मुंबई/नागपूर/पुणे (ऑनलाइन लोकमत): महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कार्यालय, नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालय तसेच मुंबई, पुणे आणि नागपूरच्या महापौर कार्यालयांना बॉम्बस्फोटाच्या धमक्या देणारे ई-मेल प्राप्त झाल्याने संपूर्ण राज्यातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आली आहे. ही धमकी मिळाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी शासकीय इमारती तातडीने रिकाम्या करण्यात आल्या असून बॉम्बशोधक व नाशक पथकांकडून (BDDS) सखोल तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे.
१. नागपुरात संघ मुख्यालय आणि स्मृती भवन लक्ष्य: नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांना आलेल्या धमकीच्या ई-मेलमध्ये महाल परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य कार्यालय (आरएसएस मुख्यालय) आणि रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथे स्फोटके ठेवल्याचा दावा करण्यात आला होता. या माहितीनंतर बॉम्बशोधक पथकाने संपूर्ण परिसराची कसून झडती घेतली. सुदैवाने तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, परंतु येथील सुरक्षा व्यवस्था प्रचंड कडक करण्यात आली आहे.
२. मुंबईत मुख्यमंत्री कार्यालय आणि बीएसई भवन टार्गेटवर: मुंबई महापालिकेच्या अनेक अधिकृत ई-मेल आयडीवर हे धमकीचे मेल आले होते. यामध्ये मुंबई महापौर कार्यालय, मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय, मुंबई शेअर बाजार (BSE) भवन आणि पालिकेच्या मुख्य इमारतींमध्ये स्फोट घडवण्याची धमकी दिली होती. यावर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, प्रशासन अशा कोणत्याही पोकळ धमक्यांना घाबरणार नाही.
३. पुणे महापालिकेत घबराट, इमारत केली रिकामी: पुणे महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीला आणि महापौर कार्यालयालाही असाच धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. ई-मेल मिळताच प्रशासनाने तात्काळ पाऊल उचलत संपूर्ण इमारत रिकामी केली. त्यानंतर बॉम्बशोधक पथकाने इमारतीचा कानाकोपरा तपासला.
'खलिस्तान नॅशनल आर्मी'कडून धमकी: प्राथमिक तपासानुसार, हे सर्व धमकीचे ई-मेल स्वतःला 'खलिस्तान नॅशनल आर्मी' म्हणवणाऱ्या एका अज्ञात गटाकडून पाठवण्यात आले आहेत. या ई-मेलमध्ये १९८४ मधील 'ऑपरेशन ब्लू स्टार' आणि 'ऑपरेशन वुडरोज' यांचा उल्लेख करण्यात आला असून, त्याचा बदला घेण्याची भाषा वापरण्यात आली आहे. तसेच भाजप आणि आरएसएस संदर्भात अत्यंत आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर पोलीस सायबर सेलच्या मदतीने या प्रकरणाचा सखोल तपास करत असून ई-मेलचा मुख्य स्त्रोत (IP Address) शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
शहर
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- नागपूर: अंबाझरीजवळ स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव कार नाल्यात कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: वारीला गेले अन् विठुरायाच्या चरणी विसावले! येरडवचे माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ सावंत यांचे पंढरपूरमध्ये निधन
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- सांगली: जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवेळी जयंत पाटील चीनमध्ये तोंड लपवून बसले; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
गुन्हा
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा



























Subscribe to my channel




