TukaramMundhe, FDAAction, Ahilyanagar, EdibleOil, FoodSafety, MaharashtraNews, Adulteration, Akole, ConsumerRights, HealthAlert, BreakingNews, PureFood, ActionAgainstAdulteration, MarathiNews, PublicHealth

अहिल्यानगर: तुकाराम मुंढेंचा दणका: कारवाईच्या भीतीने अहिल्यानगरमध्ये 'सुट्या तेलाची' विक्री बंद; ग्राहकांमध्ये खळबळ

TukaramMundhe, FDAAction, Ahilyanagar, EdibleOil, FoodSafety, MaharashtraNews, Adulteration, Akole, ConsumerRights, HealthAlert, BreakingNews, 
PureFood, ActionAgainstAdulteration, MarathiNews, PublicHealth

अहिल्यानगर: अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि औषधांविरोधात धडाकेबाज मोहीम उघडली आहे. या मोहिमेचे पडसाद आता अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यासह ग्रामीण भागात उमटू लागले आहेत.

काय आहे नेमका प्रकार? गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील किराणा दुकानांत ग्राहकांच्या गरजेनुसार अर्धा लिटर, एक लिटर किंवा त्यापेक्षा कमी प्रमाणात 'सुटे खाद्यतेल' विकले जात होते. मात्र, गेल्या महिनाभरात यात अचानक बदल झाला असून, दुकानांमधून सुट्या तेलाची विक्री जवळपास बंद झाली आहे. आता दुकानदार ग्राहकांना केवळ कंपनी पॅक असलेल्या एक, पाच किंवा दहा लिटरच्या पिशव्या किंवा डबेच देत आहेत.

 

भेसळीची भीती आणि ग्राहकांचा प्रश्नसुट्या तेलाची विक्री अचानक बंद झाल्याने "आतापर्यंत आपण नेमकं काय खात होतो?" असा सवाल अनेक ग्राहक उपस्थित करत आहेत. ग्राहकांच्या मते, आता मिळणाऱ्या तेलाच्या चवीत आणि गुणवत्तेत बदल जाणवत आहे. पूर्वी विकले जाणारे सुटे तेल नेमके कोणत्या प्रकारचे होते आणि त्यात भेसळ होती का, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे. आरोग्याला धोकाअन्न व औषध प्रशासनाच्या माहितीनुसार, भेसळयुक्त खाद्यतेलामध्ये पामतेल, ऑर्गेमोन तेल, खनिज तेल, वापरलेले तेल किंवा कृत्रिम सुगंधी द्रव्यांचा वापर केला जातो.

अशा तेलाच्या दीर्घकालीन सेवनामुळे हृदयविकार, रक्तदाबाच्या समस्या, रक्ताची घनता वाढणे, त्वचारोग आणि अपचन यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. हॉटेल्स, फास्ट फूड सेंटर्स आणि मोठ्या कार्यक्रमांमध्ये अशा तेलाचा वापर होत असल्याचे तपासात वारंवार समोर आले आहे.
तुकाराम मुंढे यांच्या कडक धोरणामुळे आता भेसळखोरांचे धाबे दणाणले असून, अनेक ठिकाणी दुकानांचे 'शटर' डाऊन झाल्याचे किंवा विक्री थांबवल्याचे चित्र दिसत आहे.



महाराष्ट्र

राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *