दररोज हजारो नागरिकांना सायबर ठकांचे संशयास्पदफोन, संदेश किंवा व्हॉट्सअॅपवरील लिंक येतात. यापैकीबहुतांश लोक फसवणुकीचे बळी ठरत नाहीत. ते फोनकट करतात किंवा संदेशाकडे दुर्लक्ष करतात. तरीहीअशा फसवणुकीच्या प्रयत्नांची तक्रार करणाऱ्यांचे प्रमाणअंदाजे 5 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. यामागे अनेक कारणेआहेत. लोकांकडे वेळ नसतो. अनेकांचा यंत्रणांवरविश्वास नसतो. काही जण नोकरशाहीची उदासीनताकिंवा अधिकाऱ्यांच्या नकारात्मक अनुभवांमुळे तक्रारकरण्याचे टाळतात. मात्र याचा परिणाम असा होतो की,सायबर ठगांचा मोबाईल क्रमांक सक्रिय राहतो आणि तोनव्या लोकांना लक्ष्य करत राहतो. नागरिकांची ही शांतता गुन्हेगारांसाठी फायदेशीर ठरते.अधिकाधिक लोकांनी फसवणुकीचा प्रयत्न अयशस्वीझाला तरी त्याची तक्रार नोंदवली, तर सायबर ठगांचेसंपूर्ण जाळे अतिशय लवकर कमकुवत करता येऊशकते. पण प्रश्न असा आहे की, तक्रार कुठे आणि कशीकरायची? चांगली बाब म्हणजे आता तक्रार करण्यासाठी पोलिसठाणे किंवा सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही.दूरसंचार विभागाने (डीओटी) विकसित केलेल्या ‘संचारसाथी'' या मोबाईल ॲपच्या माध्यमातून कोणताहीनागरिक घरबसल्या संशयास्पद मोबाईल क्रमांकाचीतक्रार नोंदवू शकतो. काही मिनिटांतच ही प्रक्रिया सायबरठकाचे सिम कार्ड आणि गरज पडल्यास त्याचा मोबाईलहँडसेटही ब्लॉक करण्यास मदत करू शकते. सायबर फसवणुकीची तांत्रिक प्रक्रिया समजून घेतल्यासलोक वेळेत सावध होऊ शकतात. अनेक प्रकरणांतफसवणुकीची सुरुवात एपीके फाइल किंवा अशालिंकपासून होते. त्यात ‘21’(10 अंकी मोबाईलक्रमांक)# या स्वरूपातील विशेष कोड लपवलेलाअसतो. ही फाइल इन्स्टॉल करताच किंवा लिंकवरक्लिक करताच तुमचे व्हॉट्सअॅप खाते हॅक होऊ शकतेकिंवा त्यावरील नियंत्रण सायबर ठकांकडे जाऊ शकते.त्यानंतर वापरकर्त्याच्या माहितीशिवाय कॉल फॉरवर्डिंगआणि एसएमएस फॉरवर्डिंग सुरू केले जाते. सायबर ठकपीडिताचे व्हॉट्सअॅप वापरतो. त्यावरील संदेश वाचतोआणि त्याच खात्याचा वापर पुढील फसवणुकीसाठीकरतो. अनेकदा तो पीडिताच्या कुटुंबीयांशी किंवा मित्रांशीसंपर्क साधून त्यांनाही फसवणुकीचे बळी बनवण्याचाप्रयत्न करतो. अशी कोणतीही सायबर फसवणूकझाल्यास सर्वप्रथम आपल्या मोबाईलवरून ##21#डायलकरावे. हा साधा कोड सर्व कॉल फॉरवर्डिंग आणिएसएमएस फॉरवर्डिंग सेवा एकाच वेळी बंद करतो.त्यानंतर व्हॉट्सअॅपच्या अधिकृत तक्रार प्रणालीमध्ये‘My Account Has Been Hacked'' हा पर्याय निवडूनतक्रार नोंदवावी. फेसबुक खाते प्रभावित झाल्यास त्याचीअधिकृत रिकव्हरी सुविधा वापरावी. तसेच इन्स्टाग्रामखाते प्रभावित झाल्यास त्याच्या अधिकृत तक्रारप्रणालीचा वापर करावा. फक्त तांत्रिक माहिती नसलेले लोकच सायबर गुन्ह्यांचेबळी ठरतात, असे समजणे चुकीचे आहे. उच्चशिक्षितव्यक्ती, संगणक अभियंता किंवा नियमितपणे सायबरसुरक्षेच्या सूचना पाळणारी व्यक्तीदेखील याची शिकारहोऊ शकते. मानसिक थकवा, ताण, शारीरिक अस्वास्थ्यकिंवा क्षणिक निष्काळजीपणामुळे व्यक्तीची सतर्कताकमी होते. अशाच एखाद्या कमकुवत क्षणी विश्वासार्हवाटणारा फोन किंवा संदेश आपले काम करून जातो.
सायबर गुन्हेगार आपल्या शांततेवर अवलंबून असतात.फसवणुकीतून बचावलेल्या लोकांनीही तक्रार केली नाहीतर तेच मोबाईल क्रमांक सक्रिय राहतात आणि नव्यालोकांना बळी बनवत राहतात. यापासून बचाव करा.सतर्क राहा. तातडीने तक्रार नोंदवा. कोणत्याहीसमस्येवरील उपाय शोधण्याची सुरुवात इथूनच होते. (हे लेखकांचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




