परीक्षा असो किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या, शाळेचे दिवस असो किंवा वीकेंड, बाहेर पाऊस पडत असो किंवा अचानक वीज गेलेली असो, पण आमची संध्याकाळी ७.३० वाजेची जेवणाची वेळ निश्चित होती. या कौटुंबिक स्नेहभोजनात न येण्याचे आम्ही कोणतेही कारण देऊ शकत नव्हतो. हा नियम फक्त दोनच प्रसंगी मोडला जायचा - जेव्हा कुणाला खूप ताप असेल किंवा देश युद्ध लढत असेल. जसे १९७१ चे बांगलादेश युद्ध, जेव्हा रस्त्यांवरील दिवेही बंद केले जायचे आणि सायकलच्या डायनामोला अर्धा काळा रंग लावला जायचा. आम्ही सर्वजण स्वयंपाकघरात बसत असू, जिथे ना डायनिंग टेबल होते, ना गॅस स्टोव्ह असलेला किचन ओटा. या सोयीसुविधा माझ्या बहिणीच्या जन्मानंतर घरात आल्या.डायनिंग टेबलवरही आम्ही दोन्ही मुले एका दिशेला तोंड करून बसत असू आणि उरलेल्या दोन दिशांना आई-वडील बसत. दक्षिण दिशा रिकामी राहायची. पालकांच्या एका समजुतीमुळे आमच्या घरात दक्षिणेकडे तोंड करून जेवणे टाळले जायचे. ही समजूत वास्तुशास्त्र आणि ऊर्जेशी संबंधित पारंपरिक धारणांचे एक मिश्र रूप होते. रात्रीच्या जेवणादरम्यान वास्तुकला, ऊर्जा आणि मान्यतांसारख्या विषयांवर आईकडून मिळालेला हा माझा पहिला वादातीत धडा होता. म्हणूनच आज मी तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो. दिवसातील किमान एक जेवण तरी एकत्र बसून घ्या आणि कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवा. काळाच्या ओघात तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये फरक दिसून येईल. जेव्हा तुम्ही पालक बनता तेव्हा तुम्हाला केवळ भेटवस्तूच मिळत नाहीत, तर भरपूर सल्लाही मिळतो. पण माझा हा सल्ला तुमच्या मुलांना हमखास एक उत्तम माणूस बनवेल. अगदी माझ्या बहिणीच्या जन्माच्या वेळी जेव्हा माझी आई रुग्णालयात होती, तेव्हाही आम्ही पिता-पुत्र साध्याशा जेवणासाठी एकत्र बसलो होतो. आम्हा दोघांमधील चर्चा नेहमीच दीर्घ चालायची. १० मिनिटे असो किंवा अर्धा तास, सोबत जेवण्याचा नियम ‘तडजोड नसणारा’ होता. अर्थात, त्याचा फायदाही झाला. बालपणीच्या या गोष्टी मला तेव्हा आठवल्या, जेव्हा नुकतेच मी ‘फॅमिली डिनर प्रोजेक्ट’ (एफडीपी) च्या कार्यकारी संचालिका डॉ. एमी फिशेल यांच्याबद्दल वाचले. त्या म्हणतात की, नियमित एफडीपीचा संबंध नैराश्य, चिंता, नशा किंवा तंबाखूचे व्यसन, ईटिंग डिसऑर्डर, लठ्ठपणा आणि सध्या विकसित देशांमध्ये आढळणाऱ्या किशोरवयीन गर्भधारणेचे प्रमाण कमी करण्याशी आहे. यामुळे लवचिकता आणि आत्मसन्मान वाढतो. हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते. प्री-स्कूलमधील मुलांचा शब्दसंग्रह वाढतो आणि मोठ्या मुलांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा होते. त्यांच्या सर्वेक्षणात एकत्र जेवणारी ८०% कुटुंबे ही परंपरा सुरू ठेवू इच्छितात, कारण किशोरवयीन मुलांना वाटते की त्या वेळी ते पालकांशी मनमोकळेपणाने बोलू शकतात. जेवणाचा टेबल हे शिष्टाचार, संयम शिकण्याचे प्रशिक्षण केंद्र आणि डिजिटल उपकरणांच्या व्यत्ययाशिवाय एकत्र बसण्याची दुर्मिळ संधी असते. घरच्यांना हळू जेवणाऱ्यांची वाट पाहावी लागते आणि स्वयंपाक करणाऱ्या आईचे रोज आभार मानावे लागतात. मुले सहानुभूती शिकतात, चालू घडामोडींबद्दल जाणून घेतात आणि हळूहळू आपले मत मांडू लागतात. चित्रपट, पुस्तके, व्यवसाय आणि राजकारणावर चर्चा होते. मी सर्व तरुण पालकांना आग्रहाने सांगेन की त्यांनी अमांडा रिपली यांचे ‘द स्मार्टेस्ट किड्स इन द वर्ल्ड’ हे पुस्तक नक्की वाचावे. यात टेबलवर चर्चा सुरू करण्याचे उत्तम मार्ग सांगितले आहेत. फंडा असा की- कुटुंब म्हणून एकत्र जेवणे हे एखाद्या प्रकल्पापेक्षा कमी नाही. म्हणूनच याला ‘एफडीपी’ म्हटले गेले आहे. प्रत्येक जेवणाच्या वेळी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपली आई जी मेहनत घेते, त्याचे खूप कौतुक झाले पाहिजे, कारण ती भावी पिढीला एक उत्तम माणूस बनवण्याचे काम करत असते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुणे पदवीधरमध्ये भाजपला धक्का; शरद लाडांचा अचानक अर्ज!
पुण्यात ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत दुचाकी रॅली; मुरलीधर मोहोळ हेल्मेट घालून सहभागी
भारतीय हवाई दलाची ऐतिहासिक कार पुन्हा चर्चेत; १९६० ची फोर्ड गॅलॅक्सी!
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



