अटल पेन्शन योजना (APY) 2015 मध्ये सुरू करण्यात आली. खाजगी असंघटित किंवा छोट्या व्यवसायात काम करणारी अशी लोकं ज्यांना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचा स्थिर स्रोत नाही अशांसाठी सरकार अटल योजना स्किम आणली आहे. या लोकांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत 60 वर्षांनंतर मासिक पेन्शन मिळविण्यासाठी व्यक्तींना त्यांच्या कामकाजाच्या दिवसांमध्ये दरमहा पगारातून लहान रक्कम गुंतवावी लागते. ही योजना बरीच फायदेशीर असली तरी ती प्रत्येकासाठी योग्य नाही.
या योजनेसाठी सरकारने काही पात्रता निकष निश्चित केले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने हे निकष पूर्ण केले नाहीत तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर अटल पेन्शन योजनेच्या लाभांसाठी कोण पात्र नाही आणि त्यामागील कारणे काय आहेत ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.
अटल पेन्शन योजनेचे फायदे कोण घेऊ शकत नाहीत?
1. निर्धारित वयोमर्यादे बाहेरचे लोकं – अटल पेन्शन योजनेत सामील होण्यासाठी एक विशिष्ट वयोमर्यादा आहे. जर तुमचे वय 18 वर्षांपेक्षा कमी किंवा 40 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही. सरकारचा असा विश्वास आहे की या योजनेत किमान 20 वर्षे गुंतवणूक करणे आवश्यक आहे. म्हणून, ही योजना फक्त 18 ते 40 वयोगटातील नियमित योगदान देऊ शकणाऱ्यांसाठी आहे. जर तुम्ही निर्धारित वयोमर्यादेबाहेर असाल तर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
2. इनकम टॅक्स भरणारे – जर तुम्हाला टॅक्स भरावा लागत असेल, म्हणजेच तुम्ही कर भरता असाल तर तुम्ही अटल पेन्शन योजनेसाठी पात्र राहणार नाही. कारण सरकारने ही योजना विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सुरू केली आहे. जे व्यक्ती सामान्यतः कर भरत नाहीत आणि त्यांना भविष्यातील पेन्शन लाभ मिळत नाही, त्यांच्यासाठी ही योजना आहे. मात्र करदात्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
3. बँक खाते नसलेली लोकं – अटल पेन्शन योजना (APY) ही पूर्णपणे बँक-लिंक्ड योजना आहे. जर तुमचे बँक खाते नसेल किंवा तुमचे खाते आधारशी जोडलेले नसेल, तर तुम्ही या योजनेत नोंदणी करू शकत नाही. कारण या योजनेचा लाभ मिळावा यासाठी व्यक्तीच्या मासिक पगारातून बँक खात्यातून थेट पैसे कापले जाते आणि तुमचे पेन्शन त्याच खात्यात जमा केले जाते. म्हणून, बँक खाते असणे अनिवार्य आहे.
4. भारतीय नागरिक नसलेले – अटल पेन्शन योजना (APY) फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध आहे. परदेशी नागरिक या योजनेचे फायदे घेऊ शकत नाहीत.
अटल पेन्शन योजनेअंतर्गत काय उपलब्ध आहे?
या योजनेसाठी पात्र असलेल्यांना वयाच्या 60 व्या वर्षानंतर निश्चित मासिक पेन्शन मिळते. पाच पेन्शन पर्याय आहेत: दरमहा 1 हजार रूपये दरमहा 2 हजार रूपये, दरमहा 3 हजार रूपये, दरमहा 4 हजार रूपये आणि दरमहा 5 हजार रूपये इतकं आहे. तुम्ही तुमच्या गरजा आणि क्षमतांनुसार कोणताही पेन्शन प्लॅन निवडू शकता.
किती गुंतवणूक आवश्यक आहे?
या योजनेतील गुंतवणूक रक्कम तुमच्या वयावर आणि निवडलेल्या पेन्शनवर अवलंबून असते. जर एखादी व्यक्ती 18 व्या वर्षी सामील झाली आणि तिला 5 हजार रुपये पेन्शन हवे असेल तर तिला दरमहा अंदाजे 210 रुपये गुंतवावे लागतील. दरम्यान जर एखादी व्यक्ती 30 व्या ही योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरूवात केली असेल तर तिला 5 हजार रुपये पेन्शनसाठी दरमहा अंदाजे 577 रुपये जमा करावे लागतील. जितक्या लवकर तुम्ही योजनेचा लाभ घ्याल तितकी कमी गुंतवणूक करावी लागेल.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



