जेन-झी फोन करत नाहीत. किमान कुटुंबातील सदस्यांना तरी अजिबात नाही. त्यांना संभाषण छोटे आणि थेट मुद्द्याचे ठेवायला आवडते. अनेक पालक मला सांगतात की, जर त्यांना कॉल आला तर त्यांच्या डोक्यात सर्वात आधी हेच येते की, ‘कदाचित काहीतरी गडबड आहे.’ जेव्हा तुम्ही फोन उचलून ‘हॅलो’ म्हणता आणि पलीकडून आवाज येतो की, ‘सांगा, आपला कुणी फॅमिली लॉयर आहे का?’, तेव्हा तुमच्या डोक्यात काय येईल? जर तुम्ही विचारले, ‘का?’ तर ते म्हणतात की, ‘आधी याचे उत्तर द्या.’ जेन-झी घराबाहेर पडत नाहीत आणि अनेकदा बोलतही नाहीत. तुम्ही कधी त्यांना विचारले का की ते का बोलत नाहीत? मी विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, ‘आमच्यासाठी तुम्ही पालक आणि आजी-आजोबा कॉल सेंटरसारखे आहात, जे चोवीस तास सल्ला देत असतात.’ कदाचित म्हणूनच एका सामान्य नियमाप्रमाणे त्यांच्या व्हॉट्सॲप मेसेजमध्ये ग्रीटिंग्ज गरजेचे नसतात. तुम्ही ‘हे डार्लिंग, हाऊ वॉज द डे?’ असे लिहिलेले त्यांना आवडत नाही. तुम्ही थेट मुद्द्यावर यावे, असे त्यांना वाटते. फोन न उघडताच होम स्क्रीनवर दिसणाऱ्या मेसेजच्या पहिल्या तीन ओळी त्यांना वाचायच्या असतात. म्हणूनच त्यांना तुमच्या ‘हे डार्लिंग…’ चा तिरस्कार वाटतो. त्यांची स्वतःची डिक्शनरी आहे, जिचे अर्थ आपल्या डिक्शनरीपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. हे मला नुकतेच समजले. त्यातील काही शब्द येथे दिले आहेत. लॉक्ड-इन : आपल्यासाठी: कुणीतरी चावी घेऊन गेले आणि मी घरात अडकलो आहे.
त्यांच्यासाठी: मी एका कामात पूर्णपणे मग्न आहे, त्रास देऊ नका.
आय ॲम डायिंग : आपल्यासाठी: मला आत्ताच एखाद्या आजाराचे निदान झाले आहे. त्यांच्यासाठी: हे खूप मजेशीर आहे, मी खूप जोरात हसत आहे.
कॅन यू गिव्ह मी अ कॉल: आपल्यासाठी: बऱ्याच दिवसांपासून तुमच्याशी बोलणे झाले नाही, भेटून बोललेले बरे राहील. त्यांच्यासाठी: माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस आहे, सर्वकाही गडबड होत आहे. सो गॅस्ड.
आपल्यासाठी: खूप बटाटे खाल्ल्यासारखे पोट पूर्ण फुगलेले वाटत आहे. त्यांच्यासाठी: मी याबद्दल खरोखरच खूप उत्सुक आहे.
व्हॉट अ मूड? आपल्यासाठी: पत्नी रूमचा दरवाजा उघडत नाहीये.
त्यांच्यासाठी: इथे खूप चांगल्या व्हाइब्ज आहेत.
द गोट: आपल्यासाठी: शेतातील एक दुर्गंधीयुक्त प्राणी.
त्यांच्यासाठी: अशी व्यक्ती जी ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ आहे.
त्यांच्या मेसेजमध्ये पंक्चुएशन, फुलस्टॉप वगैरेही नसतात.जेन-झीचे आतले जग मूलभूतपणे थोडे अव्यवस्थित आहे. त्यांच्या विचार प्रक्रियेला कोणतीही सुरुवात, मध्य आणि अंत नसतो. हीच गोष्ट त्यांच्या मेसेजमध्येही दिसते. त्यांच्या संवादात विचित्र लघुरूपे वापरली जातात. उदाहरणार्थ, WYM (व्हॉट डू यू मीन?). एकदा माझ्या पुतण्याने व्हॉट्सॲप कॉलवर माझ्या काही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, तेव्हा त्याने मला SMH असा मेसेज पाठवला. त्याला वाटले की, याचा अर्थ ‘शेकिंग माय हेड’ आहे हे मला समजेल. पण जेव्हा मी त्याला याचा अर्थ विचारला तेव्हा त्याचे अत्यंत उपेक्षापूर्ण उत्तर होते- ‘DW’ म्हणजेच ‘डोन्ट वरी’. दुसऱ्या एका पुतण्याने नुकताच मला ओळींमागून ओळी असा व्हॉट्सॲप मेसेज पाठवला. त्याला अपेक्षा होती की, मी ते वेगवेगळे विचार आयकियाच्या फर्निचरसारखे जोडून घेईन, जे आपल्याला ‘डू इट युवरसेल्फ’ असे सांगते.
उदाहरणार्थ, त्याची पहिली ओळ होती, ‘मी तुमच्याकडे येत आहे.’ दुसरी होती, ‘एका मित्रासोबत.’ तिसरी होती, ‘अपेक्षा आहे की फ्रिजमध्ये साहित्य असेल.’ आणि मेसेज असाच चालत राहिला. पण संपूर्ण मेसेजमध्ये त्याने तो कधी येत आहे हे सांगितले नाही. जेव्हा मी त्याला फोन केला तेव्हा तो म्हणाला, ‘हा कसला प्रश्न झाला, साहजिकच आजच, मी उद्यासाठी आज मेसेज का पाठवेन?’ मी फोन कट केला आणि त्याला मेसेज केला की, ‘FFS, चावी शेजाऱ्याकडे आहे.’ त्याने रिप्लाय दिला, ‘FFS चा अर्थ?’ मी म्हटले, ‘फेंड फॉर सेल्फ.’ त्याने उत्तर दिले, ‘आय ॲम डायिंग. FFS साठी 2000 रुपये दे.’ फंडा असा की, आपण सर्व पालक आणि आजी-आजोबांनी जेन-झीला मेसेज कसा करायचा हे शिकायला तयार असले पाहिजे. त्यांच्यासोबत तुमचा टेक्स्टिंग अनुभव कसा राहिला आहे, हे मला नक्की लिहा.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुणे पदवीधरमध्ये भाजपला धक्का; शरद लाडांचा अचानक अर्ज!
पुण्यात ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत दुचाकी रॅली; मुरलीधर मोहोळ हेल्मेट घालून सहभागी
भारतीय हवाई दलाची ऐतिहासिक कार पुन्हा चर्चेत; १९६० ची फोर्ड गॅलॅक्सी!
देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!



























Subscribe to my channel




