काही तारखा अविस्मरणीय ठरतात. कारण त्या दिवशी काही विलक्षण घटना घडलेली असते म्हणून नव्हे, तर त्या समाजाला माणुसकीची जाणीव करून देतात म्हणून. 20 जुलै ही अशीच एक तारीख आहे. हे वाचताना तुम्हाला एका घटनाक्रमाचे स्मरण होत असले तरीही त्याकडे मी नंतर येईन. पण त्याआधी तुम्हाला 20 जुलै 2024 या दिवशीच्या आयआयटी कानपूरमध्ये घेऊन जातो. खरे तर या कथेची सुरुवात खूप आधी झाली होती. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आणि भौतिकशास्त्राचे ज्येष्ठ शिक्षक प्रा. एच.सी. वर्मा यांनी तिची बीजे पेरली होती. त्यांचा विश्वास होता की, अगदी छोटेसे योगदानही असामान्य बदल घडवू शकते. आयआयटी कानपूरमध्ये प्राध्यापक एमेरिटस राहिलेले प्रा. वर्मा यांनी 1994 ते 2017 या काळात तेथे भौतिकशास्त्र शिकवले. त्यानंतर त्यांनी कॅम्पसमधील अपॉर्च्युनिटी स्कूलमध्ये विशेष सल्लागार म्हणून काम केले. 1964 मध्ये स्थापन झालेली ही शाळा कॅम्पसमध्ये राहणाऱ्या सहायक कर्मचाऱ्यांच्या तसेच आसपासच्या गरजू कुटुंबांतील मुलांना मोफत शिक्षण देत आहे. यांपैकी अनेक मुले उपाशीपोटी शाळेत येत होती. काही प्रार्थनेसाठी उभी असताना बेशुद्ध पडत. काहींचे अभ्यासात मन लागत नसे किंवा ती शाळेतच येत नसत. कारण उपाशीपोटी शिक्षण घेणे अशक्य असते. प्रा. वर्मा यांना ही परिस्थिती बदलायची होती. 2017 मध्ये त्यांच्या मनात एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मुलांना पौष्टिक आहार देण्याची कल्पना प्रथम आली. मात्र निधी उभारणीवरील मतभेदांमुळे ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही. 2024 मध्ये या कल्पनेवर पुन्हा चर्चा झाली. त्या वेळी दुसरी अडचण अशी होती की, स्वयंसेवी संस्थेने जितके विद्यार्थी अपेक्षित धरले होते तितके त्या शाळेत नव्हते. पण हार न मानता आयआयटी समुदायाने स्वतःच मार्ग शोधला. एअरोस्पेस अभियांत्रिकी विभागाचे सहायक प्राध्यापक टी.के. गुहा, जे हॉल-5चे वॉर्डनही होते. यांनी मेस व्यवस्थापक अंशू जोशी यांच्या मदतीने एक सोपा उपाय शोधला. हॉल-5मधील प्रत्येक विद्यार्थी आपल्या खिशातील खर्चातून दर आठवड्याला फक्त 5 रुपये देईल असे ठरले. आणि 20 जुलै 2024 रोजी मुलांना पहिले पौष्टिक जेवण देण्यात आले. सुरुवातीला हा एक छोटासा प्रयोग वाटत होता. पण लवकरच त्याचे मोहिमेत रूपांतर झाले. नोव्हेंबर 2024 पर्यंत हॉल-1, 3 आणि 8 तसेच गर्ल्स होस्टेल-1ही या उपक्रमात सहभागी झाले. त्यामुळे मुलांना आठवड्यातील पाचही शालेय दिवशी पौष्टिक आहार मिळू लागला. स्टुडंट्स जिमखाना आणि होस्टेल अफेअर्सच्या कौन्सिल ऑफ स्टुडंट्सच्या माध्यमातून या उपक्रमाची माहिती पसरत गेली आणि अधिकाधिक विद्यार्थी सहभागी होत गेले. आज आयआयटी कानपूरमधील 1,649 विद्यार्थी दर आठवड्याला 5 रुपयांचे योगदान देतात. यामागचे गणित अतिशय सोपे आहे. सुमारे 250 मुलांना एका वेळचे पौष्टिक जेवण देण्यासाठी सुमारे 3 हजार रुपये खर्च येतो. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या मेसच्या मासिक बिलात फक्त 20 रुपयांची वाढ होते. तांदूळ, गहू, हरभरा आणि राजमा यांसारख्या वस्तूंची घाऊक खरेदी केल्यामुळे खर्च कमी राहतो आणि हा उपक्रम टिकाऊ ठरतो. मात्र या उपक्रमाचे खरे फायदे पैशांत मोजता येत नाहीत. शिक्षकांनी पाहिले की, मुले अधिक निरोगी, उत्साही आणि अभ्यासाकडे लक्ष देणारी झाली. त्यांची उपस्थिती सुधारली आणि ती अधिक आनंदी राहू लागली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी एक धडा शिकला. तो कोणतेही पुस्तक शिकवू शकत नाही. आपल्या वाट्यातील अगदी छोटासा वाटाही इतरांसोबत वाटला तरी तो दुसऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. आता पुन्हा 20 जुलै 2026 कडे वळूया. दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत देशभरातील अनोळखी लोकांनी अन्न पोहोचवले. त्यासाठी पैसे कोणी दिले हे कुणालाही माहीत नव्हते. अन्न पाठवणाऱ्यांनाही ते कोणी खाल्ले हे माहीत नव्हते. पण कोणताही गाजावाजा न करता अन्न सतत पोहोचत राहिले. जणू करुणेने स्वतःच आपला मार्ग शोधला होता. या दोन्ही कथांमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत. कदाचित चांगुलपणाचे कार्यही असेच चालते. आपण केलेली भलाई कदाचित त्याच स्वरूपात आपल्याकडे कधीच परत येत नाही. फंडा असा की दयेतून केलेल्या छोट्याशा कृतीलाही कमी लेखू नका. चांगल्या कर्मांचे परत येण्याचे स्वतःचे मार्ग असतात. ती थेट आपल्यापर्यंत पोहोचली नाही तरी नंतरच्या पिढीच्या आयुष्यात नक्कीच परतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



