
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. कर्जतच्या एन.डी स्टुडिओमध्ये (N D Studio) त्यांनी गळफास लावून आपलं जीवन संपवलं आहे. नितीन देसाई यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं यामागचे कारण अद्याप समोर आलं नाही. नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन देसाई यांनी त्यांच्याच मालकिच्या एन. डी स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना नितीन देसाई गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आले. घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ याबद्दल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिसांकडून तपास सुरु आहे.
नितीन देसाई यांनी २००५ मध्ये कर्जत येथे ५२ एकर जागेत एनडी स्टुडिओ सुरु केला आहे. याच स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केल्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे. नितीन देसाई हे खूपच नावाजलेले नाव आहे. अनेक हिंदी चित्रपटांसह कार्यक्रमांसाठी मोठ-मोठे सेट उभारणारे कलादिग्दर्शन म्हणून त्यांची ओळख होती.
नितीन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे.कला महाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले होते. १९८७ साली त्यांनी चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली. '१९४२ ए लव्ह स्टोरी' या चित्रपटामुळे ते प्रसिद्ध झाले. या चित्रपटामुळेच खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यानंतर त्यांनी 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर', 'प्रेम रतन धन पायो' यासारख्या बॉलिवूड चित्रपटांचे कला दिग्दर्शनाचे काम केले होते.
नितीन देसाई यांनी आपल्या कारकिर्दीत बॉलिवूडच्या बड्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. त्यांनी आपल्या जबरदस्त कामाची छाप कायम पाडली. त्यांना आतापर्यंत ४ वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' मिळवला आहे. तर तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा 'फिल्मफेअर पुरस्कार' मिळवला आहे. नितीन देसाई यांच्या जाण्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा परसरली आहे.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




