
Chennai Super Kings Defeat Sunrisers Hyderabad Ruturaj Gaikwad Tushar Deshpande Shine IPL 2024 : चेन्नई चेपॉकवर अभेद्य होती. मात्र केएल राहुलच्या लखनौनं येऊन सीएसकेचा बालेकिल्ला जिंकला. लखनौच्या आक्रमणानंतर आता हैदराबादचं मोठं आव्हान ऋतुराजसमोर होतं. सीएसकेचा नवखा कर्णधाराला हैदराबादचं अवाढव्य आव्हान परतवून लावत आपला बालेकिल्ला पुन्हा जिंकायचा होता.
समोर हेड, अभिषेक शर्मा, मार्करम, क्लासेन, पॅट कमिन्स, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार यासारखे तगडे योद्धे होते. त्यात नाणेफेक गमावल्यानं सीएसकेच्या सेनेचं काम अजून अवघड झालं होतं.
मात्र मराठमोळा लढवय्या कर्णधार ऋतुराजनं आपल्या संघाचं पुढं होऊन नेतृत्व केलं. तगड्या गोलंदाजीसमोर चेन्नईला म्हणावी तशी चांगली सुरूवात मिळाली नाही. त्यात अजिंक्य रहाणे स्वस्तात बाद झाला. मात्र ऋतुराज खचला नाही. त्यानं डॅरेल मिचलला साथीला घेतलं अन् आधी पॉवर प्ले संपायच्या आत झालेलं नुकसान भरून काढलं.
|
CSK Vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार |
पॉवर प्लेनंतरही ऋतुराजनं आपली फटकेबाजी सुरू ठेवली. त्याला मिचेलनंही दमदार साथ दिली. या जोडींन तिसऱ्या विकेटसाठी 107 धावांची शतकी भागीदारी रचली. त्यानंतर दांडपट्टा स्पेशलिस्ट शिवम दुबेनं 20 चेंडूत 39 धावा करत हैदराबादला हैराण करून सोडलं. कर्णधार ऋतुराज शंभरीजवळ पोहचला होता. तो जवळपास 200 च्या स्ट्राईक रेटनं धावा करत होता.
मात्र नटराजननं मोक्याच्या क्षणी सीएसकेच्या कर्णधाराला खिंडीत पकडलं अन् अवघ्या 2 धावांनी ऋतुराजचं शतक हुकलं. जरी शतक हुकलं असलं तरी ऋतु बहरला होता अन् सीएसकेने 200 चा आकडा गाठला होता. शेवटच्या षटकात शिवम दुबेनं शेवटचा हात फिरवून घेतला अन् संघाला महत्वाच्या धावा करून दिल्या. धोनीनंही हात धुवून घेत एक चौकार पदरी पाडून घेतला.
आता सीएसकेची खरी परीक्षा सुरू झाली होती. 212 धावा करून जरी अर्धी लढाई जिंकली असली तरी आता हैदराबाद पलटावर करणार होतं. हा पलटवार परतवून लावत बालेकिल्ला वाचवणं गरजेचं होतं. ऋतुराजच्या सेनेतला तुषार देशपांडेनं ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.
आधी त्यानं हैदराबादचे अव्वल शिलेदार ट्रॅविस हेड, अमोलप्रीत अन् अभिषेक शर्माची शिकार केली. पहिल्याच आक्रमणात तीन तगडे शिलेदार गमावल्यानं हैदराबादला हाबकी भरली. हैदराबादचे मधल्या फळीतील शिलेदार एडिन मार्करम अन् नितीश रेड्डी यांनी पुन्हा चढाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र सीएसकेच्या कसलेल्या गोलंदाजांच्या माऱ्यासमोर त्यांची आगेकूच मंदावली.
रेंगाळलेल्या मार्करम आणि नितीश रेड्डीला रोखून धरल्यानंतर पथिराना अन् जडेजानं त्यांचा काटा अलगद काढला. पथिरानानं एकहाती सामन्याचा नूर पालटण्यात तरबेज असलेल्या क्लासेनचीही शिकार केली. सीएसकेच्या या गोलंदाजांना फिल्ड प्लेसमेंटची उत्तम साथ लाभली. त्यामुळंच ओल्या मैदानावर परिस्थिती बाजूनं नसतानाही सीएसकेच्या पोरांनी हैदराबादला हैराण केलं.तुषार, पथिराना अन् जडेजाच्या या शिकारी मोहीमेत आता ठाकूर अन् मुस्तफिजूरही सामील झाले होते. त्यांनी समाद, शाहबाज अहमद यांची शिकार करत आपलाही वाटा उचलला. तुषार देशपांडेनं या शिकारी टोळीचं जबरदस्त नेतृत्व केलं. त्यानं हैदराबादच्या नेत्याला टिपला अन् हैदराबादला पराभवाच्या खाईजवळ नेऊन ठेवलं. मुस्तफिजूरनं उनाडकटची शिकार करत हैदराबादचा कडेलोट केला! सीएसकेनं आपला बालेकिल्ला पुन्हा मिळवला!
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




