जगातील 57% कर्मचारी ‘पे-चेक टू पे-चेक’ म्हणजेच महिन्याच्या कमाईवर उदरनिर्वाह करत आहेत. अमेरिकेच्या एडीपीच्या ‘पीपल ॲट वर्क’ अहवालात हा खुलासा झाला आहे. अहवालानुसार इजिप्तमध्ये असे प्रमाण 84% आहे. भारतासाठी हा आकडा 76% आहे. याचा अर्थ असा नाही की सर्व लोक गरीब आहेत. याचे कारण म्हणजे उत्पन्नाचा मोठा हिस्सा दैनंदिन गरजा व जीवनशैलीवर खर्च होतो. अशा वेळी अचानक उद्भवणारी वैद्यकीय आणीबाणी, वाहन खराब होणे किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या खर्चासाठी पुरेशी बचत नसते. अहवाल सांगतो की, महिन्याच्या कमाईवर अवलंबून असणाऱ्यांपैकी 35% लोक 30 ते 40 हजारांचा आकस्मिक खर्च कर्ज घेतल्याशिवाय करू शकत नाहीत. कमी वेतन व महागाईनंतर जीवनशैलीचा खर्च हे एक मोठे कारण आहे. ही समस्या लक्षात घेऊन डेल्टा एअरलाइन्स, स्टारबक्स - ब्लॅकरॉक यांसारख्या अमेरिकी कंपन्या कर्मचाऱ्यांसाठी इमर्जन्सी सेव्हिंग्ज इनिशिएटिव्ह राबवत आहेत. याअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारातील एक छोटा हिस्सा नियमितपणे वेगळ्या खात्यात जमा होतो. तो केवळ आकस्मिक गरजांसाठी असतो, जेणेकरून कोणत्याही आणीबाणीच्या वेळी कर्जाची गरज भासू नये. ज्या कर्मचाऱ्यांनी इमर्जन्सी फंड तयार करण्यास सुरुवात केली, त्यांनी निवृत्तीसाठीही अधिक चांगल्या प्रकारे बचत केली. या उपक्रमामुळे निवृत्ती बचतीमध्ये 35 लाख डॉलरची अतिरिक्त रक्कम जोडली गेली, कारण त्यांना छोट्या-मोठ्या गरजांसाठी निवृत्ती फंडातून पैसे काढावे लागले नाहीत. अमेरिकेत या योजनेने बचतीचा दृष्टिकोनच बदलला आहे. आतापर्यंत असा समज होता की, कर्मचारी आधी काही बचत करतात, मग फिरणे, महागडी खरेदी किंवा इतर छंदासाठी त्या बचतीचा वापर करतात. पण ईएसआय मॉडेल वेगळे आहे. यात प्रथम आपत्कालीन परिस्थितीसाठी वेगळ्यासाठी प्रोत्साहित केले जाते. यामुळे आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जास्त स्थिर झाली. ताणतणाव कमी झाला आहे, कामाच्या ठिकाणी मनोबल वाढून गैरहजेरी कमी झाली. मॅनेजमेंट टिप: जर कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे छंद पूर्ण करण्याऐवजी आपत्कालीन परिस्थितीसाठी बचतीस मदत केल्यास कर्मचारी आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित अनुभवतील. त्यांची कार्यक्षमताही सुधारून ते दीर्घकाळ कंपनीशी जोडलेले राहतील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel



