एन. रघुरामन यांचा कॉलम:वेळ म्हणजे पैसा, त्याचा वापर करायला शिका

2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

जर तुम्ही तुमच्या कामावर खूप प्रेम करत असाल, तर विचार करा जेव्हा कुणी तुम्हाला विचारेल की ‘तुम्ही काय विकत आहात?’ तेव्हा तुमचे उत्तर काय असेल? कदाचित तुम्ही हा प्रश्न विचारणाऱ्याच्या अज्ञानावर हसाल आणि म्हणाल, ‘मी तर नोकरी करतो.’ किंवा चिडून म्हणाल, ‘तुम्हाला कुणी सांगितले की मी काही विकत आहे? तुम्हाला माहीत नाही का की मी एक इंजिनिअर किंवा बिझनेस अ‍ॅनालिस्ट आहे?’

सत्य हे आहे की दोन्हीही उत्तरे चुकीची आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रत्येक कर्मचारी प्रत्यक्षात एकच गोष्ट विकत असतो. ती म्हणजे स्वतःची वेळ! उद्योजक तुमची वेळ खरेदी करतात, तुम्हाला त्यांच्या गरजेनुसार कौशल्य शिकवतात. ते तुमच्याकडून असे काम करून घेतात, ज्यामुळे त्यांना उत्पन्न मिळते. आता एका कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्हची कल्पना करा. कार्यालयातून घरी परतताना तो उबर, ओलासारखे अ‍ॅप सुरू करतो, एका प्रवाशाला सोबत घेतो व स्वतःच्या घराजवळ पोहोचण्यापूर्वी त्याला ड्रॉप करतो. रात्री ९ वाजता एक पिता वा पतीची भूमिका निभावण्यापूर्वी, तो मॅनेजर काही काळासाठी राइड-शेअरिंग ड्रायव्हर बनतो. वेळेच्या या वापराला प्रतिष्ठेतील घसरण मानायचे? की आर्थिक शहाणपण म्हणून दाद दिली पाहिजे?

दुर्दैवाने, समाजात आजही पदांना अधिक महत्त्व दिले जाते. आपण मोठ्या पदाचे कौतुक करतो, पण जर तीच व्यक्ती कार्यालयानंतर टॅक्सी चालवून, किराणा सामान डिलिव्हर करून किंवा फ्रीलान्सिंग करून अतिरिक्त कमाई करत असेल, तर आपण तिच्याकडे त्या दृष्टीने पाहत नाही. आपण प्रामाणिकपणे कमावलेल्या प्रत्येक रुपयाला समान सन्मान का देत नाही?

घर, शिक्षण, आरोग्य सेवा व रिटायरमेंट प्लॅनिंगच्या खर्चामुळे मध्यमवर्गीयांच्या जीवनाचे अर्थशास्त्र बदलले. उत्पन्नाचा दुसरा मार्ग अपयशाचे प्रतीक नाही तर अनेकांसाठी ही जबाबदारीची जाणीव आहे. हा बदल परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती, जिद्द व कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी सामाजिक पूर्वग्रह बाजूला ठेवण्याचे धाडस दर्शवतो. वेळ हेच धन आहे. जर अतिरिक्त वेळ असेल, तर कसलाही संकोच न बाळगता त्याचा योग्य वापर करा.

QuoteImage

मॅनेजमेंट टिप: जेव्हा लोकांच्या सामाजिक स्थितीवर प्रश्न उपस्थित करण्याऐवजी उत्पन्नाचे मार्ग निर्माण करण्यासाठी त्यांचे कौतुक करू लागतो, तेव्हा अशा समाजाची निर्मिती करू जो खोट्या प्रतिष्ठेऐवजी श्रमाच्या प्रतिष्ठेला सन्मान देईल.

QuoteImage

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *