तु म्ही कधी ‘मँगो स्वीट राइस आइस्क्रीम’ नावाच्या डेझर्टबद्दल ऐकले आहे का किंवा कुणाला आपल्या संपूर्ण मेन्यूला ‘ब्युटिरिशन’ (ब्युटी आणि न्यूट्रिशन मिळून बनलेला शब्द) म्हणताना ऐकले आहे का? जर नाही, तर हा लेख लक्षपूर्वक वाचा आणि जाणून घ्या की 2०26 च्या दिवाळीसाठी श्रीमंतांमध्ये फूड सेगमेंटबाबत कोणता ट्रेंड सुरू आहे. माझ्यासारखे लोक जिथे नवीन कपडे आणि मिठाई खरेदी करण्यासाठी पुढच्या महिन्याच्या पगाराची वाट पाहत आहेत, तिथे श्रीमंतांच्या स्वयंपाकघरांमध्ये यावर ‘डायनरमीट’ सुरू असेल की दिवाळी मिलनसाठी पाहुण्यांकरिता कशा प्रकारचा खास मेन्यू तयार करावा. ‘डायनरमीट’- हा शब्द मी बनवला आहे, ज्याचा अर्थ मेन्यूवर चर्चा करण्यासाठी मीटिंग असा आहे. विशेष म्हणजे या बैठकांमध्ये फूड ॲडव्हायझर, फूड सायंटिस्ट, फूड एक्सपर्ट, फूड क्युरेटर, फूड ॲम्बेसेडर आणि फूड डेकोरेटरसह अनेक लोक असतात. या सर्वांना मिळून ‘ट्रेंड्स कौन्सिल’ म्हटले जाते आणि ॲमेझॉनच्या मालकीच्या ग्रोसरी रिटेलर कंपन्या त्यांना कामावरही ठेवतात. हे व्यावसायिक केवळ इंग्रीडिएंट्सवरच चर्चा करत नाहीत, तर प्रीबायोटिक सोडा, खाण्याच्या पदार्थांमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि व्हिटामिन-डी च्या प्रमाणावरही बोलतात. आधी ते इटिंग हॅबिट्सच्या ट्रेंडवर चर्चा करतात आणि नंतर नवीन फ्लेवर आणि टेक्सचर कॉम्बिनेशन बनवण्यासाठी खाण्याच्या पदार्थांसोबत प्रयोग करतात. या पद्धतीला ‘डिश रीइन्व्हेन्शन’ म्हणतात, ज्यात पाहुण्यांना त्यांच्या आवडीचे अनोखे फूड कॉम्बिनेशन बनवण्यास सांगितले जाते. खाण्यापिण्याच्या पदार्थांचे नवीन प्रयोग केवळ कंपन्याच त्यांच्या बोर्डरूममध्ये करत नाहीत, तर श्रीमंतांच्या स्वयंपाकघरांमध्येही ही आयडिया फॉलो केली जात आहे. याची सुरुवात 2०15 मध्ये झाली होती, जेव्हा ट्रेंड्स कौन्सिलच्या सदस्यांनी आपले प्रिडिक्शन देण्यास सुरुवात केली आणि ही एक इंडस्ट्री प्रॅक्टिस बनली. कारण ग्राहकांना आपले अन्न कुठून आले आहे हे जाणून घेणे आवडते, त्यामुळे श्रीमंत कुटुंबांनीही पाहुण्यांना आपला बनवलेला पदार्थ दाखवण्यासाठी आणि त्याबद्दल समजावून सांगण्यासाठी ही शैली स्वीकारली आहे. ‘ब्युटिरिशन’ देखील असाच एक ट्रेंड आहे, ज्यात यजमान मेन्यूबद्दल सांगतात की यात कोलेजन, अँटिऑक्सिडंट्स, फायदेशीर फॅट आणि हायड्रेशनचे प्रमाण किती आहे, जे तुमची त्वचा उजळवू शकते. मला ज्या डेझर्टने आकर्षित केले, ते होते ‘मँगो स्वीट राइस आइस्क्रीम’. हे बनवण्यासाठी शेफ शिजवलेला, गरम आणि चिकट तांदूळ घेतात, ज्याला अनेकदा ‘स्वीट राइस’ म्हटले जाते. मात्र, ना हा तांदूळ गोड असतो आणि ना यात ग्लूटेन असते. मग त्याला मऊ करण्यासाठी त्यात कोकोनट मिल्क मिसळतात. दोन्ही मिक्सरमध्ये टाकून तांदळाला अगदी मऊ आणि सिल्की प्युरीसारखे बनवले जाते. यामध्ये अधिक चांगला रंग आणि गोडव्यासाठी पिकलेले आणि फ्रेश हनी मँगो मिसळले जातात. हे पुन्हा मिक्सरमध्ये फिरवतात. त्यानंतर डेकोरेटर प्युरीला एक आकार दिल्यानंतर त्यावर पिस्ता किंवा रोस्टेड बदामाचे पातळ आणि व्यवस्थित कापलेले तुकडे भुरभुरतो. याला सेट होण्यासाठी पूर्ण एक दिवस लागतो आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हे उघडून ‘मँगो स्वीट राइस आइस्क्रीम’ काढू शकता. माझ्यासाठी आइस्क्रीम मशीनशिवाय उत्तम आइस्क्रीम बनवण्याचा हा पहिलाच अनुभव होता. हल्ली कडू इंग्रीडिएंट्स जास्त चलनात आहेत. ग्राहक आणि पाहुणे कडू इंग्रीडिएंट्सकडे जास्त आकर्षित होताना दिसत आहेत. कदाचित डायजेस्टिव्ह वेलनेसवरील वाढत्या फोकसमुळे असे होत आहे. अशा वेळी नॉन-अल्कोहोलिक कॉकटेल आणि ब्रोकोली रेबे व डँडेलियन ग्रीन्ससारख्या कडू हिरव्या भाज्या वाढल्या जात आहेत. ब्रोकोली रेबे ही इटलीची एक पारंपरिक पालेभाजी आहे, जिचा संबंध शलजम फॅमिलीशी आहे. यामध्ये मऊ देठ आणि ब्रोकोलीसारख्या छोट्या-छोट्या कळ्या असतात. याचा फ्लेवर बोल्ड आणि किंचित कडू असतो, ज्याला संतुलित करण्यासाठी यात पुरेसा लसूण आणि ऑलिव्ह ऑइल मिसळतात. डँडेलियन ग्रीन्स ही सूर्यफूल फॅमिलीची गावठी पालेभाजी आहे. ती तिच्या तिखट, मिरचीदार चवीसाठी आणि मातीसारख्या कडवटपणासाठी ओळखली जाते, जी सिझनिंग आणि ॲसिडिक गोष्टी मिसळून सौम्य केली जाते. आता बीन्स, चणे आणि शेंगा केवळ साइड डिशेस राहिलेल्या नाहीत. हल्ली रात्रीच्या जेवणात प्रोटीन आणि फायबर-रिच डाएट म्हणून ते खूप योगदान देत आहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- नागपूर: अंबाझरीजवळ स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव कार नाल्यात कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: वारीला गेले अन् विठुरायाच्या चरणी विसावले! येरडवचे माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ सावंत यांचे पंढरपूरमध्ये निधन
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- सांगली: जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवेळी जयंत पाटील चीनमध्ये तोंड लपवून बसले; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
गुन्हा
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यातील एअर होस्टेस वर्षा तुरकर हत्या प्रकरणात नवं वळण! १५ लाख की ६० लाख? आर्थिक व्यवहारातून
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तानाट्यात भाजप OUT? काँग्रेसचा अध्यक्ष, शिवसेनेचा उपाध्यक्ष; भाजपची नाराज
धुळ्यात दिव्यांग शिक्षकाच्या बंद घरात चोरी! रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा



























Subscribe to my channel




