
Sanjay Raut : राज्यात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलं आहे. संजय राऊत यांनी लोकसभेच्या जागा वाटपावरून संजय राऊत यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी आमचं जागावाटप महाराष्ट्रात होतं. दिल्लीची गुलामी करावी लागत नसल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.
काँग्रेसने महाराष्ट्रातील बरेचसे उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांची यादी दिल्लीतून जाहीर होते, असं संजय राऊत म्हणाले. काल शरद पवार आणि जयंत पाटील हे मातोश्रीवर आले होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. प्रचाराची रणनीती ठरविण्यासंदर्भात ही बैठक झाली. पवार साहेबांसोबत नेहमी सकारात्मक चर्चा होते, असं त्यांनी म्हटलं आहे.
|
Solapur News : सोलापुरातील अनोखी धुलवड! दोन गटांमध्ये झाली तुफान दगडफेक; ४०० वर्षांची प्राचीन परंपरा |
यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेची पहिली यादी तयार आहे. दिवसभरात ती यादी आम्ही प्रसिद्धीला देऊ. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे. महाविकास आघाडीकडून बाळासाहेब आंबेडकरांना चार जागांचा दिलेला प्रस्ताव अजूनही कायम असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
संविधान वाचविण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर हे आमच्यासोबत राहतील, असंही राऊत यावेळी म्हणाले आहेत. बाळासाहेब आंबेडकरांची विचारधारा, संघर्ष आणि त्यांचं संघटनात्मक कौशल्य आम्हाला माहीत आहे. त्यांच्या परखड वक्तव्यात समाजाचं हित असतं. त्यांच्याशी आम्ही वारंवार संवाद साधून आहोत, असंही राऊत म्हणाले.
शिंदे पवारांच्या हातात काही नाही. दिल्लीचे पवार, भुजबळ यांचे नेते गुजराती नेते आहेत. ते ठरवतील जागा द्यायची की नाही, असं म्हणत संजय राऊतांनी टोला लगावला. पूर्वी जागावाटप असेल तर मातोश्रीवर बैठका व्हायच्या. आता यांना दिल्लीत जावं लागतं. पवारांना दिल्लीत जाऊन बसावं लागतं.छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिल्लीत जावं लागतं, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
छत्रपती शाहू महाराज यांना तिकीट देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने स्वतः घेतला. आम्हाला दिल्लीत जाण्याची गरज लागली नाही. आमचं जागावाटप आम्ही महाराष्ट्रामध्ये करतो. आम्हाला दिल्लीची गुलाम करावी लागत नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. मुघलकाळात मंडलिक संस्थानांचे वर्चस्व होतं. ते सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. स्वतः निर्णय घेण्याची कुवत आणि हिम्मत अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांमध्ये नाही. या दोन्ही नेत्यांना वारंवार भाजप नेत्यांकडे जाऊन बसावं लागतं असल्याची टिका राऊतांनी केली आहे.
शहर
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
- मुंबई: लाडकी बहीण योजना अपडेट: ई-केवायसी न केलेल्या ८१ लाख महिलांना मिळणार १५०० रुपये? मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?"
महाराष्ट्र
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- सांगली: नदी प्रदूषित करणाऱ्या महापालिका, पालिकांसह कारखान्यांवर थेट गुन्हे दाखल करा; जलसंपदामंत्र्यांचे अत्यंत कडक आदेश
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय



























Subscribe to my channel




