शुक्रवारी मी बेंगळुरूमधील सुमारे 7 किलोमीटर लांबीच्या त्या रस्त्यावरून जात होतो. येथे बायोकॉन पार्क, मायक्रो लॅब्स लिमिटेड, एपोटेक्स रिसर्च, एचसीएल टेक्नॉलॉजीजचे सेझ संकुल, कार्ल झाइस इंडिया, सॅनसेरा इंजिनिअरिंग आणि टोयोटा इंडस्ट्रीज इंजिन इंडिया यांसारख्या शेकडो बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. तेवढ्यात माझ्या चुलत भावाचा फोन आला. तो म्हणाला, “अरे, अरविंद (त्याचा मुलगा, नुकताच 17 वर्षांचा झाला आहे) कॉलेजला जाण्यासाठी दुचाकी मागत आहे.’ मी त्याला विचारले, “यात अशी कोणती चिंतेची गोष्ट आहे की याबाबत तुला माझे मत हवे आहे?’ तो म्हणाला, “तो अजून वरच्या मजल्यावरून खाली कपड्यांची टोपलीही न पडता आणू शकत नाही, पण दुचाकी मागतो आहे. कदाचित त्याच्या मित्रांकडे दुचाकी आहेत, त्यामुळे त्याच्यावर समवयस्कांचा दबाव आहे.’ मी त्याला म्हटले, “मी थोड्या वेळाने फोन करतो,’ आणि फोन ठेवला. अवघ्या 20 मिनिटांचा तो प्रवास मला एक तासात पूर्ण करावा लागला. माझ्या पुढे जाणाऱ्या दुचाकीस्वारांना रस्त्यावरील खड्डे आणि खराब झालेल्या भागांपासून वाचण्याचा प्रयत्न करूनही सतत धक्के बसत होते. बोम्मासंद्रा-जिगनी लिंक रोडवरील खड्डे आणि उखडलेल्या रस्त्यावरून वाट काढणारे असंख्य दुचाकीस्वार पाहून माझ्या मनात काही धडे आले. ते मी अरविंदच्या पालकांसोबत शेअर करू शकलो असतो. यापैकी काही धडे मला माझ्या वडिलांनी दिले. काही मी स्वतः वाहन चालवताना शिकलो आणि काही इतर दुचाकीस्वारांकडून शिकायला मिळाले. स्वतःची प्रतिमा जपण्याचा मोह सोडा रस्त्यावर उतरल्यावर अनेक दुचाकीस्वारांना वाटते की, त्यांनी एक विशिष्ट व्यक्तिमत्त्व, पेहराव, वागणूक, विचार करण्याची पद्धत आणि बोलण्याची शैली स्वीकारली पाहिजे. पण मी माझ्या नव्या दुचाकीवर पहिल्यांदा बसलो तेव्हा वडिलांनी मला सांगितले, “दुचाकीस्वार म्हणून तुला यापैकी कशाचीही गरज नाही.’ ते सहजपणे म्हणाले, “तू कसा दिसायला हवा हा विचार सोड. तेव्हाच तू जो होऊ शकतोस किंवा जो आधीपासून आहेस त्याला जागा मिळेल.’ हँडलवरील पकड थोडी सैल ठेवा त्यांचा दुसरा धडा असा होता की, “तू सतत ताणून राहिलास तर आयुष्यही तणावाने भरलेले राहील.’ दुचाकी सुरू करताना खांदे सैल सोड. त्यामुळे हँडलवरील पकड सहज राहील आणि पुढे जाणे सोपे होईल. रस्त्यात खड्डे आणि खराब भाग येणारच, त्यामुळे अनेकदा अचानक दिशा बदलावी लागू शकते. हँडल घट्ट पकडशील तितके ते कठीण होईल. नंतर मला जाणवले की, हा सल्ला केवळ दुचाकी चालवण्यासाठी नव्हता, तर आयुष्याच्या अनेक पैलूंनाही लागू पडणारा होता. प्रत्येक दुचाकीस्वाराची काळजी घ्या दुचाकी चालवायला सुरुवात करण्यापूर्वी मला ‘बायकर वेव्ह’ बद्दल माहिती नव्हती. दोन दुचाकीस्वार एकमेकांकडे दोन बोटे उंचावून अभिवादन करतात, त्या संकेताला ‘बायकर वेव्ह’ म्हणतात. पण त्याचा अर्थ समजल्यावर मला तो खूप आवडला. कारण तो केवळ अभिवादन नसून सुरक्षित राहण्याचा सार्वत्रिक संदेश आहे. हा छोटासा इशारा सुरक्षित वाहनचालकाची आठवण करून देत राहतो. वाहन चालवतानाही श्वसनाचा सराव करा अनेक अनुभवी वाहनचालकांनी मला सांगितले आहे की, ते वाहतूक सिग्नलवर हिरव्या दिव्याची वाट पाहताना श्वसनाचे व्यायाम करतात. सिग्नलवर उरलेल्या सेकंदांनुसार ते हा सराव करतात. कारचालकांच्या तुलनेत दुचाकीस्वार अनेकदा इतक्या घाईत असतात की, अशा मूलभूत गोष्टी विसरून जातात. लक्षात ठेवा, हे आपल्या शरीरासाठी चांगले असते. मन शांत ठेवते. ती सुरक्षित वाहन चालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. फंडा असा आहे की, तुमचे मूल दुचाकीची मागणी करत असेल तर त्याच्या मागणीचा नक्की विचार करा, पण हेल्मेट घालण्याची आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याची शिकवण देण्याबरोबरच त्याला आयुष्यात उपयोगी पडणारी ही तत्त्वेही जरूर शिकवा.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
महाराष्ट्र
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- कोल्हापूर: स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- जालना: माझ्यामधी वळवळ करू नका.. मराठा आरक्षण मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचे छगन भुजबळांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लबोल!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड


























Subscribe to my channel




