मुंबई: महाराष्ट्राची राजधानी मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक वृत्त समोर आले आहे. मुंबईतील दादर भागात मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचे (MACT) सदस्य तथा न्यायाधीश शशिकांत बांगर यांच्या कारचा रस्ता अडवून त्यांना आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरोधात भारतीय न्याय संहिितेच्या (BNS) विविध कलमांखाली एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली असून, पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ही खळबळजनक घटना गेल्या महिन्यात १३ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दादर टीटी परिसरातील इराणी मॅन्शनजवळ घडली होती. मोटर अपघात दावा न्यायाधिकरणाचे (MACT) न्यायाधीश शशिकांत बांगर हे आपली पत्नी विद्या आणि मुलगी साक्षी यांच्यासोबत धुळ्यातून मुंबईत परतले होते. त्यांनी आपली मुलगी साक्षी हिला दादर येथे सोडले आणि तेथून ते आपल्या कारने घरी परजत होते. न्यायाधीश बांगर यांच्या कारच्या डॅशबोर्डवर 'न्यायाधीश' (Judge) अशी लिहिलेली अधिकृत पाटी लावलेली होती.
दादर परिसरातील इराणी मॅन्शनजवळ आले असता, दोन अज्ञात तरुण मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी अचानक न्यायाधीश बांगर यांच्या एसयूव्ही (SUV) कारचा रस्ता अडवला. आरोपींनी कोणतीही पूर्वकल्पना किंवा कारण नसताना न्यायाधीश यांच्या कारचे मोबाईलवरून व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि फोटो काढण्यास सुरुवात केली. कारच्या डॅशबोर्डवर लावलेली 'न्यायाधीश' लिहिलेली पाटी पाहून ते दोघे संतापले आणि त्यांनी कारमध्ये कोण बसले आहे, अशी विचारणा करत अरेरावी करण्यास सुरुवात केली.
जेव्हा न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी खाली उतरून त्यांना गाडीचे रेकॉर्डिंग करण्यामागचे कारण विचारले आणि आपण न्यायालयाचे न्यायाधीश असल्याचे सांगितले, तेव्हा आरोपींचे वर्तन अधिक आक्रमक झाले. आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि "तुला मारून टाकीन," अशी उघड धमकी दिली. तसेच, न्यायाधीश बांगर यांनी या सर्व प्रकारादरम्यान स्वतःचा व कुटुंबाचा बचाव करण्यासाठी आणि पोलीस मदत मागण्यासाठी ११२ आणि १०० या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी त्यांना पोलिसांशी संपर्क साधण्यापासून रोखण्याचा आणि अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.
या संपूर्ण घटनेमुळे न्यायाधीशांचे कुटुंब प्रचंड दहशतीत आले होते. आरोपींच्या संशयास्पद हालचालींवरून आणि अरेरावीवरून ते व्यावसायिक ब्लॅकमेलर किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असावेत, असा संशय पीडित न्यायाधीशांनी व्यक्त केला आहे. या गंभीर प्रकरqची दखल घेत माटुंगा पोलिसांनी अखेर संबंधित दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कसून तपास करत आहेत.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




