नवी दिल्ली: शिवसेनेचे नाव आणि 'धनुष्यबाण' चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या खटल्यात ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. सुनावणीदरम्यान, या देशात कायद्याचे राज्य टिकवून ठेवायचे असेल तर 'परिच्छेद १५' किंवा 'दहाव्या अनुसूची' (Anti-Defection Law) मधील तरतुदींचा अर्थ निश्चितपणे सोयीनुसार लावला जाऊ नये, असा युक्तिवाद सिब्बल यांनी न्यायालयासमोर मांडला. यावर सुनावणी करताना, "देशात लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपली आहे," असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नोंदवले आहे.
कपिल सिब्बल यांचे न्यायालयातील प्रमुख मुद्दे: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर ही अंतिम सुनावणी पार पडली. यावेळी युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आणि अधिकारक्षेत्रावर गंभीर आक्षेप घेतले:
-
घटना मान्य करून पदे मिळवली, मग आताच आक्षेप का?: २०१८ मधील शिवसेनेची पक्षघटना लोकशाहीविरोधी असल्याचे कारण देत शिंदेंच्या गटाने ती अमान्य केली; परंतु, याच पक्षघटनेच्या आधारे बंडखोरांनी पदे मिळवली, निवडणुका लढवल्या आणि मंत्रीपदेही भूषविली. मग अचानक १९९९ ची किंवा २०१८ ची घटना कशी अमान्य ठरवता येईल, असा सवाल सिब्बल यांनी केला.
-
निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर बोट: पक्षाची घटना लोकशाहीवादी आहे की लोकशाहीविरोधी, हे ठरवणे निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही, असे नमूद करत केवळ विधिमंडळातील बहुमताच्या आधारे मूळ पक्ष ठरवणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
-
फूट आणि राजकीय पक्षाची संकल्पना: केवळ काही आमदारांनी स्वतंत्र बैठका घेतल्या म्हणजे राजकीय पक्षात फूट पडली असा होत नाही, मूळ राजकीय पक्षात प्रथम फूट होणे आणि संघटनात्मक बहुमताचा विचार करणे आवश्यक असते, असा युक्तिवाद त्यांनी मांडला.
न्यायालयाची निरीक्षणे: दोन्ही बाजूंच्या युक्तिवादादरम्यान, न्यायालयाच्या खंडपीठाने संघटनात्मक बाबी आणि राजकीय पक्षाच्या संदर्भातील कायदेशीर मुद्द्यांवर सखोल सवाल उपस्थित केले. लोकशाहीची मूल्ये आणि पक्षांतरा बंदी कायद्याच्या मूळ भावनेला धरून या प्रकरणात कायदेशीर छाननी सुरू असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायालयात निश्चित करण्यात आली आहे.
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- मुंबई: ओ मुंडे काका, आमचा वडापाव सुरू करा ना; विद्यार्थ्याच्या निरागस मागणीवर आयएएस अधिकारी तुकाराम मुंडेंचे प्रेरणादायी उत्तर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!

























Subscribe to my channel




