांपैकीकेवळ एक तृतीयांश महिला श्रमशक्तीमध्ये सहभागीहोतात, पुरुषांचे प्रमाण सुमारे तीन चतुर्थांश आहे. या एकतृतीयांश नोकरी करणाऱ्या महिलांचा मोठा भागदेखीलअनौपचारिक आणि असुरक्षित नोकऱ्यांमध्ये आहे आणिआर्थिक संकटाच्या वेळी सर्वात आधी त्यांनाच फटकाबसतो. पदवीधरांमध्ये महिलांचा वाटा ५१% असूनही- एकाअभ्यासानुसार- भारतात सुरुवातीच्या स्तरावरीलभूमिकांमध्ये त्यांचे प्रमाण केवळ २९% आहे. वरिष्ठव्यवस्थापनात ही संख्या घसरून ९% वर येते आणिसीईओ स्तरावर तर हे प्रमाण १% पेक्षाही कमी आहे. वर्ल्डइकॉनॉमिक फोरमने लिंग समानतेच्या बाबतीत १५३देशांमध्ये भारताला ११२ वे स्थान दिले आहे. ही परिस्थितीबदलली पाहिजे. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) दीर्घकाळापासून आपण महिलांच्यारोजगाराचा प्रश्न निर्बंधांद्वारे सोडवतआलो आहोत- जसे की, उशिरापर्यंत कामकरू नका, लांब कामाला जाऊ नका,जोखीम घेऊ नका. नवीन कामगार कायदासुधारणा ही स्थिती बदलतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




