“आजी, मी शाळेत जातोय!’ असं मी दररोज सकाळी दारातून ओरडायचो. त्यावर तिचा तो धारदार पण प्रेमळ आवाज यायचा: “मी किती वेळा समजावून सांगू? ‘जातोय’ असं कधीच म्हणू नकोस, फक्त ‘शाळेत जाऊन परत येईन’ असं म्हण.’ मी तिच्याकडे पाहिल्याशिवाय कधीच राहायचो नाही, “काय फरक पडतो’ आणि ती जे म्हणाली होती तेच पुन्हा म्हणून मी पळून जायचो. ते दोन शब्द-”मी येतोय’-सुरक्षितता आणि आश्वासनाचा एक अलिखित करार होता. ज्यावर आमचे वडीलधारी विश्वास ठेवत असत. त्यांना दारात उभे राहून हात हलवण्याची किंवा चुंबन पाठवण्याची गरज नव्हती. आम्ही निघताना ते आमच्याकडे काळजीयुक्त नजरेने पाहत नसत. हे ते दिवस होते जेव्हा आमच्याकडे काहीच नव्हते. आणि तरीही आम्हाला कशाचीही कमतरता नव्हती. ते आम्हाला अनवाणी आणि मोकळ्या मनाने जगात जाऊ देत. या विश्वासाने की गाव आम्हाला सुखरूप परत आणेल. आमचे पाय चिखलाने माखले तरी आम्ही रडत नसू. आम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या हातपंपावरून पाणी काढायचो. अंगावरची धूळ झटकून टाकायचो आणि वर्गाच्या जमिनीवर मांडी घालून बसायचो. त्या काळी, आम्हाला आमच्या प्रगतिपुस्तकाची (रिपोर्ट कार्डची) चिंतासुद्धा नव्हती. उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण एवढंच महत्त्वाचं होतं. मोठ्यांकडून बोलणी खाणं ही रोजचीच गोष्ट होती; त्यामुळे कोणताही मानसिक आघात होत नसे. जर एखाद्या अनोळखी व्यक्तीने खोडसाळपणाबद्दल आमचे कान पिळले, तर आम्ही वकील शोधायला धावत नसायचो-आम्ही ते सहज स्वीकारायचो. गावात सामाजिक पालकत्वाची पद्धत होती. आम्ही सर्वांचेच होतो. तेव्हा आमच्यासाठी सर्वात मोठी शरमेची गोष्ट कोणती होती? शिकवणीला (ट्युशनला) जाणं. 1960 च्या दशकात, अतिरिक्त वर्गांचा अर्थ असा होता की, एखादी गोष्ट पहिल्याच प्रयत्नात समजण्याइतके तुम्ही हुशार नाही. आणि आमची सर्वात मोठी चैन कोणती होती? सायकलच्या पुढच्या दांड्यावर किंवा गंजलेल्या कॅरियरवर बसून धुळीच्या वाटेवरून वेगाने सायकल चालवणे आणि फळे तोडण्यासाठी सायकलचा शिडीसारखा वापर करणे. तेव्हा आम्हाला वाटायचं की जणू आम्ही जग जिंकलं आहे. ते दिवस होते जेव्हा सर्वात मोठ्या आशा जुन्या पुस्तकांमध्ये होत्या. आम्ही पुस्तकांच्या पानांमध्ये मोराची पिसे आणि वाळलेली पिंपळाची पाने खोचत असू. या भोळ्या विश्वासाने की त्यामुळे आम्ही अधिक शहाणे होऊ. त्या नाजूक, सांगाड्यासारख्या दिसणाऱ्या पानांमध्ये-जी एखाद्या ललित कलेसारखी वाटत होती. रुजलेली ही श्रद्धा आम्हाला अशी एक गोष्ट देत असे, जी शहरांमध्ये क्वचितच मिळते-शुद्ध, निर्भेळ आशा. त्या काळी, प्रत्येक पाठ्यपुस्तकाला तपकिरी रंगाचे कव्हर असायचे आणि ती कापडी पिशव्यांमध्ये व्यवस्थित ठेवली जात असत. कारण ती फक्त आमची नव्हती. पुढच्या वर्षी ‘जुनी’ पुस्तके म्हणून विकण्यासाठी ती जपून ठेवावी लागत असत. त्यानंतर अभ्यासक्रम बदलेपर्यंत, मी आठवीपर्यंत जुन्या पुस्तकांचा वापर करूनच शिकलो. तरीही, आमच्या आई-वडिलांनी अभ्यासाच्या ओझ्याबद्दल कधीच तक्रार केली नाही. आयुष्य निश्चितच मर्यादित होते, पण आम्हाला कधीही गरिबी जाणवली नाही. दक्षिण भारतातील ‘मंदिरांचे शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंभकोणममध्ये-जिथे मी माझे बालपण, प्राथमिक शिक्षणासह, घालवले-संस्कृती पाठ्यपुस्तकांमधून शिकवली जात नव्हती; ती मातीत खोलवर रुजलेली होती. प्रत्येक गल्ली आणि वस्तीत मंदिरे असल्याने, ते रस्तेच पवित्र वाटत असत. रस्त्यावर थुंकण्याची, कचरा टाकण्याची किंवा तो प्रदूषित करण्याची कोणाचीही हिंमत होत नसे. याचे कारण म्हणजे एक अदृश्य सामाजिक धागा आम्हाला एकत्र बांधून ठेवत होता-भूमी, वडीलधारी मंडळी, प्राचीन मंदिरे आणि बारमाही कावेरी नदी यांच्याबद्दलचा आदर. निसर्ग आमच्यासाठी शोषण करण्याचे साधन नव्हता; उलट, ती आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली एक देवी होती. शनिवारी जेव्हा मी वाचले की गोव्यातील 56 गावांतील लोक, त्यांना ‘शहरी क्षेत्र’ म्हणून पुनर्वर्गीकृत करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे नाराज झाले आहेत. फंडा असा की... आधुनिक शहरे कधीही घरासारखी शांतता निर्माण करू शकत नाहीत, जिथे एखादे मूल ‘मी जाऊन परत येतोय’ असे म्हणू शकेल आणि त्याला खात्री असेल की ‘सामाजिक पालक’ त्याची काळजी घेण्यासाठी आहेत. आज, जेव्हा मी शहरांमधील गर्दीने भरलेले पण उदासीन रस्ते पाहतो. तेव्हा मला जुन्या दिवसांतील सुरक्षिततेची आठवण येऊ लागते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




