
Dharashiv : उमरगा शहर बायपास जवळच्या कोरेगाववाडी रस्त्यानजीक एका 35 वर्षीय तरुणाची धारदार हत्याराने आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. रविवारी हा प्रकार समोर आला. या प्रकरणी अवघ्या 12 तासात उमरगा पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोन आरोपींचा शोध लावला. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेत शाहूराज महादू सूर्यवंशी, वय 35 असं मृत व्यक्तीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी कोरेगाववाडी रस्त्यावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह काही नागरिकांना दिसला. रस्त्यावरील मृतगदेहाची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. पण मृतदेहचा चेहरा विद्रुप केल्याने मृताची ओळख पटत नव्हती. उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार आणि पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी आपलं कौशल्य पणाला लावत मृताची ओळख पटवण्यासाठी अनुभव पणास लावला. शेजारील शेतकरी, नागरिक यांच्याशी संपर्क साधून तब्बल चार तासांनी अखेर मृताची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं.
|
Pune : पुण्यात धक्कादायक घटना; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने लॉजमध्ये आत्महत्या केल्याने खळबळ |
दरम्यान हत्या करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकास पाचरण करण्यात आलं, तर फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळी उपस्थित झाली. वरिष्ठ पोलीस अधिकारी मेघना नागराज यांनी घटनास्थळाला भेट दिली.
यानंतर पोलिसांनी तांत्रिक घटनांचं विश्लेषण करून, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल रेकॉर्ड अशा सर्व बाबींचा अभ्यास करून आरोपी शिवाजी दत्तू दूधनाळे, वय 32 आणि मृताची पत्नी गौरी शाहूराज सूर्यवंशी, वय 34 यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर आरोपीनी गुन्हा कबूल केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं, की मृताची पत्नी गौरी आणि आरोपी शिवाजी यांचे अनैतिक संबंध होते. यामुळे मृत शाहूराज आणि त्याची गौरी यांच्यात सतत भांडण होत होती. आपल्या संबंधांत अडथळा ठरत असल्याने मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराने शाहूराजचा कायमचा काटा काढण्याचं ठरवलं. आरोपी शिवाजी आणि गौरी यांनी संगनमताने रविवारी पहाटे हत्येचा कट रचला.
आरोपी शिवाजी याने मृत शाहूराज याला रविवारी दारू पाजली. त्यानंतर रात्री दोन वाजण्याच्या सुमारास बायपास जवळच्या कोरेगाववाडी येथील रस्त्यावर नेऊन शाहूराजच्या डोळ्यात मिरची पावडर घालून त्याला रस्त्यावर पाडलं. नंतर संधी साधून आरोपी शिवाजीने शाहूराजच्या डोक्यात हंटर आणि दगडाने जबर मारहाण केली. यात शाहूराज सूर्यवंशी याचा जागीच मृत्यू झाला. अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी दिली.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel





1 thought on “Dharashiv : दारू पाजून डोळ्यात मिरची पावडर टाकली; पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या,धाराशिव हत्याकांडाचा थरारक उलगडा”