बऱ्याच दिवसांनी मी भाजी मंडईत गेले आणि मन अगदीप्रसन्न झाले. लालबुंद टोमॅटो, टवटवीत फुलकोबी,हिरवागार ताजा पालक... प्रत्येक भाजी जणू माझ्याशीबोलत होती. एखाद्या कार्टुन फिल्ममध्ये अशा वस्तू जणूजीवंत होता. तसाच अनुभव होता. माणसांप्रमाणे प्रत्येकभाजीचीही वेगळी ओळख, वेगळा स्वभाव असतो. भेंडी थोडी मिरवतेच – ‘मला घ्या, मला घ्या. घरातसगळ्यांनाच मी आवडते.’ टोमॅटोमध्ये तर रुबाबच आहे– ‘माझ्याशिवाय स्वयंपाकच होणार नाही.’ बटाटाहीत्याच गटातला, पण तो अहंकारी नाही. तो एकटाहीआनंदी व इतरांमध्येही सहज मिसळून जाणारा. म्हणूनचतो सर्वांचा लाडका. वांगे मात्र हळूच हाक मारते –‘मलाही घ्या ना. माझे भरीत होईल, त्या दिवशी माझेआयुष्य सार्थकी लागेल.’ तिकडे कारले मात्र देवदासहोऊन बसलेले असते. लोक त्याला कडू म्हणूननाकारतात. पण योग्य मसाला आणि चिमूटभर आमचूर घालून बनवा, मग त्याची खरी चव कळेल. फ्रेंच बीन्सचा थाटच वेगळा. शेंगांच्या विश्वातील जणू ‘विश्वसुंदरी’च. पण बिचारी गवार शेंग बघा, अगदी साधीसुधी. सेमआणि इतर शेंगांची चर्चा हळद-जिऱ्यापलीकडे जातनाही. मात्र फ्रेंच बीन्सचे सामाजिक वर्तुळ मोठे.जगातील नामवंत शेफ तिचे चाहते आहेत. खट्याळगाजर आणि आत्मविश्वासपूर्ण काकडी यांना आपलेस्थान पक्के असल्याची जाणीव आहे. जेवणापूर्वी त्यांचीआठवण हमखास येते. त्यांचे मनही मोठे आहे.आरोग्याबाबत जागरूक लोक आजकाल काय-कायखातात! नाजूक, रंगीबेरंगी परदेशी भाज्यांनी आताबाजारपेठेत चांगलेच स्थान मिळवले आहे. ब्रोकोली,आइसबर्ग लेट्यूस, झुकीनी आता सहज मिळतात.एवोकॅडो तर देशाचा लाडका झाला आहे. मात्र यालोकप्रियतेच्या शर्यतीत आपल्या देशी भाज्यांचे काय?दोडका, ढेमसे, पडवळ, दूधी भोपळा – यांचे देशप्रेमइतके की त्यांनी कधी पासपोर्टच काढला नाही. परदेशीबाजारपेठांत त्यांचा मागमूसही नाही. त्यांचे चाहते शोधणेसोपे नाही. या भाज्या बनतात तिथे घरात एखादे ज्येष्ठव्यक्तिमत्त्व असतेच. मुलांनी नाक मुरडून खाल्लेल्या याभाज्यांनाही काही हक्क आहेत की नाही? किती दिवसत्या तुमच्या पिशवीत, फ्रीजमध्ये गप्प बसून राहणार?त्यांनाही एखाद्या चांगल्या उपाहारगृहाच्या मेनूमध्येआपले नाव पाहावेसे वाटत नसेल का? भाज्यांमधील वाद तर सुरूच असतात. पण त्यांचा खराप्रतिस्पर्धी कोण? पनीर. प्रत्येक लग्न, समारंभात,मेजवानीत त्या गोऱ्या, तगड्या पनीरने मेनूवर कब्जाकेलेला असतो. लोक त्याच्याभोवती घुटमळत असतात.रस्स्यातून वेचून-वेचून त्यालाच खातात. त्याची नावेहीकिती भारी – शाही पनीर, पनीर लबाबदार, पनीर पसंदा!आणि आम्ही? फक्त ‘मिक्स व्हेजिटेबल’. मगआम्हाला कोण विचारणार? आता आमच्यासाठीहीएखादी चळवळ सुरू व्हायला हवी. आमची किंमतकरा. बाजारात येऊन आम्हाला स्वतः निवडा. ॲपवरूनमागवण्याची सवय लागली आहे. ती आता थोडीबदलायला हवी. प्लास्टिकमध्ये बंदिस्त करून ठेवतातआम्हाला. आतून आम्ही हळूहळू मरत जातो. कोणीप्रेमाने हात फिरवत नाही, निवडून पिशवीत भरत नाही.गोदामांच्या अंधारात आम्ही पडून असतो. शक्य असेलतेव्हा मंडईत या. मुलांनाही सोबत आणा. त्यांना भेंडीकशी निवडतात ते शिकवा. कोथिंबीर आणि पुदिनायांतील फरक दाखवा. पूर्वी भाजी बाजाराची फेरीहीसुद्धा एक कौटुंबिक सहल असायची. परतताना पीठआणि साखरही घेतली जायची. हे असे काम होते. तेपुरुषही करत. कार्यालयातून घरी येताना ते भरलेलीपिशवी घेऊन यायचे. आता मोठ्या शहरांत लोकांकडेवेळच नाही. ऑनलाइन मागवणे सोयीचे वाटते. पण मीठरवले आहे की दर आठवड्याला स्वतः बाजारातजाणार. माझ्या आवडीच्या ताज्या भाज्या आणणार.त्यांना चिरून, किसून, कमी तेलात शिजवणार. आणित्यांचा आस्वाद घेत आनंद मिळवणार. तसे पनीरहीत्याच्या जागी चांगलेच आहे. त्यातील प्रथिने खरोखरउपयुक्त आहेत. पण भाज्यांनाही त्यांचा योग्य मान द्या.आपल्या शरीराला अधिक तंदुरुस्त ठेवा. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) शक्य असल्यास भाजी मंडईत या,मुलांनाही सोबत घेऊन या. भेंडी कशीनिवडायची हे त्यांना शिकवा, कोथिंबीरआणि पुदिना यांतील फरक दाखवा.जुन्या काळात भाजी मंडईची फेरी ही एकसहल होती. परतताना पीठ, साखरहीआणली जायची. हे काम पुरुषही करतअसत. कार्यालयातून परतताना तेभाजीची पिशवी घेऊन घरी येत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुणे पदवीधरमध्ये भाजपला धक्का; शरद लाडांचा अचानक अर्ज!
पुण्यात ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत दुचाकी रॅली; मुरलीधर मोहोळ हेल्मेट घालून सहभागी
भारतीय हवाई दलाची ऐतिहासिक कार पुन्हा चर्चेत; १९६० ची फोर्ड गॅलॅक्सी!
देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!



























Subscribe to my channel




