पुणे: मोशी कचरा डेपो दुर्घटनेत पती नागेश गायकवाड यांचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांत त्यांच्या पत्नी सोनाली नागेश गायकवाड (वय २३) यांचा बुधवारी सायंकाळी राहत्या घरी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेमुळे गायकवाड कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आणखी भर पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, या घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी आणि कारणांचा तपास सुरू केला आहे.
मोशी कचरा डेपो दुर्घटनेत १२ जुलै रोजी नागेश गायकवाड यांचा मृत्यू झाला होता. पतीच्या निधनाचा मोठा धक्का बसलेल्या सोनाली यांचाही काही आठवड्यांतच मृत्यू झाल्याने कुटुंबीयांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पतीच्या निधनानंतर आलेला मानसिक आघात आणि दुःख हे या घटनेमागील संभाव्य कारण असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सोनाली यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.
एमआयडीसी भोसरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, तपासातून घटनेमागील परिस्थितीबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. मोशी कचरा डेपो दुर्घटनेने आधीच गायकवाड कुटुंबातील एका कर्त्या व्यक्तीचा जीव घेतला होता. त्यानंतर अल्पावधीतच सोनाली यांच्या मृत्यूने या कुटुंबावर आलेल्या संकटाची तीव्रता आणखी वाढली आहे.
शहर
- मुंबई: प्रवाशांच्या जिवाशी खेळ वांद्रे पश्चिम स्टेशनबाहेर साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांची खोली कळेना, अपघाताचा धोका वाढला
- पुणे: परंपरा आणि नियमांचा समतोल गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांसाठी नियमावली तयार करण्याचे महापौरांचे आदेश!
- नागपूर: मोठा अनर्थ टळला गडचिरोलीला जाताना मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड!
- मुंबई: एका ध्येयवेड्या प्रवासाचा दुर्दैवी अंत २४ वर्षीय 'स्टार बायकर' रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमध्ये भीषण अपघातात मृत्यू!
महाराष्ट्र
- गडचिरोली: धावत्या एसटी बसचे चाक निखळून १०० फूट दूर शेतात पडले; चालकाच्या प्रसंगावधानाने २८ प्रवाशांचा जीव वाचला!
- पुणे: दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्ताराचा मार्ग मोकळा फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याची जागा ट्रस्टला देण्याबाबत पोलिसांकडून प्रस्ताव सादर
- मुंबई: प्रवाशांच्या जिवाशी खेळ वांद्रे पश्चिम स्टेशनबाहेर साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांची खोली कळेना, अपघाताचा धोका वाढला
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
गुन्हा
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: राज्यसभेत मोठा गदारोळ रामलिला मैदानावर झालेल्या 'शुद्धीकरण' हवन प्रकरणावरून मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाजपवर जोरदार प्रहार!
- नवी दिल्ली: "शिंदेंची निवडच लोकशाही विरोधी; ठाकरेंच्या वकिलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, संजय राऊतांना न्यायाची खात्री."
- कर्नाटक: "आरोग्यासाठी मोठा निर्णय! गुटखा, पान मसाल्यावर १ वर्षाची पूर्ण बंदी; उत्पादन अन् साठवणुकीवरही निर्बंध."
- उत्तर प्रदेश: रसमलाईचा वाद अंगलट! धाकट्या भावाकडून दादा-वहिनीवर कात्रीने जीवघेणा हल्ला



























Subscribe to my channel




