
Mephedrone Case : पुणे - अमली पदार्थ तस्कर ललित पाटील आरोपी असलेल्या अमली पदार्थ उत्पादन प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या खटल्याच्या सुनावणीला खेड न्यायालयात सुरुवात झाली आहे
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने खेड तालुक्यात सात ऑक्टोबर २०२० ला २० किलो मेफेड्रोन (एमडी) पकडले होते. या गुन्ह्यात ललित पाटीलसह एकूण २२ जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात ललित पाटीलसह वीस जणांवर गुन्हे दाखल असून, त्यांच्याविरोधात ऑक्टोबरमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
|
|
यापैकी आठ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, तर उर्वरित बारा आरोपी अद्याप येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. या खटल्याच्या सुनावणीत सरकार पक्षाने तक्रारदार पोलिस अधिकारी शकीर गोसोद्दीन जेनेडी यांची साक्ष नोंदवली
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका कारमधून २० किलो मेफेड्रोन पकडले होते. त्यातून अमली पदार्थ निर्मिती व तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आले. तपासादरम्यान आरोपींनी रांजणगाव येथील कंपनीत तब्बल १३२ किलो आणि रायगड जिल्ह्यातील महाड येथे दहा पंधरा किलो एमडी तयार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
या प्रकरणात पोलिसांनी ललित पाटीलसह एकूण २२ जणांना अटक केली होती. यांच गुन्ह्यात ललित पाटील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना अमली पदार्थाची तस्करी करत असल्याचे उघडकीस आले होते
या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी अमली पदार्थ जप्त करून त्यापैकी न्यायालयात सादर केलेल्या नमुन्यांचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत रासायनिक विश्लेषण केले नसल्याने अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या (एनडीपीएस) तरतुदींची पूर्तता झाली नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आठ आरोपींना गेल्या महिन्यात जामीन मंजूर केला होता.
मेफेड्रोन पकडल्याची कारवा 'इ कशी झाली, त्यावेळी कोणत्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते, यासह कारवा 'इचा घटनाक्रम जेनेडी यांनी साक्षीत सांगितल्याची माहिती या खटल्यातील विशेष सरकारी वकील शिशीर हिरे यांनी दिली. पुढील सुनावणी २७ नोव्हेंबरला होणार आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




