
Which teams will benefit from MI’s win against SRH : आयपीएलचा १७वा हंगाम आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. आज ६ मे रोजी मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबाद संघाशी होणार आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्ससाठी हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत ११ सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत. संघाला ८ सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई आजचा सामना हरल्यास प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सच्या विजयाचा फायदा गुणतालिकेतल्या या ६ संघांना होणार आहे.
सनरायझर्स हैदराबाद चौथ्या स्थानावर विराजमान –
आयपीएल २०२४ मध्ये, सनरायझर्स हैदराबाद संघाने १० सामने खेळले आहेत, त्यापैकी ६ जिंकले आहेत आणि १२ गुण आहेत. संघ चौथ्या क्रमांकावर आहे. जर संघाने आजचा सामना जिंकला तर त्याचे १४ गुण होतील. या स्थितीत इतर संघांना प्लेऑफमध्ये पोहोचणे कठीण होईल. पण हैदराबादचामुंबई विरुद्झ पराभव झाल्याल्यास गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज, आरसीबी, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्सला फायदा होऊ शकतो. या संघांसाठी प्लेऑफचे दरवाजे उघडू शकतात. सर्वप्रथम, हैदराबादचे ११ सामने होतील आणि त्यांचे गुण केवळ १२ राहतील. दुसरा, ज्या सहा संघांना फायदा होईल. त्यांनी ११-११ सामनेही खेळले आहेत.
|
रिले संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ; जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेदरम्यान भारताच्या महिला, पुरुष संघांना यश |
चेन्नई सुपर किंग्ज –
चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने आयपीएल २०२४ मध्ये ११ सामने खेळले आहेत, त्यापैकी ६ सामने जिंकले आहेत आणि पाच सामन्यांमध्ये संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे हा संघ सध्या १२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबादच्या पराभवामुळे सीएसके संघ तिसऱ्या क्रमांकावर राहील. हैदराबाद जिंकल्यास एका स्थानाने खाली घसरेल.
लखनऊ सुपर जायंट्स –
लखनऊ सुपर जायंट्स संघाने आयपीएल २०२४ मध्ये ११ सामने खेळले आहेत, त्यापैकी ६ जिंकले आहेत. पाच सामन्यांत पराभव झाला असून संघ १२ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. संघाची निव्वळ धावसंख्या उणे ०.३७२ आहे. जर हैदराबाद हरले तर त्याचे सामने ११ होतील, परंतु गुण फक्त ११ राहतील. एलएसजीचीही तीच परिस्थिती आहे. त्यानंतर लखनऊ संघाला आपला पुढचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळायचा आहे.
दिल्ली कॅपिटल्स –
दिल्ली कॅपिटल्स संघाने ११ सामन्यांतून ५ जिंकले असून त्यामुळे त्यांचे १० गुण झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सचे तीन सामने बाकी आहेत. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी, अव्वल संघांनी त्यांचे सामने गमावणे आवश्यक आहे. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्धचासामना गमावल्यास दिल्लीसाठी प्लेऑफचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
आरसीबी, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स –
आरसीबी, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स या संघांनी आयपीएलमध्ये आतापर्यंत ४-४ सामने जिंकले आहेत. या सर्व संघांचे ८-८ गुण आहेत. हे संघ जास्तीत जास्त १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतात. मग त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सनरायझर्स हैदराबादने त्यांचे उर्वरित सर्व सामने गमावावेत. ज्याची सुरुवात आजच्या सामन्यापासून होऊ शकते. कारण हैदराबादचे सध्या १२ गुण आहेत.
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर





























Subscribe to my channel




