मायक्रोसॉफ्टने आपल्या सुमारे 60 हजार कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने नोकरी सोडण्याची ऑफर दिली आहे. त्याबदल्यात त्यांना विशेष पॅकेज दिले जाणार आहे. हे सर्व कर्मचारी नोकरी सोडतीलच असे नाही. पण ही बातमीच मुळात धक्कादायक आहे. आपल्या देशातही टेक क्षेत्र चिंताजनक स्थिती दर्शवत आहे. हे क्षेत्र दीर्घकाळापासून नोकऱ्या निर्माण करणारे सर्वात भरवशाचे क्षेत्र मानले जाते. स्टाफिंग कंपनी हान डिजिटलच्या मते, भारतातील आयटी-बीपीएम क्षेत्रात नवीन पदवीधरांच्या भरतीचे प्रमाण घटले आहे. 2021-22 मध्ये हा आकडा अंदाजे 4 लाख होता, तो 2025-26 मध्ये 1.75 लाखांवर आला आहे. टेक क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नवीन नोकऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. 2021-22 मधील 4.45 लाखांवरून ती 2025-26 मध्ये 1.35 लाखांवर घसरली आहे. ही तब्बल 70 टक्क्यांची घसरण आहे. असे असले तरी, आपल्या मुलांना इंजिनिअर बनवण्याचे भारतीय मध्यमवर्गाचे स्वप्न कमी झालेले नाही. ‘एडकॉम रिसर्च’ने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अधिकृत डॅशबोर्डवरील आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार, इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशांत मोठी वाढ झाली आहे. 2021-22 मधील 9.2 लाखांवरून ही संख्या 2025-26 मध्ये 13.5 लाखांवर पोहोचली आहे. आजची परिस्थिती मात्र वेगळी आहे. इंजिनिअरिंगला दहा प्रवेश होतात, तेव्हा कुठे एकाला टेक क्षेत्रात नोकरी मिळते. पूर्वी हे क्षेत्र इंजिनिअरिंगच्या मोठ्या प्रमाणातील पदवीधरांना रोजगार देत असे. आता आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांच्या संधी कमी होत आहेत. तरीही इंजिनिअरिंगला मिळणारे प्रवेश सतत वाढतच आहेत. ‘माझा मुलगा इंजिनिअर बनेल!’ हे स्वप्न आजही जिवंत आहे. ‘पण त्यानंतर तो काय करेल?’ हा प्रश्न मात्र कुणीही विचारत नाही. आयटीमध्ये नवीन पदवीधरांसाठी ज्या थोड्याफार नोकऱ्या उरल्या आहेत, त्यात पगार फारसा आकर्षक नाही. एका अहवालानुसार, भारतातील मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये नवीन कर्मचाऱ्यांचा सुरुवातीचा पगार अनेक वर्षांपासून तोच आहे. तो वर्षाला तीन ते चार लाख रुपयांच्या आसपासच रेंगाळत आहे. ही समस्या केवळ आयटी क्षेत्रापुरती मर्यादित नाही. ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्या प्रोफेशनल्सच्या इतर उद्योगांनाही याचा फटका बसू शकतो. याचे कारण नवीन कर्मचाऱ्यांना जी कामे दिली जातात ती ठराविक प्रक्रियांवर आधारित असतात. आणि हीच कामे एआय अतिशय सहजपणे करू शकते. उदाहरणार्थ, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील बेसिक कोडिंग, डिबगिंग आणि टेस्टिंगसारखी कामे एआय करू शकते. कायदेशीर क्षेत्रात करारांची तपासणी करणे आणि खटल्यांशी संबंधित रिसर्च करण्याचे कामही ते करू शकते. कन्सल्टिंग क्षेत्रात प्रेझेंटेशन तयार करणे आणि ग्राहक सेवेतील रोजच्या प्रश्नांची उत्तरे देणे त्याला सहज शक्य आहे. याची दुसरी बाजूही आहे. आजचे वरिष्ठ कर्मचारी निवृत्त होतील, तेव्हा त्यांची जागा घेण्यासाठी पुरेसे अनुभवी कर्मचारी नसतील. तुम्ही नवीन पदवीधरांना नोकरीच दिली नाही, तर त्यांना अनुभव कसा मिळणार? आर्थिक उदारीकरणानंतर भारतीय कुटुंबे यशाच्या एका ठरलेल्या सूत्रावर चालत आली आहेत. मन लावून अभ्यास करा. चांगले गुण मिळवा. चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्या. पदवी मिळवा. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकरी मिळवा. पगार कमवा आणि स्वावलंबी व्हा. पण आता एआयने या शर्यतीचे नियमच बदलून टाकले आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला आपल्या विचारसरणीत आणि करिअरच्या नियोजनात बदल करावे लागतील. पहिला बदल म्हणजे, दररोज एक तास एआयच्या जगात होणाऱ्या नवीन घडामोडी समजून घेण्यासाठी द्यावा. या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवा. नवनवीन एआय टूल्सचा वापर करून काही प्रॉडक्टिव्ह काम करा. दुसरे म्हणजे, इंजिनिअरिंगची पदवी मिळवण्याचे वेड सोडून द्या. पूर्वी इंजिनिअरिंगची पदवी तुम्हाला नोकरी आणि प्रतिष्ठा मिळवून देत असे. पण आता त्याची कोणतीही खात्री राहिलेली नाही. आणि तिसरे म्हणजे, ‘ब्लू-कॉलर जॉब्स’कडे तुच्छतेने पाहू नका. प्रत्येकाला ऑफिसमध्ये बसून करण्याची नोकरी हवी असते. पण एआयमुळे याच नोकऱ्या सर्वाधिक धोक्यात आल्या आहेत. आपण अशा एका काळाकडे वाटचाल करत आहोत, जिथे एका प्रोग्रामरपेक्षा प्लंबरची नोकरी जास्त सुरक्षित असेल. तुम्हीच विचार करा, सध्या चांगल्या स्थितीत कोण आहे? दर महिन्याला 80 हजार रुपये कमवणारा ऑटोमोबाइल रिपेअर टेक्निशियन, की इंजिनिअरिंगची पदवी घेऊन घरात बसलेला बेरोजगार तरुण? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) स्वतःच्या हाताने काम करणे हे कॉम्प्युटरवर काम करण्यापेक्षा कमी दर्जाचे नाही. तुमच्याकडे एखादे उपयुक्त कौशल्य असले पाहिजे. तुम्ही त्यात तरबेज असावे. त्यातून तुम्ही सन्मानाने आपली उपजीविकाही चालवू शकाल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: ठाण्यात मोठी राजकीय घडामोड! प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या वादात शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदेंचा पदाचा राजीनामा
- पुणे: नागपूरच्या पराभवाची जबाबदारी माझीच...मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी कबुली, काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनाही सुनावले
- पुणे: पायाभूत सुविधा आणि सुरक्षेचा वानवा; महापालिकेत समाविष्ट झालेल्या मांजरीतील आरोग्य केंद्रच पडले 'आजारी'!
- नाशिक: मालेगाव तालुक्यात भीषण चारा टंचाई: केवळ ९५ दिवसांचा चारा शिल्लक, अडीच लाखांहून अधिक पशुधनाचे अस्तित्व धोक्यात
महाराष्ट्र
- मुंबई: सर्वांना समान संधी देणारे तंत्रज्ञान विकसित करून वाहन धोरण राबवा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वाची उच्चस्तरीय आढावा बैठक संपन्न
- मुंबई: ठाण्यात मोठी राजकीय घडामोड! प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या वादात शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदेंचा पदाचा राजीनामा
- पुणे: नागपूरच्या पराभवाची जबाबदारी माझीच...मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी कबुली, काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनाही सुनावले
- नांदेड: शरद पवारांचा एक कॉल अन् फिरला निकाल! मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयामागील रंजक रणनीती
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय
- गोवा: विक्रोळीतील २१ वर्षीय विद्यार्थी कुशाग्र पटालेचा दुचाकी-टॅक्सी अपघातात दुर्दैवी मृत्यू!



























Subscribe to my channel




